महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृतीमध्ये 'ठेचा' हा केवळ एक पदार्थ नसून तो एक इमोशन आहे. हिरवी मिरची, लसूण आणि शेंगदाण्यांचा तो झणझणीत ठसका कोणत्याही जेवणाची चव द्विगुणित करतो. पण जर याच गावरान ठेच्याला 'पाव' सोबत एकत्र केले, तर तयार होतो तो म्हणजे 'झणझणीत ठेचा पाव'.(Garlic Thecha Pav street style) वडापाव किंवा मिसळपाव आपण नेहमीच खातो, पण जेव्हा जिभेला काहीतरी वेगळं आणि चटपटीत हवं असतं, तेव्हा 'ठेचा पाव' हा सर्वोत्तम पर्याय ठरतो.(Authentic Marathi Thecha Pav)अनेकांना वाटते की स्ट्रीट फूडसारखी चव घरच्या घरी मिळवणे कठीण आहे, पण १० मिनिटांत तयार होणारी ही रेसिपी अतिशय सोपी आहे. अचानक पाहुणे आले असतील किंवा संध्याकाळच्या वेळी काहीतरी 'स्पायसी' खाण्याची इच्छा झाली असेल, तर साध्या पावाला हा झणझणीत ट्विस्ट देऊन तुम्ही सर्वांना खुश करू शकता. पाहूया 'स्ट्रीट स्टाईल' ठेचा पाव बनवण्याची खास पद्धत!
साहित्य
शेंगदाणे - १ वाटी तेल - २ चमचे चिरलेली हिरवी मिरची - ४ ते ५लसूण पाकळ्या - ७ ते ८ जिरे - १ चमचा मीठ - चवीनुसार उकडलेला बटाटा -१ बारीक चिरलेली शिमला मिरची - १ वाटी कोथिंबीर - आवश्यकतेनुसार बटर - २ चमचे चीज - आवडीनुसार चिली फ्लेक्स - १ चमचा पाव
कृती
1. सगळ्यात आधी तवा गरम करुन त्यावर शेंगदाणे २ ते ३ मिनिटे भाजून घ्या. त्यानंतर तेल घालून चिरलेली हिरवी मिरची भाजा. आता लसूण पाकळ्या, जिरे, मीठ घालून व्यवस्थित परतवून घ्या.
2. मिश्रण थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे, भाजलेले सर्व साहित्य आणि कोथिंबीर घालून वाटण तयार करा.
3. आता उकडलेला बटाटा, शिमाला मिरची, हिरव्या मिरचीचे वाटण, चिली फ्लेक्स घालून सर्व साहित्य एकजीव करा.
4. यानंतर तव्यावर बटर घालून १ चमचा ठेचाचे वाटण घालून पसरवून घ्या. त्यावर पाव ठेवा २ ते ३ मिनिटानंतर पावाला बटर लावून त्यात तयार ठेचा घाला. वरुन चीज आणि चिली फ्लेक्स पसरवून पाव बंद करा. ठेचाचे वाटण पावावर वरुन घालून सॉस सोबत खा.
Web Summary : Transform simple pav into a spicy delight with this quick Thecha Pav recipe. A Maharashtrian favorite, this dish combines the zing of thecha with pav, offering a unique and flavorful snack ready in minutes. Perfect for quick cravings or unexpected guests.
Web Summary : इस त्वरित ठेचा पाव रेसिपी के साथ साधारण पाव को एक मसालेदार आनंद में बदलें। एक महाराष्ट्रीयन पसंदीदा, यह व्यंजन ठेचा के स्वाद को पाव के साथ जोड़ता है, जो मिनटों में तैयार होने वाला एक अनूठा और स्वादिष्ट नाश्ता पेश करता है। झटपट भूख या अप्रत्याशित मेहमानों के लिए बिल्कुल सही।