उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी आपण भरपूर पाणी पितो. आहारामध्ये कोल्ड ड्रिंक्स किंवा ज्यूस पितो.(Chocolate chikko milkshake recipe) सध्या उन्हाचे वातावरण अधिक असल्यामुळे आपल्याला सतत काही थंड खाण्याची इच्छा होते. जे शरीराला हेल्दी आणि चवीला टेस्टी असेल.(Summer drink for kid) उन्हाळ्यात आपल्याला अनेक प्रकारच्या फळांची चव चाखायला मिळते. अनेकदा ही फळे आपण अशीच खातो किंवा त्याचा ज्यूस पितो. (Easy milkshake recipe)
अगदी लहांनापासून ते मोठ्यांपर्यंत अनेकांना चिकू आवडतो. चिकूचे आरोग्याला अनेक प्रकारे फायदा होतो.(5-minute kids milkshake) यात व्हिटॅमिन ए, सी आणि ई आहेत. तसेच कॅल्शियम, फॉस्फरस आणि लोह यांसारखे पोषकतत्व आढळतात. बाजारात किंवा किंवा रस्त्याच्या कडेला आपल्याला ज्यूसवाला नेहमी पाहायला मिळतो.(Quick milkshake for children) आंबा, चिकू, कलिंगडसारख्या ज्यूसची चव चाखायला मिळते. पण अगदी घरीच सोप्या आणि साध्या पद्धतीने चिकूचा शेक कसा बनवायचा पाहूया. (Homemade milkshake recipe) त्यात काही महत्त्वाचे घटक घातले तर ही रेसिपी हेल्दी आणि टेस्टी बनू शकते.
कढईत करा परफेक्ट ‘चोको लाव्हा केक’! फक्त ३० मिनिटांत करा बिना ओव्हन परफेक्ट केक
चिकूमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फर असते जे आपल्या हाडांसाठी चांगले असते. यामुळे ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी होतो. यात असणारे अँटीबॅक्टेरियल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. शरीराला अनेक आजारांपासून दूर ठेवतात. त्यासाठी उन्हाळ्यात मुलांसाठी खास तयार करा चॉकलेट चिकू मिल्कशेक. मुले आवडीने खातील.
साहित्य
चिकू - २
खजूर - ४
काजू - २ चमचे
कोको पावडर - २ चमचे
फ्रेश मलाई - २ चमचे
आईस क्यूब - ७ ते ८
दूध -१ कप
कृती
1. सगळ्यात आधी चिकू स्वच्छ धुवून त्याचे बारीक काप करा.
2. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात चिकूचे काप, खजूर, काजू, कोको पावडर, मलई , दूध आणि आईस क्यूब घालून बारीक करा.
3. त्यानंतर सर्व्हिंग ग्लासमध्ये चिकूचा शेक घेऊन वरुन त्यावर कोको पावडर भुरभुरा.
4. काजू आणि बारीक चिरलेला चिकू घालून सर्व्ह करा.