श्रावण महिना सुरु झाला असून या काळात अनेक उपवास आणि सण-समारंभ असतात.(shrvan Special) उपवासाच्या दिवशी आपल्याला कायम तेच तेच पदार्थ खाऊन वैताग येतो. पण जिभेचे चोचले पुरवण्यासाठी आपण उपवासाची झणझणीत मिसळ ट्राय करु शकतो.(Shravan Monday food) उपवासाची मिसळ हा एक खास पदार्थ आहे. बटाटे, शेंगदाणे, साबुदाणा यांसारख्या पदार्थांपासून बनवली जाते.(Farali misal recipe) यात विविध मसाले किंवा कांदा घातला जात नाही.(Upvasachi misal recipe) ही मिसळ खास करुन अनेक भागात उपवासाच्या दिवशी बनवली जाते. पुणे- मुंबईसारख्या काही हॉटेल्समध्येही या मिसळची चव चाखायला मिळते.(Indian fasting food ideas)
या मिसळला विविध प्रकारे सर्व्ह केले जाते. गोड-तिखटे प्रमाण किंवा फराळी चिवड्याची सजावट करुन बनवली जाते.(Fasting misal recipe) झणझणीत, हलकी, पोटभरणारी उपवासाची मिसळ कशी बनवायची ते पाहूया, यासाठी लागणारे साहित्य जाणून घ्या.
कोकणातला पारंपरिक पदार्थ काकडी पोहे, पचायला हलका- सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट रेसिपी
साहित्य
ओल्या नारळाचा किस - १ वाटी
भाजलेले शेंगादाणे - १ वाटी
तूप - १ चमचा
जिरे - १ चमचा
कढीपत्ता - ५ ते ६ पानं
हिरवी मिरची - २
भिजवलेले शेंगदाणे - १ छोटी वाटी
उकडलेला बटाटा - १
भिजवलेला साबुदाणा - १ वाटी
दही - अर्धी वाटी
सैंधव मीठ - चवीनुसार
उपवास बटाट्याची भाजी
फराळी चिवडा
कोथिंबीर
डाळिंबाचे दाणे
कृती
1. सगळ्यात आधी आपल्याला ओल्या नारळाचा किस तयार करुन घ्यावा लागेल. त्यानंतर शेंगदाणे भाजून त्याची सालं काढून घ्या. आता मिक्सरच्या भांड्यात नारळाचा किस आणि भाजलेले शेंगदाणे घालून त्याची बारीक पेस्ट तयार करा.
2. आता कढईत तूप गरम करुन घ्या. त्यात जिरे, कढीपत्ता, बारीक चिरलेली हिरवी मिरची घाला. लालसर रंग आल्यानंतर यात तयार केलेले वाटण घाला. त्यात आवश्यकतेनुसार पाणी घाला. चांगली उकळी आल्यानंतर त्यात भिजवून वाफवलेले शेंगदाणे, उकडून मॅश केलेला बटाटा, भिजवलेला साबुदाणा, दही आणि मीठ घालून चांगले मिक्स करा.
3. सर्व्हिंग बाऊलमध्ये उपवासाची बटाटा भाजी, त्यावर तयार मिसळ घाला. वरुन फराळी चिवडा, कोथिंबीर आणि डाळिंबाचे दाणे घालून सर्व्ह करा. झणझणीत - चटकदार उपवासाची मिसळ.