Join us  

उन्हाळ्यात शरीराला गारवा देते कैरी-खोबऱ्याची चटकमटक चटणी; चवीला चटपटीत - करा ५ मिनिटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2024 11:40 AM

Spicy Raw Mango & Coconut Chutney Recipe : जिभेवर चव रेंगाळेल अशी आंबट-गोड चवीची, कैरी-खोबऱ्याची भन्नाट चटणी..

उन्हाळा (Summer Special) सुरु होताच माणसाची भूक कमी होते. शिवाय सततची तहान शमवण्यासाठी लोकं वारंवार पाणी पीत राहतात; किंवा थंड पेय पितात. पाणी सतत प्यायल्याने पोट भरल्यासारखे वाटते. मुख्य म्हणजे गरमीमुळे आपण मसालेदार आणि जड अन्न खाणं टाळतो. पण जीभेचे चोचले देखील पुरवायचे असतात. जर आपल्या चटकमटक पण हेल्दी काहीतरी खायचं असेल तर, जेवताना तोंडी लावण्यासाठी कैरी-खोबऱ्याची चटणी करून खा (Raw Mango & Coconut Chutney).

कैरी खाण्याचे अनेक फायदे आहेत (Cooking Tips). यामुळे पोटाचे विकार दूर होतात. मुख्य म्हणजे त्यात व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते (Immunity Boost). चला तर हेल्दी पण टेस्टीही अशी चटपटीत कैरी-खोबऱ्याची चटणी कशी करायची? पाहूयात(Spicy Raw Mango & Coconut Chutney Recipe).

कैरी-खोबऱ्याची चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य

कैरी

ओलं खोबरं

हिरवी मिरची

आलं

क्रिस्पी कोथिंबीर वडी खायची आहे? मिसळा त्यात १ चमचाभर गोष्ट-न वाफवता वड्या होतील परफेक्ट

लसूण

कोथिंबीर

मीठ

पाणी

कृती

सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात एक कप ओलं खोबऱ्याचं किस, अर्धा कप कैरीचे तुकडे, २ हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं, ३ ते ४ लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि थोडं पाणी घालून साहित्य एकत्र वाटून घ्या. तयार चटणी एका हवाबंद डब्यात साठवून ठेवा. अशा प्रकारे कैरी-खोबऱ्याची चटपटीत चटणी खाण्यासाठी रेडी. आपण ही चटणी चपाती, पराठा किंवा स्नॅक्ससोबत खाऊ शकता. हवं असल्यास आपण त्यात फोडणी देऊनही खाऊ शकता.

उन्हाळ्यात कैरी का खावी?

केसांची वाढ खुंटली-वेणी शेपटीसारखी दिसते? तांदुळाच्या पाण्यात मिसळा २ गोष्टी; वेणी होईल जाड..

मॉर्निंग सीकनेस, बद्धकोष्ठता, अपचन, शरीरात वाढणारी उष्णता, यासह इतर समस्या सोडवण्यासाठी कैरी फायदेशीर ठरते. आपण कैरीचं लोणचं, पन्हं, कैरीची चटणी किंवा कैरीच्या फोडीला मीठ-मसाला लावून जेवणासोबत खाऊ शकता. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स