Lokmat Sakhi >Food > दक्षिण भारतातील पारंपरिक रामास्सेरी इडली पोडी, कापसासारखा मऊ-लुसलुशीत पदार्थ, चव ही जबरदस्त

दक्षिण भारतातील पारंपरिक रामास्सेरी इडली पोडी, कापसासारखा मऊ-लुसलुशीत पदार्थ, चव ही जबरदस्त

Breakfast Idea: South indian traditional food : ही मऊ-लुसलुशीत इडली घरी कशी बनवायची पाहूया.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2025 10:41 IST2025-07-15T10:33:47+5:302025-07-15T10:41:51+5:30

Breakfast Idea: South indian traditional food : ही मऊ-लुसलुशीत इडली घरी कशी बनवायची पाहूया.

South India Traditional Ramassery Idli Podi Soft idli breakfast ideas | दक्षिण भारतातील पारंपरिक रामास्सेरी इडली पोडी, कापसासारखा मऊ-लुसलुशीत पदार्थ, चव ही जबरदस्त

दक्षिण भारतातील पारंपरिक रामास्सेरी इडली पोडी, कापसासारखा मऊ-लुसलुशीत पदार्थ, चव ही जबरदस्त

दक्षिण भारतात असे अनेक पदार्थ आहेत जे सकाळच्या नाश्त्यात आवर्जून खाल्ले जातात.(Breakfast Idea) डोसा, सांबार, इडली, मेदूवडा, उत्तपासारखे पोटभरीचे पदार्थ जीभेवर कायम रेंगाळत असतात. सकाळच्या नाश्त्याला गरमागरम वाफाळती इडली खाणं अनेकांना आवडतं.(Ramassery Idli Podi) परंतु, अनेकदा ही इडली घशात फसते-अडकते ज्यामुळे खाताना नकोसे वाटते.(South indian traditional food)
दक्षिण भारतातील केरळ राज्यातील पलक्कड जिल्ह्यातील रामास्सेरी गावात ही इडली पोडी बनवली जाते.(idli recipe) यावर केरळचा प्रसिद्ध मसाला घालून त्याची खासियत पूर्ण केली जाते. ही इडली इतर इडल्यांपेक्षा वेगळी आणि चपट्या आकाराची असते.(morning breakfast idea) या इडलीची चव वाढवण्यासाठी तिला मातीच्या कुंड्यात वाफवण्याची पद्धत आहे. इतकेच नाही तर केरळमधील पलक्कड जिल्ह्यातील रामास्सेरी गावात हा पदार्थ अनेक पिढ्यांपासून बनवला जात आहे. ही मऊ-लुसलुशीत इडली घरी कशी बनवायची पाहूया. 

परफेक्ट डाएट फूड! पचनासाठी हलकी, चविष्ट मसूर डाळ खिचडी, रोज खा- वजन होईल कमी

साहित्य 

इडली रवा - ३ कप 
पाणी
उडदाची डाळ - १ वाटी
मीठ - चवीनुसार 
पोडी - सर्व्हिंगसाठी 
तूप - चमचाभर 


कृती 

1. सगळ्यात आधी एका बाऊलमध्ये इडलीचा रवा घेऊन तो स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर पाणी घालून झाकण ठेवून २ तास भिजत ठेवा. 

2. आता दुसऱ्या भांड्यात उडदाची डाळ स्वच्छ धुवून घ्या. त्यात १ ग्लास पाणी घालून झाकण ठेवून २ तास भिजत ठेवा. त्यानंतर भिजवलेली उडदाची डाळ वाटून त्याचे मिश्रण तयार करा. 

3. वाटलेल्या उडदाच्या डाळीमध्ये भिजवलेला रवा घालून हाताने मिश्रण चांगले एकजीव करा. जास्त पातळ आणि घट्ट असं पिठ नको असायला. या पीठाला रात्रभर भिजत ठेवा. ज्यामुळे मिश्रण चांगले एकजीव होईल. 

4. चमच्याने पीठ चांगले फेटून घ्या. त्यात मीठ घालून पुन्हा एकदा चमच्याने ढवळून घ्या. आता मातीच्या कुंड्यात पाणी घालून त्याला सुती कापडाने बांधा. गॅसवर हे मातीचं भांड ठेवून त्यावर थोडे पाणी शिंपडा. ज्यामुळे कापड ओला होईल. आता त्यावर इडलीचे पीठ पसरवून घ्या. झाकण ठेवून वाफेवर शिजू द्या. 

5. इडली शिजल्यानंतर पानावर काढून त्यावर केरळची प्रसिद्ध पोडी घाला. वरुन चमचाभर तूप घालून खा, केरळची पारंपरिक इडली पोडी. 
 

Web Title: South India Traditional Ramassery Idli Podi Soft idli breakfast ideas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.