जेवल्यानंतर किंवा मधल्यावेळेत आपल्याला गोड खाण्याची इच्छा होते.(sweet dish recipe) ही क्रेव्हिंग इतकी वाढते की, अशावेळी नेमक काय खावं सुचत नाही.(banana based healthy dessert) आपल्यापैकी अनेकजण आरोग्याची पुरेपूर काळजी घेत असतात.(traditional no sugar sweet ideas) वजन वाढू नये म्हणून थोडेच पण हेल्दी पदार्थ खातात. पण गोड खाण्याची इच्छा झाल्यावर नेमक काहीच कळत नाही.(natural sweet recipe with banana)
लाडू किंवा इतर गोडाचे पदार्थ बनवायला बराच सामान लागतो. परंतु, असे काही पदार्थ आहेत जे झटपट तयार होतात.(ripe banana sweet dish) हे पदार्थ करण्यासाठी आपल्याला जास्त वेळ देखील लागत नाही ना जास्त सामान. इतकेच नाही तर पिकलेल्या केळीचा केलेला हा पदार्थ साखरेशिवाय करता येतो.(sugar-free banana sweet recipe) हा गोडाचा पदार्थ करण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया.
भाजी-चपाती खाऊन कंटाळलात? करा चमचमीत व्हेज पुदिना पुलाव, पावसाळ्यात खा हलका- पौष्टिक आहार
साहित्य
पिकलेल्या केळी - २
तूप - आवश्यकतेनुसार
गव्हाचं पिठ- ३/ ४ वाटी
रवा - १/४ वाटी
गूळ - १ वाटी
पाणी - १/४ वाटी
सुकामेवा - आवश्यकतेनुसार
कृती
1. सगळ्यात आधी गॅसवर पातेल ठेवून त्यात गूळ आणि पाणी घालून त्याचे पाक तयार करा. पाक तयार करताना चमच्याने सतत हलवत राहा.
2. आता कढईमध्ये चमचाभर तूप घालून त्यात गव्हाचे पीठ घाला. पीठ परतवताना गॅस मंद आचेवर ठेवा. यामुळे पीठ जळणार नाही. पीठाचे गोळे जमू देऊ नका. पीठ लालसर झाल्यानंतर त्यात बारीक रवा घालून पुन्हा एकदा परतवून घ्या.
3. पिकलेल्या केळीचे बारीक तुकडे करुन पाणी घालून त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट भाजलेल्या पिठामध्ये घाला. त्यानंतर त्यात गाळणीच्या मदतीने तूप कढईत घाला. चांगले ढवळून घ्या. त्यात चमचाभर तूप आणि ड्रायफ्रूट्स घालून पुन्हा एकदा परतवून घ्या.
4. ताटाला तूप लावून तयार मिश्रण त्यावर पसरवा. मिश्रण सेट झाल्यानंतर चाकूच्या सहाय्याने त्याच्या वड्या पाडा.