Join us

ना तांदूळ, ना तेल करा मऊ - लुसलुशीत व्हेजिटेबल इडली! चवीला उत्तम आणि पौष्टिक - नाश्ता होईल पोटभर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2025 16:34 IST

stuffed vegetable idli recipe : healthy vegetable idli recipe : vegetable idli without rice and oil : घरच्याघरीच तेल आणि तांदुळाविना व्हेजिटेबल पौष्टिक इडली झटपट तयार करण्याची सोपी रेसिपी...

सध्याच्या धावपळीच्या आणि सततच्या बदलत्या लाईफस्टाईलमध्ये प्रत्येकजण आपल्या आरोग्याची काळजी घेतो. हेल्दी आणि फिट राहण्यासाठी नाश्ता देखील पौष्टिक व हेल्दी असावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. इडली हा एक लोकप्रिय आणि पौष्टिक पदार्थ आहेच, पण  पारंपरिक पद्धतीने इडली तयार करण्यासाठी  तांदूळ किंवा तेलाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. पण आरोग्याची काळजी घेताना, नाश्त्याला केली जाणारी इडली जर पौष्टिक व आरोग्यदायी करता आली  तर आपल्याला पोटभर खाता येऊ शकते(vegetable idli without rice and oil).

आपल्या नेहमीच्याच पारंपरिक पद्धतीने इडली करायची म्हटलं तर अनेकदा तेल किंवा तांदुळाचा वापर होतो, जो वजन कमी करण्याच्या किंवा हेल्दी डाएट पाळणाऱ्यांसाठी योग्य नसतो. अशावेळी आपण  घरच्याघरीच तेल आणि तांदुळाविना व्हेजिटेबल पौष्टिक इडली सहज तयार करू शकता. या इडलीमध्ये विविध रंगीबेरंगी भाज्यांचा वापर केल्यामुळे ती केवळ चविष्टच नाही तर व्हिटॅमिन्स, फायबर आणि मिनरल्स सारखे पौष्टिक घटक देखील त्यात असतात. ही हेल्दी इडली पोटभर नाश्ता, टिफिन किंवा संध्याकाळच्या (healthy vegetable idli recipe) स्नॅक्ससाठी देखील एक परफेक्ट पर्याय आहे. तेल आणि तांदुळाशिवाय (stuffed vegetable idli recipe) चविष्ट व पौष्टिक व्हेजिटेबल इडली तयार करण्याची सोपी रेसिपी पाहूयात.

साहित्य :- 

१. गव्हाचे पीठ - १ कप२. दही - १/२ कप३. पाणी - आवश्यकतेनुसार४. गाजर - १/२ कप (किसलेलं गाजर)५. ढोबळी मिरची - १/२ कप ( बारीक चिरलेली)६. कोबी - १/२ कप (बारीक चिरलेला कोबी)७. हिरव्या मिरच्या - २ ते ३ बारीक चिरलेल्या८. आलं - १ टेबलस्पून (किसलेल आलं)९. मीठ - चवीनुसार१०. फ्रूट सॉल्ट किंवा इनो - १ टेबलस्पून ११. तेल - ग्रीसिंगसाठी (साच्याला लावण्याकरिता) चमचाभर 

महिनाभर टिकणारी आलं लसूण पेस्ट करण्यासाठी ८ टिप्स, टिकते छान-विकत आणायची गरजच नाही...

इडली पात्र न उघडताही इडली शिजली आहे का ओळखण्याच्या ७ टिप्स! इडली होईल मऊ- लुसलुशीत... 

कृती :- 

१. सर्वात आधी एका भांड्यात गव्हाचे पीठ, दही आणि थोडे पाणी घालून चांगले मिसळा. हे मिश्रण जास्त घट्ट किंवा जास्त पातळ होऊ नये. आता त्याला १० ते १५ मिनिटांपर्यंत झाकून ठेवा, जेणेकरून पीठ व्यवस्थित फुगून येईल. २. यानंतर, या पिठात गाजर, कोबी, ढोबळी मिरची, आले आणि हिरव्या मिरच्या घाला आणि चवीनुसार मीठ टाकून ते चांगले मिसळा.३. इडली फुगण्यासाठी आणि मऊ करण्यासाठी त्यात फ्रूट सॉल्ट किंवा इनो घाला. यामुळे पिठात हलके बुडबुडे येतील. इडलीच्या साच्याला हलकेच तेल लावून हे मिश्रण जास्त न मिसळता लगेच इडलीच्या साच्यात घाला. 

४. यानंतर, इडली पात्रामध्ये किंवा एका मोठ्या भांड्यात पाणी गरम करून त्यात हे इडलीचे स्टँड ठेवा. ५. आता साच्यांना झाकून १० ते १२ मिनिटांपर्यंत मध्यम आचेवर वाफवा. ६. स्टीम झाल्यानंतर इडल्या थंड होऊ द्या आणि मग त्यांना बाहेर काढा आणि गरमा-गरम आटा वेजी इडली चटणी किंवा सांबारसोबत सर्व्ह करा.

तेल व तांदुळाचा वापर न करता तितकीच मऊ - लुसलुशीत व पौष्टिक इडली खाण्यासाठी तयार आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Healthy Vegetable Idli Recipe: No Rice, No Oil, Soft & Delicious!

Web Summary : Enjoy a healthy and delicious breakfast with this vegetable idli recipe. Made without rice or oil, it's packed with vegetables, fiber, and vitamins. Perfect for a guilt-free, nutritious meal, snack, or tiffin.
टॅग्स :अन्नपाककृती