Join us

तिखट-आंबटचिंबट कैरी भात, नाव ऐकताच तोंडाला सुटेल पाणी! १५ मिनिटांत होणारा उन्हाळ्यातला पारंपरिक पदार्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2025 17:35 IST

Spicy and sour Kairi Bhat, A traditional summer dish : उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कैरी भात तर खायलाच हवा. पाहा सोपी रेसिपी.

भात म्हणजे भारतीयांचे मुख्य अन्न. रोजच्या आहारात भाताचा समावेश असतो. पण वेगवेगळ्या प्रकारचा भात आपण तयार करतो. (Spicy and sour Kairi Bhat,  A traditional summer dish )तसाच एक मस्त प्रकार म्हणजे कैरी भात. आंब्याचा सिझन सुरू झाल्यावर जर कैरी भात नाही खाल्ला तर तुम्ही मस्त स्वादिष्ट पदार्थाची चव जाणून कशी घेणार? हा भात तयार करायला अगदीच सोपा आहे. पाहा रेसिपी.(Spicy and sour Kairi Bhat,  A traditional summer dish )

साहित्यकैरी, तांदूळ, मीठ, लिंबू, शेंगदाणे, कडीपत्ता, जिरे, उडदाची डाळ, मोहरी, तेल, हिरवी मिरची, हळद, आलं, कोथिंबीर

कृती१. एक कैरी घ्या. छान आंबट कैरी वापरा. (Spicy and sour Kairi Bhat,  A traditional summer dish )सोलाण्याने कैरीची सालं काढून घ्या. कैरी छान बारीक किसून घ्या. काहीजण चिरुन बारीक फोडी करतात. पण किसलेली कैरी भातामध्ये जास्त मिक्स छान होते.  २. तांदूळ धुऊन भात शिजवून घ्या. भात छान मोकळा होईल याची काळजी घ्या. बासमती वापरला तरी चालेल. 

३. एका कढईमध्ये तेल तापत ठेवा. शोंगदाणे परतून घ्या. रंग बदलला की एका ताटलीमध्ये काढून घ्या. नंतर त्याच कढईमध्ये आणखी थोडे तेल घेऊन त्यात मोहरी टाका. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये जिरे घाला. जिरंही छान फुल्ले की मग त्यामध्ये कडीपत्याची पाने घाला. कडीपत्याचा वास छान येतो. उडदाची डाळ घाला. सगळं छान परतून घ्या. मग हिरव्या मिरचीचे तुकडे घाला. आलं घाला. पुन्हा छान परता. फोडणीचा खमंग वास सुटल्यावर त्यामध्ये किसलेली कैरी घाला आणि छान परता.४. कैरी घातल्यावर रंगासाठी हळद घाला. चवीपुरते मीठ घाला. परतलेले शेंगदाणे घाला. लिंबाचा रस पिळा आणि कैरी शिजवून घ्या.

५. कैरी शिजल्यावर त्यामध्ये भात टाका. भात आणि कैरीची फोडणी एकजीव करून घ्या. आणि मग एक वाफ काढा. कोथिंबीर छान बारीक चिरा. भातावरती चिरलेली कोथिंबीर घाला.  

गरमागरम भात खा. तुपावरही तयार करू शकता. तेलाऐवजी तूपाचीही फोडणी करता येते.  हवे असल्यास काजू घाला. सुकामेवा घाला. आवडत असेल तर कांदाही घालू शकता.   

टॅग्स :समर स्पेशलआंबापाककृतीअन्न