Lokmat Sakhi >Food > उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांसाठी खास खाऊ! गव्हाच्या पिठाची कुरकुरीत मेथी मठरी, भरपूर दिवस टिकेल

उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांसाठी खास खाऊ! गव्हाच्या पिठाची कुरकुरीत मेथी मठरी, भरपूर दिवस टिकेल

summer snacks for kids: crispy methi mathri at home: how to make mathari for kids: पाहूया हेल्दी आणि पौष्टिक कुरकुरीत मेथी मठरी कशी बनवायची.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2025 09:05 IST2025-05-07T09:00:00+5:302025-05-07T09:05:02+5:30

summer snacks for kids: crispy methi mathri at home: how to make mathari for kids: पाहूया हेल्दी आणि पौष्टिक कुरकुरीत मेथी मठरी कशी बनवायची.

summer special food for kids how to make wheat flour Crispy methi mathari how to store long time | उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांसाठी खास खाऊ! गव्हाच्या पिठाची कुरकुरीत मेथी मठरी, भरपूर दिवस टिकेल

उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांसाठी खास खाऊ! गव्हाच्या पिठाची कुरकुरीत मेथी मठरी, भरपूर दिवस टिकेल

सध्या उन्हाळ्याच्या सुट्टी सुरु आहेत. अशातच मुलांना सतत काही तरी चटपटीत खावेसे वाटते.(summer snacks for kids) नेमके अशावेळी काय बनावे आपल्याला सुचत नाही.(wheat flour methi mathri recipe) सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, संध्याकाळचा नाश्ता पुन्हा रात्रीचे जेवण असा दिनक्रम आपला सुरु असतो.(how to make mathari for kids) रोज रोज बाहेरचे पदार्थ खाऊ आपल्याला देखील वैताग येतो.(crispy methi mathri at home)
म्हणून घरच्या घरी काही पदार्थ करुन आपण मुलांची उन्हाळी सुट्टी अजून मजेशीर करु शकतो.(healthy summer food for kids) लहान मुलांसाठी पौष्टिक आणि कुरकुरीत पदार्थ बनवायचे असतील तर कुरकुरीत मेथी मठरी ट्राय करूयात.(methi mathri recipe with wheat flour) मेथीमध्ये अँटीऑक्सिंडट असतात जे शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढवतात. रक्तातील साखर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. पाहूया हेल्दी आणि पौष्टिक कुरकुरीत मेथी मठरी कशी बनवायची. 

फणसाच्या आठळ्यांची भाजी कधी खाल्ली आहे? गरे खा आणि करा आठळ्यांची चमचमीत भाजी, सोपी रेसिपी

साहित्य 

गव्हाचे पीठ - दीड कप 
रवा - अर्धा कप 
मेथीची भाजी - परतवलेली
लाल तिखट - १ चमचा 
हळद - १ चमचा 
जिरेपूड - १ चमचा 
हिंग - १ चमचा 
जाडसर कुटलेली ओवा- बडीशेप पावडर - १ चमचा 
मीठ - चवीनुसार 
साखर - १ चमचा 
तीळ - २ चमचा 
तूप - ३ चमचा 
पाणी - आवश्यकतेनुसार 
तेल - तळण्यासाठी 
तांदळाचे पेस्ट - २ चमचे 

">


कृती 

1. सगळ्यात आधी मेथीची भाजी तेलावर चांगली पतवून घ्या. शिजल्यानंतर एका वाटीत काढा. 

2. आता एका भांड्यात गव्हाचे पीठ, रवा, मेथीची भाजी, लाल तिखट, हळद, जिरेपूड आणि बाकीचे मसाले, तूप घालून चांगले मिक्स करा. 

3. त्यात पाणी घालून पीठ मळून घ्या. पिठाचे गोळे तयार करा.  आता चपाती लाटून घ्या. तांदळाच्या पिठात तूप मिसळून त्याची पेस्ट तयार करा. 

4. चपातीवर तांदळाची पेस्ट लावून पुन्हा एक चपाती लाटून घ्या. असे सगळ्या चपाती लाटून तांदळाची पेस्ट लावून एकावर एक ठेवा. 

5. सगळ्या चपातीच्या पिठाचा रोल करुन घ्या. वडीसारखे सुरीने काप करा. कापलेली वडी हलक्या हाताने प्रेस करुन पुन्हा लाटून घ्या. 

6. तेल गॅसवर तापल्यानंतर मठऱ्या तळून घ्या. लालसर रंग आल्यानंतर प्लेटमध्ये काढून घ्या. हवाबंद डब्यांत भरुन ठेवा. महिनाभर टिकेल कुरकुरीत मेथी मठरी 


 

Web Title: summer special food for kids how to make wheat flour Crispy methi mathari how to store long time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.