Join us

गॅस बर्नर आणि शेगडीवरचे डाग निघतच नाहीत? ४ सोपे उपाय, शेगडी दिसेल चकाचक स्वच्छ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2022 13:00 IST

Kitchen Hacks कितीही चकाचक असलेले स्वयंपाकघर, अस्वच्छ शेगडी आणि बर्नरमुळे अत्यंत वाईट दिसते. आरोग्याच्या दृष्टीनेही ते चांगले नाही.

सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत गॅसवर विविध पदार्थ बनवणे चालूच असते. कधी चहा उतू जातो तर कधी डाळ. यामुळे गॅसची शेगडी खराब होते, आणि त्यावर चिकट डाग तयार होत जातात. वेळच्या वेळी शेगडी साफ नाही केली, तर त्यावर हट्टी डाग तयार होतात जे लवकर निघत नाही. जर शेगडी खराब असेल तर स्वच्छतेच्या दृष्टीने आणि आरोग्यासाठी देखील चांगले नाही. शेगडी साफ करताना घासून घासून आपले हातही खूप दुखू लागतात. त्यामुळे काही ट्रिक्स फॉलो करून, घरगुती साहित्यांचा वापर करून शेगडी साफ करा. जेणेकरून हातही दुखणार नाही आणि शेगडी देखील चमकून निघेल.

लिंबू

सर्वप्रथम रात्री पाण्यात लिंबू मिसळा त्यात रात्रभर गॅस बर्नर भिजत ठेवा. सकाळी लिंबाच्या सालीवर थोडसं मीठ घाला आणि गॅस बर्नर घासून घ्या. या उपायाने गॅस बर्नर नव्यासारखे चमकू लागतील.

पांढरे व्हिनेगर

खाण्याव्यतिरिक्त स्वच्छतेच्या कामातही व्हिनेगरचा वापर केला जातो. तुमचा गॅस स्टोव्ह चमकदार करण्यासाठी, थोडं पाणी घ्या त्यात पांढरा व्हिनेगर मिसळा, नंतर हे द्रव स्प्रेच्या मदतीने गॅस स्टोव्हवर लावा. अर्धा तास तसेच ठेवून द्या. नंतर स्पंजच्या मदतीने शेगडी स्वच्छ करा. तुमचा गॅस स्टोव्ह अगदी नवीन दिसू लागेल.

बेकिंग सोडा

ज्या ठिकाणी काळे डाग जमा झाले आहेत. तिथे बेकिंग सोड्याचा वापर करा. त्या ठिकाणी बेकिंग सोडा पसरवून ठेवा. काही वेळ तसेच राहू द्या. शेवटी पाण्याने धुवा. बेकिंग सोडा काळपटपणा घालण्यास मदत करतात. याने शेगडीवरील हट्टी डाग दूर होतील.

गरम पाणी

एका भांड्यात पाणी गरम करा. नंतर गॅस स्टोव्ह किंवा बर्नरवर पाणी टाका. जो पर्यंत पाणी थंड होत नाही. तो पर्यंत गरम पाण्यात बर्नर आणि शेगडी तसेच ठेऊन द्या. अश्याने काळे डाग घालवण्यास सोपे जाईल. त्यानंतर शेगडी चांगले घासून घ्या. गॅस स्टोव्हवरील हट्टी डाग नाहीसे होतील.

टॅग्स :किचन टिप्सस्वच्छता टिप्स