Join us  

१ कप पोहे, ५ कप पाणी- करा पोह्याचे पळी पापड, उन्हाचीही गरज नाही-वाळतील सावलीतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2024 3:20 PM

Spiced Poha Papad- Check Out Summer Special papad recipe : कपभर पोह्याचे करा कुरकुरीत पळी पापड

उन्हाळा असो किंवा पावसाळा जेवणासोबत पापड लागतेच (Papad Recipe). घरात बऱ्याचदा पोळी-भाजी केली जात नाही. याव्यतिरिक्त खिचडी केली जाते. खिचडीसोबत तोंडी लावण्यासाठी आपण पापड किंवा लोणचे खातोच (Summer Special). पण अनेकांची पसंती पापडकडे वळते. पापड अनेक प्रकारचे केले जातात. उडीद डाळ, पोहे, रवा, यासह विविध प्रकारचे पापड केले जातात. पण अनेकांना पापड करण्यासाठी वेळ मिळत नाही. किंवा पापड करणे हे किचकट काम वाटते. जर आपल्याला पापड करण्यासाठी वेळ मिळत नसेल तर, कपभर पोह्याचे पळी पापड करून पाहा.

पोह्याचे पळी पापड कमी साहित्यात कमी वेळात तयार होतात. शिवाय उन्हात वाळत घालण्याचीही गरज पडत नाही. जर आपल्याला विकतपेक्षा घरचे पापड खाण्याची इच्छा होत असेल तर, पोह्याचे पळी पापड करून खा(Spiced Poha Papad- Check Out Summer Special papad recipe)

पोह्याचे पळी पापड करण्यासाठी लागणारं साहित्य(Poha papad in Marathi)

पोहे

पाणी

ना गॅस- ना झंझट; चटकमटक चवीचे करा कैरीचे लोणचे; पारंपारिक पद्धत-लोणचे टिकेल वर्षभर

मीठ

पांढरे तीळ

कृती

सर्वप्रथम, एका मोठ्या बाऊलमध्ये एक कप पोहे घ्या. त्यात पाणी घालून पोहे स्वच्छ धुवून घ्या. पोहे स्वच्छ धुतल्यानंतर ५ मिनिटांसाठी भिजण्यासाठी ठेवा. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या. त्यात अर्धा कप पाणी घालून त्याची गुळगुळीत पेस्ट तयार करा.

ताज्या पोळ्या तासाभरात कडक-वातड होतात? कणिक 'या' पाण्याने भिजवा; परफेक्ट चपात्यांचं सिक्रेट

तयार पेस्ट एका भांड्यात काढून घ्या. त्यात २ कप पाणी घालून मिक्स करा. नंतर त्यात पुन्हा २ कप पाणी घाला, आणि भांडं गॅसवर गरम करण्यासाठी ठेवा. गॅस मध्यम आचेवर ठेवा. २ मिनिटानंतर त्यात चवीनुसार मीठ, एक मोठा चमचा पांढरे तीळ घालून चमच्याने सतत ढवळत राहा.

मिश्रण तयार झाल्यानंतर हवेखाली थंड करण्यासाठी ठेवा. प्लास्टिक पेपर घ्या. त्यावर चमचाभर मिश्रण ओतून पसरवा, फॅनखाली किंवा बाल्कनीमध्ये वाळवण्यासाठी ठेवा. पापड पूर्णपणे वाळल्यानंतर एका हवाबंद डब्यात साठवून ठेवा. अशा प्रकारे कपभर पोह्याचे पळी पापड खाण्यासाठी रेडी. पापड तेलात तळल्यास आकाराने दुपट्ट फुलतात. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स