Join us
Daily Top 2Weekly Top 5

१५ मिनिटांत सोला किलोभर लसूण, बघा झटपट लसूण सोलण्याच्या भन्नाट ट्रिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2026 16:47 IST

Simple Tips For Peeling Garlic: लसूण सोलण्याचं काम खूप किचकट आणि अवघड वाटत असेल तर पुढे सांगितलेले हे काही उपाय पाहाच...(how to peel garlic or lasun fast?)

भाजी असो, आमटी असो, चटणी असो किंवा मग इतर कोणता दुसरा पदार्थ असो.. त्या पदार्थात जर आपण लसूण घातलं तर त्याची चव नक्कीच जास्त खुलते आणि तो आणखी चवदार होतो. त्यामुळे बहुतांश वेळा तर आपल्या स्वयंपाकात लसूण असताेच. काही घरं अशीही आहेत की तिथे अगदी रोजच्या रोज प्रत्येक पदार्थामध्ये लसूण लागतोच. आता एवढा लसूण रोज लागणार असेल तर तो सोलत बसण्यात अनेकींचा खूप वेळ जातो. वर्किंग वुमन असेल आणि तिला घरात मदतीला दुसरं कोणी  नसेल तर अशावेळी लसूण सोलण्याचं काम खूप किचकट आणि वेळखाऊ होऊन जातं (how to peel garlic or lasun fast?). म्हणूनच आता पुढे सांगितलेल्या काही टिप्स पाहा आणि झटपट लसूण सोला...(simple tips for peeling garlic)

 

लसूण झटपट सोलण्यासाठी खास उपाय

१. लसूण अगदी पटापट सोलायचा असेल आणि त्यासाठी खूप वेळ आणि मेहनत नको असेल तर पुढे सांगितलेला एक मस्त उपाय करा. हा उपाय करण्यासाठी मात्र तुमच्या घरात मायक्रोवेव्ह असायला हवं. तुम्हाला जेवढा लसूण हवा आहे तेवढा घ्या आणि तो सरळ मायक्रोवेव्हमध्ये ठेवून द्या. साधारण १ ते २ लसूण असतील तर त्यासाठी ६० सेकंदाचा वेळ सेट करा आणि लसूण गरम करून घ्या. लसूण जास्त असेल तर वेळ वाढवत न्या. गरम झाल्यानंतर लसणाची सालं अगदी अलगदी निघून येतील. ट्राय करून पाहा..

 

२. दुसरा एक उपायही खूप सोपा आहे. यासाठी एक जाडसर कपडा घ्या किंवा जाड कपड्याची पिशवी घेतली तरी चालेल. त्या पिशवीमध्ये लसूण घाला. यानंतर एक लाटणं घ्या आणि ते लसूण ठेवलेल्या पिशवीवरून थोडा जोर देऊन फिरवा. हा उपाय केल्यानंतर लसणाची सालं मोकळी झालेली दिसतील. हा लसूण हाताने अलगदपणे चोळल्यास सालं पटकन निघून येतात. यापैकी जो उपाय सोपा वाटेल तो करा आणि झटपट लसूण सेाला. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Peel Garlic Quickly: Simple Tricks to Peel Garlic in Minutes

Web Summary : Tired of peeling garlic? Use a microwave for 60 seconds or roll garlic in a thick cloth with a rolling pin. These quick methods easily separate the skin, saving time and effort in the kitchen.
टॅग्स :अन्नकिचन टिप्स