Join us  

उन्हाळ्यात पिऊनच बघा थंडगार चोको मिल्क, मुलांसोबत स्वत:लाही द्या छान ट्रिट- सोपी रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2024 4:00 PM

Summer Special Choco Milk Recipe: हिवाळ्यात हॉट चॉकलेट आणि उन्हाळ्यात गारेगार चोको मिल्क तर व्हायलाच पाहिजे. बघा चोको मिल्क करण्याची सोपी रेसिपी (choco milk recipe by kunal kapoor)

ठळक मुद्देहे गारेगार चोको मिल्क पिऊन बच्चे कंपनीसह सगळेच खुश होतील. 

उन्हाळ्याच्या दिवसांत गारेगार पदार्थ खावे वाटतात. सरबत, पन्हं, कोल्ड कॉफी या पदार्थांची नुसती आठवण काढली तरी मन आणि शरीर दोन्हीही कसं थंड झाल्यासारखं वाटतं. आता या उन्हाळ्यात ही खास रेसिपी पाहून स्वत:साठी आणि मुलांसाठी थंडगार चोको मिल्क करून पाहा (how to make cool cool choco milk). यात चॉकलेट असल्याने हा पदार्थ तर लहान मुलांना आवडतोच, पण मोठी माणसंही अगदी आवडीने पितात (summer special recipe). सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांनी चोको मिल्क तयार करण्याची एक अतिशय सोपी रेसिपी इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. (choco milk recipe by kunal kapoor)

चोको मिल्क करण्याची रेसिपी

 

साहित्य

१ ग्लास दूध

२ टेबलस्पून साखर

वजन कमी करण्यासाठी 'असा' करा उपवास, ३ साध्या- सोप्या टिप्स- झर्रकन उतरेल वजन

१ टीस्पून कॉर्न फ्लॉवर

१ टेबलस्पून कोको पावडर

३ टेबलस्पून डार्क चॉकलेट

कृती

सगळ्यात आधी दूध गॅसवर गरम करायला ठेवा.

 

त्यानंतर दूध गरम झालं की त्यातलं थोडंसं दूध एका वाटीमध्ये काढा. त्यात कॉर्नफ्लाॅवर आणि कोको पावडर टाका आणि सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या.

आता हे दूध गॅसवर गरम करायला ठेवलेल्या दुधात टाका. त्यानंतर सगळं दूध व्यवस्थित हलवून घ्या.

त्वचेचं सौंदर्य बिघडवणारे ३ पदार्थ, लगेचच खाणं थांबवा- आठवडाभरातच त्वचेवर येईल तेज

कॉर्नफ्लॉवर आणि कोको पावडर दुधात व्यवस्थित मिक्स झाले की त्यात साखर आणि डार्क चॉकलेटची पावडर घाला. सगळ्या दुधाला उकळी आली की गॅस बंद करा. 

थंड झाल्यानंतर हे चोको मिल्क फ्रिजमध्ये ठेवून द्या. सर्व्ह करताना ग्लासमध्ये आधी बर्फ टाका आणि त्यानंतर मग चोको मिल्क भरा. हे गारेगार चोको मिल्क पिऊन बच्चे कंपनीसह सगळेच खुश होतील. 

 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृतीसमर स्पेशल