Lokmat Sakhi >Food > उन्हाळ्यात खायलाच हवी तोंडाची चव वाढवणारी शेवग्याची कढी, आंबटगोड कढी म्हणजे सुख-पाहा रेसिपी

उन्हाळ्यात खायलाच हवी तोंडाची चव वाढवणारी शेवग्याची कढी, आंबटगोड कढी म्हणजे सुख-पाहा रेसिपी

Shevgyachi kadhi recipe : Drumstick kadhi recipe: Summer special kadhi recipe: कधी शेवग्याची कढी खाल्ली आहे का? कोकणातील खास पदार्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2025 09:05 IST2025-05-17T09:00:00+5:302025-05-17T09:05:01+5:30

Shevgyachi kadhi recipe : Drumstick kadhi recipe: Summer special kadhi recipe: कधी शेवग्याची कढी खाल्ली आहे का? कोकणातील खास पदार्थ

summer special how to make shevgyachi kadhi know the delicious healthy drumstick kadhi recipe | उन्हाळ्यात खायलाच हवी तोंडाची चव वाढवणारी शेवग्याची कढी, आंबटगोड कढी म्हणजे सुख-पाहा रेसिपी

उन्हाळ्यात खायलाच हवी तोंडाची चव वाढवणारी शेवग्याची कढी, आंबटगोड कढी म्हणजे सुख-पाहा रेसिपी

उन्हाळ्यात शरीराला गारवा मिळावा यासाठी आपण अनेक थंड पदार्थ खातो. (Shevgyachi kadhi recipe) आइस्क्रिम, बर्फाचा गोळा, दही, ताक, लस्सी यांसारखे अनेक पदार्थ आपण खातो. (Drumstick kadhi recipe) उन्हाळ्यात ताकाचे सेवन करणे शरीरासाठी फायदेशीर मानले जाते. दही-ताक प्रत्येक घरांमध्ये खाल्लं जातं.(Summer special kadhi recipe)
दही-ताकाशिवाय कोथिंबीरही खाल्ल जातं यापेक्षा ताकाची कढी खाण्याला देखील अनेकांची पसंती असते.(Healthy kadhi with drumsticks) आतापर्यंत आपण साधी कढी, सोलकढी यांसारख्या पदार्थांची चव चाखली असेलच. परंतु कधी शेवग्याची कढी खाल्ली आहे का? शेवग्याची शेंग आणि ताक दोन्ही आरोग्यासाठी फायदेशीर असते. त्यासाठी ही रेसिपी कशी बनवायची पाहूया. (Maharashtrian kadhi recipe)

७ ते ८ दिवस टिकणारे खुसखुशीत दुधीचे थेपले, उन्हाळा स्पेशल हलका-फुलका नाश्ता...

साहित्य 
शेवग्याच्या शेंगा - ४ ते ५ 
मीठ - चवीनुसार 
हळद - २ चमचे
ताक - ४ कप 
बेसन - २ चमचे
साजूक तूप - २ चमचे 
जिरे - अर्धा चमचे
कढीपत्ता - ६ ते ७ 
किसलेले आले - १ चमचा
कुटलेली हिरवी मिरची - १ चमचा
साखर - १ चमचा 
चिरलेली कोथिंबीर 

कृती 

1. सगळ्यात आधी एका भांड्यात शेवग्याची शेंगांचे तुकडे, मीठ, हळद आणि पाणी घालून उकळवून घ्या. 

2. आता एका छोट्या भांड्यात बेसनाचे पीठ आणि थोडेसे ताक घालून फेटून घ्या. उर्वरित ताकात तयार बेसनाची पेस्ट घाला. 

3. पातेल्यामध्ये तूप घाला. तूप वितळल्यानंतर जीरे, हिंग, कढीपत्ता, किसलेले आले, मिरची आणि कोथिंबीर घालून फोडणी तयार करा. 

4. त्यात उकडलेल्या शेंगा पाण्यासहित घाला. आता यामध्ये कढी घाला वरुन मीठ-साखर घालून ढवळून घ्या. उकळी आल्यानंतर वरुन कोथिंबीर घाला. तयार होईल चमचमीत शेवग्याची कढी. 

  

Web Title: summer special how to make shevgyachi kadhi know the delicious healthy drumstick kadhi recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.