Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > साध्या पावाला द्या चटपटीत ट्विस्ट! १० मिनिटांत घरच्या घरी करा 'स्ट्रीट स्टाईल' ठेचा पाव; जिभेची चव वाढवणारी सोपी रेसिपी

साध्या पावाला द्या चटपटीत ट्विस्ट! १० मिनिटांत घरच्या घरी करा 'स्ट्रीट स्टाईल' ठेचा पाव; जिभेची चव वाढवणारी सोपी रेसिपी

Garlic Thecha Pav street style: Authentic Marathi Thecha Pav: पाहूया 'स्ट्रीट स्टाईल' ठेचा पाव बनवण्याची खास पद्धत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2026 10:02 IST2026-02-23T09:30:00+5:302026-03-23T10:02:42+5:30

Garlic Thecha Pav street style: Authentic Marathi Thecha Pav: पाहूया 'स्ट्रीट स्टाईल' ठेचा पाव बनवण्याची खास पद्धत!

Spicy Thecha Pav recipe Maharashtrian street food recipes Quick 10 minute snacks with Pav Green chili Thecha for Pav | साध्या पावाला द्या चटपटीत ट्विस्ट! १० मिनिटांत घरच्या घरी करा 'स्ट्रीट स्टाईल' ठेचा पाव; जिभेची चव वाढवणारी सोपी रेसिपी

साध्या पावाला द्या चटपटीत ट्विस्ट! १० मिनिटांत घरच्या घरी करा 'स्ट्रीट स्टाईल' ठेचा पाव; जिभेची चव वाढवणारी सोपी रेसिपी

महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृतीमध्ये 'ठेचा' हा केवळ एक पदार्थ नसून तो एक इमोशन आहे. हिरवी मिरची, लसूण आणि शेंगदाण्यांचा तो झणझणीत ठसका कोणत्याही जेवणाची चव द्विगुणित करतो. पण जर याच गावरान ठेच्याला 'पाव' सोबत एकत्र केले, तर तयार होतो तो म्हणजे 'झणझणीत ठेचा पाव'.(Garlic Thecha Pav street style) वडापाव किंवा मिसळपाव आपण नेहमीच खातो, पण जेव्हा जिभेला काहीतरी वेगळं आणि चटपटीत हवं असतं, तेव्हा 'ठेचा पाव' हा सर्वोत्तम पर्याय ठरतो.(Authentic Marathi Thecha Pav)
अनेकांना वाटते की स्ट्रीट फूडसारखी चव घरच्या घरी मिळवणे कठीण आहे, पण १० मिनिटांत तयार होणारी ही रेसिपी अतिशय सोपी आहे. अचानक पाहुणे आले असतील किंवा संध्याकाळच्या वेळी काहीतरी 'स्पायसी' खाण्याची इच्छा झाली असेल, तर साध्या पावाला हा झणझणीत ट्विस्ट देऊन तुम्ही सर्वांना खुश करू शकता. पाहूया 'स्ट्रीट स्टाईल' ठेचा पाव बनवण्याची खास पद्धत!

भाज्यांच्या सालीत दडलंय गुलाबाच्या सौंदर्याचं गुपित, रोपट्याला येतील भरपूर फुले, सोपा उपाय- उन्हाळ्यात रोप सुकणारही नाही


साहित्य 

शेंगदाणे - १ वाटी 
तेल - २ चमचे 
चिरलेली हिरवी मिरची - ४ ते ५
लसूण पाकळ्या - ७ ते ८ 
जिरे - १ चमचा 
मीठ - चवीनुसार 
उकडलेला बटाटा -१ 
बारीक चिरलेली शिमला मिरची - १ वाटी 
कोथिंबीर - आवश्यकतेनुसार 
बटर - २ चमचे 
चीज - आवडीनुसार 
चिली फ्लेक्स - १ चमचा 
पाव

 

कृती 

1. सगळ्यात आधी तवा गरम करुन त्यावर शेंगदाणे २ ते ३ मिनिटे भाजून घ्या. त्यानंतर तेल घालून चिरलेली हिरवी मिरची भाजा. आता लसूण पाकळ्या, जिरे, मीठ घालून व्यवस्थित परतवून घ्या. 

2. मिश्रण थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे, भाजलेले सर्व साहित्य आणि कोथिंबीर घालून वाटण तयार करा. 

3. आता उकडलेला बटाटा, शिमाला मिरची, हिरव्या मिरचीचे वाटण, चिली फ्लेक्स घालून सर्व साहित्य एकजीव करा. 

4. यानंतर तव्यावर बटर घालून १ चमचा ठेचाचे वाटण घालून पसरवून घ्या. त्यावर पाव ठेवा २ ते ३ मिनिटानंतर पावाला बटर लावून त्यात तयार ठेचा घाला. वरुन चीज आणि चिली फ्लेक्स पसरवून पाव बंद करा. ठेचाचे वाटण पावावर वरुन घालून सॉस सोबत खा. 


Web Title : मसालेदार ठेचा पाव: 10 मिनट में बनने वाली स्ट्रीट-स्टाइल रेसिपी

Web Summary : इस त्वरित ठेचा पाव रेसिपी के साथ साधारण पाव को एक मसालेदार आनंद में बदलें। एक महाराष्ट्रीयन पसंदीदा, यह व्यंजन ठेचा के स्वाद को पाव के साथ जोड़ता है, जो मिनटों में तैयार होने वाला एक अनूठा और स्वादिष्ट नाश्ता पेश करता है। झटपट भूख या अप्रत्याशित मेहमानों के लिए बिल्कुल सही।

Web Title : Spicy Thecha Pav: Quick, flavorful street-style recipe ready in 10 minutes.

Web Summary : Transform simple pav into a spicy delight with this quick Thecha Pav recipe. A Maharashtrian favorite, this dish combines the zing of thecha with pav, offering a unique and flavorful snack ready in minutes. Perfect for quick cravings or unexpected guests.