Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > ऊस न वापरता घरीच करा रसवंतीसारखा उसाचा रस - पाहा सोपी रेसिपी - उन्हाळ्यासाठी गारेगार युक्त...

ऊस न वापरता घरीच करा रसवंतीसारखा उसाचा रस - पाहा सोपी रेसिपी - उन्हाळ्यासाठी गारेगार युक्त...

sugarcane juice without sugarcane : how to make sugarcane juice at home without sugarcane : पाहुणेही ओळखू शकणार नाहीत! 'या' खास ट्रिकने घरीच तयार करा विना ऊसाचा, ऊसाचा रस....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2026 15:27 IST2026-03-16T15:15:01+5:302026-03-16T15:27:37+5:30

sugarcane juice without sugarcane : how to make sugarcane juice at home without sugarcane : पाहुणेही ओळखू शकणार नाहीत! 'या' खास ट्रिकने घरीच तयार करा विना ऊसाचा, ऊसाचा रस....

sugarcane juice without sugarcane how to make sugarcane juice at home without sugarcane | ऊस न वापरता घरीच करा रसवंतीसारखा उसाचा रस - पाहा सोपी रेसिपी - उन्हाळ्यासाठी गारेगार युक्त...

ऊस न वापरता घरीच करा रसवंतीसारखा उसाचा रस - पाहा सोपी रेसिपी - उन्हाळ्यासाठी गारेगार युक्त...

ऊन्हाळा आला की गारगार ऊसाच्या रसाची आठवण अनेकांना हमखास येते. थंडगार ऊसाचा रस आणि त्यावरील तो पांढरा शुभ्र फेस पाहून कोणाच्याही जिभेला पाणी सुटेल. बाहेर कडाक्याचं ऊन आणि घरात रसवंतीसारखा थंडगार उसाचा रस... विचार करूनच किती छान वाटतं ना? अनेकदा आपल्याला ऊसाचा रस प्यायची इच्छा होते, पण स्वच्छतेच्या कारणास्तव किंवा रणरणत्या ऊन्हामुळे आपण बाहेर जाणंच टाळतो. अशावेळी घरच्याघरीच जर तुम्हाला कुणी ऊसाचा एकही तुकडा न वापरता अगदी तशाच चवीचा ऊसाचा रस बनवून दिला तर आपण एक ऐवजी २ ते ३ ग्लास जास्तच पिऊ...(homemade sugarcane juice recipe without sugarcane).

रस्त्याच्या कडेला असलेल्या रसवंतीवर मिळणारा ताजा, गोड आणि थंडगार ऊसाचा रस उष्णतेपासून लगेचच आराम देतो. ऊस न वापरताही आपण घरच्याघरीच हुबेहूब रसवंतीसारखा 'ऊसाचा रस' बनवू शकता. ऐकायला अशक्य वाटतंय ना? पण घरच्याच उपलब्ध साहित्यात  अगदी झटपट ऊसाचा रस तयार करता येऊ शकतो. ऊस न वापरता हुबेहूब (instant sugarcane juice recipe at home) रसवंतीसारखा ऊसाचा रस बनवण्याची सोपी रेसिपी.... 

साहित्य :- 

१. गूळ - १ कप (बारीक चिरलेला किंवा पावडर)
२. पुदिना पाने - १५ ते २०
३. लिंबू - १ ते २ (मध्यम आकाराचे)
४. आलं - १ छोटा तुकडा (किसलेलं)
५. काळं मीठ - १/२ छोटा चमचा
६. थंड पाणी - २ ते ३ ग्लास
७. बर्फाचे खडे - गरजेनुसार
८. सब्जाचं बी - १ ते २ टेबलस्पून 

Gudhi Padwa 2026 : गुढीपाडव्याला करा रेशमासारखं मऊ श्रीखंड! परफेक्ट श्रीखंड करण्यासाठी ९ टिप्स...


घरात भाजीसाठी काहीच नाही ? मग करा झटपट 'मसाला चपाती' - १ नाही चांगल्या ४ चपात्या खाल नक्की...

कृती :- 

१. एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यात बारीक चिरलेला किंवा पावडर केलेला गूळ घालावा. त्यातच पुदिन्याची पाने, लिंबाचा रस, बर्फाचे खडे, चवीनुसार काळं मीठ आणि थोडंसं पाणी घालावं.
२. मग मिक्सर फिरवून हे सगळं मिश्रण वाटून घ्यावं. 

कच्चा कांदा आरोग्यासाठी 'वरदान' की आजारांना 'आमंत्रण'? रिसर्च सांगतो कुणी खावा कुणी टाळावा... 

३. एका ग्लासात मिक्सरच्या भांड्यातील तयार पल्प चमचाभर घालावं. आणि बर्फाचे खडे व थोडं पाणी आणि भिजवलेलं सब्जाचं बी घालावं. 
४. सगळे मिश्रण चमच्याने हलवून घ्यावं हा ऊसाचा रस जर थंडगार हवा असेल तर फ्रिजमध्ये ठेवावा किंवा थंड पाणी वापरुन ऊसाचा रस तयार करावा. 

ऊसाचा एकही तुकडा न वापरता तुम्ही घरच्या घरी हुबेहूब रसवंतीसारखा उसाचा रस पिण्यासाठी तयार आहे. ऐकायला थोडं नवल वाटेल, पण हे अगदी शक्य आहे! रंगाला तसाच, चवीला तितकाच गोड आणि शरीराला थंडावा देणारा हा 'विना ऊसाचा ऊसाचा रस' सध्या सोशल मिडियावरही प्रचंड व्हायरल होत आहे.

Web Title : बिना गन्ने के घर पर बनाएं गन्ने का रस: आसान रेसिपी

Web Summary : गन्ने के रस की तलब है पर स्टॉल से बचना चाहते हैं? यह रेसिपी गुड़, पुदीना, अदरक और नींबू जैसी आसानी से मिलने वाली सामग्री का उपयोग करके समान स्वाद बनाती है। इस ताज़ा और आसान घरेलू पेय से गर्मी को मात दें।

Web Title : Make Sugarcane Juice at Home Without Sugarcane: Easy Recipe

Web Summary : Craving sugarcane juice but avoiding stalls? This recipe creates a similar taste using readily available ingredients like jaggery, mint, ginger, and lemon. Beat the summer heat with this refreshing and easy homemade drink.