श्रावणात विविध सण- उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात.(Shravan Somvar) श्रावण सुरु झाला की, सणांची जशी रेलचेल असते अगदी तशीच काही पदार्थांची.(shravan somvar fasting food) उपवासाच्या पदार्थांपासून विविध पदार्थांची चव श्रावणात चाखली जाते. श्रावण हा महिना प्रामुख्याने व्रत-वैकल्यांचा महिना म्हणून ओळखला जातो. या काळात बऱ्यापैकी लोक उपवास करतात.(jackfruit sheera) उपवास सोडताना अनेकांच्या ताटात गोडाचा पदार्थ हमखास पाहायला मिळतो. (indian dessert for vrat)
शिरा हा प्रामुख्याने नैवेद्याचा प्रसाद म्हणून ओळखला जातो. (vrat sweet dish recipe) सत्यनारायणाची पुजा असो किंवा इतर पूजेत शिऱ्याची चव आपण चाखली असेलच. साखेरचा, गुळाचा, आंब्याच्या किंवा अननसाच्या शिऱ्याची चव आतापर्यंत आपण चाखलीच असेल. (traditional Maharashtrian sweets) पण फणासाच्या शिऱ्याची चव कधी चाखली आहेत का? यंदाच्या श्रावणात उपवास सोडताना नैवेद्यात करा खास फणासाचा शिरा. पदार्थ अचूक होण्यासाठी प्रमाण आणि साहित्य पाहूया. (traditional fasting sweet)
श्रावण स्पेशल: साबुदाणा अजिबात न वापरता करा पचायला हलके उपवासाचे मऊसूत लाडू, आठवडाभर टिकतील
साहित्य
फणसाचे काप- १२ ते १५
तूप - ३ चमचा
पाणी - अडीच कप
केशर पाणी - १ चमचा
भाजलेला रवा - ३/४ कप
साखर - १ कप
वेलची पूड - १/२ कप
ड्रायफ्रुट्स - १/४ कप
कृती
1. सगळ्यात आधी फणासाच्या गरांमधील बिया काढून घ्या. त्यातील ५ ते ६ कापांची मिक्सरमध्ये पेस्ट तयार करा.
2. आता एका पॅनमध्ये तूप घालून त्यावर फणासाची पेस्ट चांगली परतवून घ्या. उरलेल्या फणासाच्या कापांना बारीक चिरा. परतवलेल्या फणासांमध्ये चिरलेल्या कापा व्यवस्थित मिक्स करुन घ्या. वरुन २ कप पाणी घाला. त्यात १ चमचा केशरचे पाणी घालून व्यवस्थित शिजू द्या.
3. यामध्ये वरुन भाजलेला रवा घालून व्यवस्थित ढवळा. आता साखर, वेलची पूड घालून मिश्रण चांगले एकजीव करुन घ्या. तळलेले काजू आणि मनुके घालून मस्त पिवळसर फणसाचा शिरा तयार करा.