सध्याच्या धावपळीच्या जीवनात रोज काय बनवायचं असा प्रश्न कायमच गृहिणींना पडतो. काहीतरी झटपट, हेल्दी पण सगळ्यांना आवडेल अशी आपली अपेक्षा असते.(Palak matar khichdi) अशा वेळी पालक मटार कॉर्न खिचडी हा एक परफेक्ट पर्याय ठरतो. ही खिचडी केवळ चवीला मस्तच नाही, तर पोषणमूल्यांनीही भरलेली आहे. खिचडी म्हटलं की अनेकांना साधा, फिका पदार्थ आठवतो.(Healthy Indian diet recipes) पण पालक, मटार आणि कॉर्नसारखे पदार्थ एकत्र करुन आपण त्याचा चटपटीत पदार्थ बनवू शकतो. वरुन लाल मिरचीचा तडका, साजूक तुपाची धार आणि पापड. (Weight loss dinner ideas)
विविध भाज्यांमुळे याचं कॉम्बिनेशन खिचडीला केवळ आकर्षक बनवत नाही, तर मुलेही आवडीने खातात. त्यामुळे भाजी न खाणारी मुलं असतील तरी ही खिचडी त्यांच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते.आरोग्याच्या दृष्टीने पाहिलं तर पालक आयर्न, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्सचा उत्तम स्रोत आहे. ही वनपॉट खिचडीची रेसिपी कशी करायची पाहूया.
साहित्य
तांदूळ - १ वाटी
मूगाची डाळ - अर्धी वाटी
तुरीची डाळ - अर्धी वाटी
पाणी - आवश्यकतेनुसार
हळद - २ चमचे
मीठ - चवीनुसार
तूप - १ चमचा
जीरे - १ चमचा
मोहरी - १ चमचा
हिंग - १ चमचा
आलं-मिरची पेस्ट - १ चमचा
लाल मिरची - २
बारीक चिरलेला टोमॅटो - १ छोटी वाटी
उकडलेले हिरवे वाटाणे - १ छोटी वाटी
उकडलेला कॉर्न - १ छोटी वाटी
पालकची प्युरी - १ छोटी वाटी
लिंबाचा रस - १ चमचा
लाल मिरची पावडर - १ चमचा
कृती
1. सगळ्यात आधी तांदूळ, मुगाची डाळ आणि तुरीची डाळ एकत्र करुन स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्यात पाणी घालून भिजण्यास ठेवा. आता कुकरमध्ये भिजवलेले डाळ-तांदूळ, पाणी, हळद आणि मीठ घालून खिचडी शिजवून घ्या.
2. एका पॅनमध्ये तूप, जिरे, मोहरी, हिंग, आलं-मिरची पेस्ट, लाल मिरची, टोमॅटो, मटार, उकडलेला कॉर्न घालून सर्व साहित्य एकजीव करा. त्यात वरुन पालकची प्युरी घालून मिश्रणाला उकळी येऊ द्या. त्यात लाल तिखट आणि खिचडी घाला. वरुन लिंबाचा रस घालून पुन्हा सर्व एकजीव कराय
3. फोडणी पात्रात तूप, जिरे, सुक्या लाल मिरच्या घालून वरुन फोडणी द्या. तयार होईल गरमागरम पालक-मटार दाल खिचडी.
