Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > उन्हाळ्यात करा वर्षभर टिकणारे 'भरलेल्या लाल मिरचीचे लोणचे'! जेवणाची चव दुपटीने वाढवेल, सासूबाईंची खास रेसिपी

उन्हाळ्यात करा वर्षभर टिकणारे 'भरलेल्या लाल मिरचीचे लोणचे'! जेवणाची चव दुपटीने वाढवेल, सासूबाईंची खास रेसिपी

Bharleli lal mirchi lonche recipe: Lal mirchicha loncha kase banvayche: वर्षभर टिकणारे भरलेले लाल मिरचीचे लोणचे कसे तयार करायचे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2026 09:30 IST2026-03-16T09:30:00+5:302026-03-16T09:30:02+5:30

Bharleli lal mirchi lonche recipe: Lal mirchicha loncha kase banvayche: वर्षभर टिकणारे भरलेले लाल मिरचीचे लोणचे कसे तयार करायचे.

Stuffed red chilli pickle recipe Traditional Indian red chili pickle How to make red chilli pickle at Home Lal mirch ka achar recipe Spicy stuffed red chili pickle Marathi | उन्हाळ्यात करा वर्षभर टिकणारे 'भरलेल्या लाल मिरचीचे लोणचे'! जेवणाची चव दुपटीने वाढवेल, सासूबाईंची खास रेसिपी

उन्हाळ्यात करा वर्षभर टिकणारे 'भरलेल्या लाल मिरचीचे लोणचे'! जेवणाची चव दुपटीने वाढवेल, सासूबाईंची खास रेसिपी

भारतीय जेवणाची थाळी जोपर्यंत चटपटीत लोणच्याशिवाय पूर्ण होत नाही, तोपर्यंत जेवणाची खरी मजा येत नाही. उन्हाळा सुरू झाला की प्रत्येक घरात वाळवण आणि लोणच्यांची लगबग सुरू होते. आंबा आणि लिंबाचे लोणचे तर आपण नेहमीच करतो, पण उन्हाळ्यात तयार केलेले 'भरलेल्या लाल मिरचीचे लोणचे' (Stuffed Red Chilli Pickle) ही एक वेगळीच मेजवानी असते. हे लोणचे दिसायला जेवढे आकर्षक असते, तेवढेच चवीला झणझणीत आणि चविष्ट लागते. विशेषतः पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात जेव्हा आपण गरम वरण-भात किंवा पराठे खातो, तेव्हा या लोणच्याची एक फोड जेवणाची चव १०० पटीने वाढवते.(Bharleli lal mirchi lonche recipe)
अनेकांना वाटते की लाल मिरचीचे लोणचे करणं खूप कठीण आहे किंवा ते लवकर खराब होते. पण जर योग्य प्रमाणात मसाला आणि पारंपारिक पद्धत वापरली, तर हे लोणचे वर्षभर काय, दोन वर्षेही अगदी व्यवस्थित टिकते. जाणून घेऊया हे वर्षभर टिकणारे भरलेले लाल मिरचीचे लोणचे कसे तयार करायचे. (Lal mirchicha loncha kase banvayche)

पुदिन्याची पानं सडतात-काळी पडतात? उन्हाळ्यात पुदिना टिकेल महिनाभर- सोपी युक्ती, ताक- चटणी राहिल फ्रेश


साहित्य 

जाड लाल मिरच्या- ५०० ग्रॅम (धुवून आणि कोरड्या करून घेतलेल्या)
मोहरीची डाळ - १०० ग्रॅम
बडीशेप- ५० ग्रॅम
मेथी दाणे- २ मोठे चमचे
जिरे- २ मोठे चमचे
धणे- २ मोठे चमचे
हिंग- १ छोटा चमचा
हळद- २ मोठे चमचे
लाल तिखट- १ मोठा चमचा (रंगासाठी)
मीठ- १०० ग्रॅम (किंवा चवीनुसार थोडे जास्त, मीठ लोणचे टिकवण्यास मदत करते)
मोहरीचे तेल- २५० ते ३०० मिली
आमचूर पावडर किंवा लिंबाचा रस- ४ मोठे चमचे

कृती 

1. सगळ्यात आधी बडीशेप, जिरे, धणे आणि मेथी दाणे मंद आचेवर हलके भाजून घ्या. मसाल्यांचा छान सुगंध सुटला की गॅस बंद करा. भाजलेले मसाले थंड झाल्यावर मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या. फार बारीक पावडर करू नका, लोणच्यात जाडसर मसाला छान लागतो.

2. मोहरीची डाळ भाजण्याची गरज नाही, ती तशीच मिक्सरमधून एकदा फिरवून घ्या. एका मोठ्या परातीत वाटलेला मसाला, मोहरीची डाळ, हळद, हिंग, मीठ, लाल तिखट आणि आमचूर पावडर एकत्र करा.

3. मोहरीचे तेल कडकडीत गरम करून कोमट होऊ द्या. मसाल्यात २-३ चमचे कोमट तेल घालून मसाला व्यवस्थित कालवून घ्या, जेणेकरून तो मिरचीमध्ये भरताना सुटा होणार नाही.

4. लाल मिरच्या स्वच्छ धुवून त्याच्या देठाचा भाग कापून टाका. मिरचीला मधून उभी चिर द्या. जर कमी तिखट हवे असेल तर त्याच्या आतील बिया काढून टाकू शकता. 

5. तयार केलेला प्रत्येक मसाला मिरचीमध्ये दाबून व्यवस्थित भरा. एका काचेच्या स्वच्छ कोरड्या बरणीत या मिरच्या उभ्या किंवा आडव्या रचून ठेवा. 

6. उरलेले कोमट मोहरीचे तेल मिरच्यांवर ओता. तेल मिरच्यांच्या वरपर्यंत आले तर लोणचे कधीही खराब होणार नाही. बरणीचे तोंड सुती कापडाने बांधून ३-४ दिवस कडक उन्हात ठेवा. उन्हामुळे मसाला आणि तेल एकजीव होऊन लोणचे छान मुरते.
 

Web Title : वर्ष भर चलने वाला भरवां लाल मिर्च का अचार: एक मसालेदार व्यंजन

Web Summary : वर्ष भर चलने वाला भरवां लाल मिर्च का अचार बनाएं। यह रेसिपी भोजन के स्वाद को बढ़ाती है। मसाले पीसें, मिर्च भरें, और सरसों के तेल में डुबोएं। स्वादिष्ट और लंबे समय तक चलने वाले व्यंजन के लिए धूप में सुखाएं।

Web Title : Year-long Stuffed Red Chilli Pickle Recipe: A Spicy Culinary Delight

Web Summary : Make year-long stuffed red chilli pickle. This recipe enhances meal flavors. Grind spices, stuff chilies, and submerge in mustard oil. Sun-dry for a flavorful, lasting treat.