दिवाळीत गोडाचे पदार्थ मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात. परंतु या गोडव्याची चव मधुमेह असणाऱ्यांना नेहमीच चाखता येत नाही. (sugar free kaju katli recipe) दिवाळी म्हटलं की, गोडाधोडाशिवाय सणाची मजाच नाही. पण सध्याच्या काळात मधुमेहाचे प्रमाण वाढल्याने अनेकजण गोडाचे पदार्थ खाणे टाळतात. (no sugar kaju katli) काहींना डायबिटीज असल्यामुळे तर काही फिटनेसची काळजी घेत असल्यामुळे गोडाचे पदार्थ खात नाही.(healthy Diwali sweets) पण यंदाच्या दिवाळीत गोडाचे पदार्थ खायचे असतील तर घरच्या घरी बनवू शकता शुगर फ्री काजू कतली. तेही सोप्या दोन घरगुती पदार्थांपासून. (sugar free sweets for Diwali)
या काजू कतलीसाठी आपल्याला गॅसजवळ तासंतास उभं राहण्याची देखील गरज नाही.(kaju katli without gas) ना साखरेचा पाक हवा आणि आणखी काही. सोप्या टिप्स लक्षात ठेवून अवघ्या काही मिनिटांत काजू कतली बनवू शकतो. पाहूया सोपी रेसिपी.
साहित्य
काजू - २०० ग्रॅम
बेदाणे - ४० ग्रॅम
कृती
1. सगळ्यात आधी आपल्याला बेदाणे पाण्यात भिजवावे लागतील. या काजू कतलीमध्ये फक्त ५० ग्रॅम कॅलरीज आहे. ज्यामुळे वजन किंवा रक्तातील साखर देखील वाढणार नाही. यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काजू आणि भिजवलेले बेदाणे घालून त्याची बारीक पेस्ट करावी लागेल.
2. आता बटर पेपरवर मिश्रणाचा तयार पेस्ट ठेवून त्यावर बटर पेपर ठेवून चपातीसारखे लाटून घ्या. आता वरुन चांदीचा वर्ख लावा. याचे छोटे छोटे तुकडे करुन फ्रीजमध्ये सेट होण्यास ठेवा. तयार होईल अवघ्या काही मिनिटांत काजू कतली.
3. साखरेऐवजी वापरला जाणारा बेदाणे हा पर्याय डाएट आणि मधुमेहांसाठी चांगला आहे. याच्या स्वादात कोणताच फरक जाणवत नाही. ही मिठाई मधुमेहांसाठी चांगला पर्याय आहे. दिवाळीत guilt-free आनंद घेण्यासाठी ही काजू कतली नक्की करून बघा.