Join us
Daily Top 2Weekly Top 5

बडिशेपमधले खडे निवडणं अवघड जातं? २ सोपे उपाय, मेहनत न करता बडिशेप होईल स्वच्छ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2026 09:40 IST

Simple Method to Clean Fennel Seeds: बडिशेपमधले खडे निवडून बाजुला काढणं अवघड वाटत असेल तर पुढे सांगितलेले काही उपाय करून पाहा...(how to clean fennel seeds easily?)

ठळक मुद्देहे काम खूप जणींना वेळखाऊ आणि मेहनतीचं वाटतं. ते सोप्या पद्धतीने कसं करायचं ते पाहुया..

जेवण झाल्यानंतर खमंग भाजलेली बडिशेप अगदी हमखास खावीशी वाटतेच. काही जणांना तर जेवणानंतर बडिशेप खाण्याची एवढी सवय असते की बडिशेप म्हणजे त्यांना जेवणाचा एक भागच वाटतो. ती जोपर्यंत खात नाही, तोपर्यंत जेवण पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही. अर्थात जेवणानंतर थोडी बडिशेप बारीक चावून खाणंही खूप फायदेशीर असते. कारण त्यात असणारे काही घटक पचनक्रिया आणि चयापचय क्रिया अधिक चांगली होण्यासाठी मदत करतात. त्यामुळे बडिशेप तर खायलाच हवी. पण यात एक मोठी अडचण असते आणि ती म्हणजे बाजारातून आणलेली बडिशेप स्वच्छ निवडून घेणे (Simple Method to Clean Fennel Seeds). हे काम खूप जणींना वेळखाऊ आणि मेहनतीचं वाटतं. ते सोप्या पद्धतीने कसं करायचं ते पाहुया...(how to clean fennel seeds easily?)

 

बडिशेप निवडण्याचं काम सोप्या पद्धतीने कसं करावं? 

बडिशेप निवडताना असं लक्षात येतं की त्यात असणारे खडे खूप लहान असतात. शिवाय ते हिरवट, काळपट रंगाचे असतात. त्यामुळे ते चटकन लक्षात येत नाहीत. आता तांदूळ, डाळी, गहू निवडताना त्यातला काळा खडा लगेच लक्षात येतो.

Summer Special: उन्हाळ्यात आपलं घर थंडगार ठेवतात ३ रोपं, घरात येताच जाणवतो गारवा- हवाही राहील शुद्ध

पण बडिशेपेचं तसं नसतं. त्यामुळे बडिशेप निवडण्याचं काम खूप किचकट होऊन जातं. म्हणूनच पुढे सांगितलेल्या काही ट्रिक्स पाहून एकदा बडिशेप स्वच्छ करून बघा.

त्यातली पहिली गोष्ट म्हणजे एक मोठी पसरट आकाराची परात घ्या. त्या परातीमध्ये बडिशेप घाला आणि आपण धान्य जसं फटकारून घेतो तशीच बडिशेपही फटकारून घ्या.

 

यामुळे जे खडे, काड्या किंवा तिच्यामध्ये जो काही हलका कचरा असेल तो परातीच्या पुढच्या भागात येईल. तो अलगद काढून टाका. असं ४ ते ५ वेळा करून बडिशेप स्वच्छ करून घ्या. बराच कचरा निघून जाईल.

ऐन तारुण्यात तुमचा मेंदू म्हातारा होतोय, 'या' सवयी आजच बदला; नाहीतर अल्झायमर होण्याचाही धोका

यानंतर एक पांढरा मोठा कपडा जमिनीवर अंथरा. त्यावर बडिशेप घाला आणि ती हातानेच पसरवून घ्या. आता त्या पांढऱ्या कपड्यावर बडिशेपमध्ये जे काही उरलेसुरले खडे, काड्या असतील त्या लगेच दिसून येतील. तेवढ्या काढून टाकल्या की झाली तुमची बडिशेप स्वच्छ.. एकदा करून पाहा. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Easily Clean Fennel Seeds: Simple Tricks for a Quick Clean

Web Summary : Cleaning fennel seeds can be tedious. Two simple methods involve using a wide dish to winnow the seeds and spreading them on a white cloth to spot and remove remaining stones and debris, making the process quick and efficient.
टॅग्स :अन्नस्वच्छता टिप्सकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.