मार्च महिना सुरु झाला की उन्हाचा तडाखा जाणवतो. या काळात शरीराला आणि विशेषतः आपल्या पोटाला (Gut) थंडाव्याची नितांत गरज असते. अनेकदा उन्हाळ्यामुळे भूक मंदावते, सतत थकवा जाणवतो किंवा पचनाचे विकार सुरू होतात.(Gluten-free summer diet plan) अशा वेळी आपण 'दही-भात' हा पारंपरिक पर्याय निवडतोच, पण जर तुम्हाला त्यापेक्षाही अधिक पौष्टिक, प्रोटीनने भरलेला आणि चविष्ट पर्याय मिळाला तर?(Dahi bhatala paryay healthy recipe)
क्विनोआ-कर्ड' बाऊल हा सगळ्यात हेल्दी असा पर्याय आहे. क्विनोआ हे सुपरफूड मानले जाते. यात भरपूर प्रमाणात फायबर आणि प्रोटीन असतं. जेव्हा आपण हे दह्यासारख्या नैसर्गिक प्रोबायोटिक सोबत एकत्र करतो. तेव्हा ते आपल्या पोटातील चांगल्या बॅक्टेरियांची वाढ करण्यास मदत करतात.(Healthy nashta recipes in Marathi) तसेच दिवसभर आपल्याला हायड्रेट ठेवण्यास मदत करतात. आपल्याला वजन कमी करायचे असेल आणि पोटाला आराम द्यायचा असेल तर १० मिनिटांत तयार करा क्विनोआ कर्ड बाऊल रेसिपी.
बाल्कनीतही लावता येईल तमालपत्राचं झाड, वाचा A to Z माहिती-सुगंधी तमालपत्र मिळेल घरच्याघरी
साहित्य
शिजवलेला क्विनोआ- दीड कप
ताजे दही- पाऊण कप
भिजवलेले चिया सीड्स- १ मोठा चमचा
किसलेली काकडी- पाव कप
किसलेले गाजर- पाव कप
भाजलेली जिरे पावडर- अर्धा छोटा चमचा
डाळिंबाचे दाणे- २ मोठे चमचे
मीठ- चवीनुसार
तेल- १ छोटा चमचा
मोहरी- अर्धा छोटा चमचा
हिरव्या मिरच्या- २ (उभ्या चिरलेल्या)
कढीपत्ता- ५-६ पाने
शेंगदाणे- १ मोठा चमचा
चिली फ्लेक्स- चवीनुसार
कृती
1. सगळ्यात आधी क्विनोआ स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर कुकरमध्ये क्विनोआ शिजवून घ्या. आता एका मोठ्या बाऊलमध्ये शिजवलेला क्विनोआ, ताजे दही, किसलेली काकडी, गाजर आणि भिजवलेले चिया सीड्स एकत्र घ्या.
2. यात चवीनुसार मीठ आणि भाजलेली जिरे पावडर घालून सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करा. फोडणी पात्रात तेल गरम करून त्यात मोहरी, शेंगदाणे, हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालून खमंग फोडणी तयार करा.
3. ही गरम फोडणी क्विनोआ मिश्रणावर ओता. वरुन ताजे डाळिंबाचे दाणे आणि आवडीनुसार चिली फ्लेक्स घाला. हा बाऊल फ्रीजमध्ये ठेवून थंडगार झाल्यानंतर खा.
