उन्हाळा म्हटलं की उष्णता, गरमी, घाम याने जीव नकोसा होतो. उन्हाळ्यात वाढत्या उष्णतेमुळे हा ऋतूच नकोसा वाटायला लागतो. अशा या कडाक्याच्या उन्हाळ्यात वारंवार (how to make Delhi's famous mohabbat ka sharbat) थंडगार पदार्थ सतत खाण्यापिण्याची इच्छा होते. उकाड्याने हैराण झालेले असताना गारेगार पदार्थांची नुसती आठवण काढली तरी मन आणि शरीर दोन्हीही कसं थंड झाल्यासारखं वाटतं. उन्हाळ्यात सर्वसाधारणपणे वेगवेगळी सरबते, फळांचे रस, ताक, दही, पन्हं असे पदार्थ आवर्जून प्यायले जातात(Super Cool Recipe Of Delhi's Famous Mohabbat Ka Sharbat).
या पदार्थांसोबतच यंदा कलिंगड व दुधाचे उन्हाळा स्पेशल 'मोहोब्बत का शरबत' नक्की करुन पाहा. हे सरबत पिऊन शरीर आणि मन दोन्हींला थंडावा तर मिळतोच, पण कलिंगड आणि सब्जा पोटात गेल्याने अनेक आरोग्यदायी फायदेही होतात. या दिवसांत अगदी लहान मुलांनाही वेगवेगळ्या प्रकारचे थंडगार पदार्थ खावेसे वाटतात, परंतु त्यांना आईस्क्रिम, कुल्फी देण्यापेक्षा आपण कलिंगड आणि दुधापासून तयार केलेले हे हेल्दी 'मोहोब्बत का शरबत' (Mohabbat Ka Sharbat) अगदी बिंधास्तपणे देऊ शकता.
साहित्य :-
१. कलिंगड लहान तुकडे - २०० ग्रॅम
२. सब्जा - ३० ग्रॅम (पाण्यांत भिजवलेला)
३. रोज सिरप - ५० मि. ली
४. बर्फाचे तुकडे - ३ ते ४ खडे
५. दूध - १ लिटर
गुलकंद करण्याची पाहा पारंपरिक पद्धत, लालचुटूक गुलाबाचा गारेगार पदार्थ-उन्हाळ्यात आवश्यक थंडावा!
९०% लोकांना लसूण खाण्याची योग्य पद्धत माहीतच नाही, 'या' पद्धतीने लसूण खाल्ल्यास मिळतील अनेक फायदे...
कृती :-
१. एका बाऊलमध्ये पाणी घेऊन त्यात सब्जा भिजत ठेवावा. पाण्यांत भिजवून सब्जा फुलवून घ्यावा.
२. कलिंगडाचे एकदम लहान बारीक तुकडे करून घ्यावेत.
३. एका मोठ्या बाऊलमध्ये कलिंगडाचे बारीक केलेले तुकडे घालून त्यात बर्फाचे खडे, पाण्यांत भिजवलेला सब्जा, रोज सिरप घालावेत.
४. मग त्यात गरम करून थंड केलेलं दूध ओतावं.
यंदा वाळवणात करा वर्षभर टिकणारी दही मिरची, तोंडी लावायला खास चमचमीत पदार्थ...
५. सगळ्यात शेवटी हे सरबत चमच्याने हलवून मिक्स करून घ्यावे.
६. तयार सरबत ग्लासात ओतून वर कलिंगडाचे लहान तुकडे घालून पिण्यासाठी सर्व्ह करु शकता.
७. जर आपल्याला हे सरबत थंडगार हवं असेल तर आपणं फ्रिजमध्ये देखील ठेवून गार करुन पिऊ शकता.
आपले उन्हाळा स्पेशल कलिंगड व दुधाचे 'मोहोब्बत का शरबत' पिण्यासाठी तयार आहे.