Join us

Shravan Food : साबुदाणा न वापरता करा उपवासाचा बटाटावडा- एकदम कुरकुरीत आणि पोटभरीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2025 10:42 IST

Vrat special snack: Shravan Food : आपल्यालाही उपवासाच्या दिवशी साबुदाणा वडा नसेल खायचा तर कुरकुरीत बटाटावडा नक्की करुन पाहा.

श्रावणात अनेकजण उपवास करतात.(Shravan Food) विविध सण-उत्सव आल्याने पदार्थांची रेलचेल पाहायला मिळते. (Upvasacha Padarth) उपवास कोणताही असला तरी हमखास खाल्ला जाणारा पदार्थ साबुदाणा. साबुदाण्यापासून विविध पदार्थ बनवले जातात.(Batatawada) साबुदाण्याची खिचडी, खीर, वडे, थालीपीठ असे अनेक पदार्थ आपण बनवून खातो. पण खूप जास्त प्रमाणात साबुदाणा खाल्ला तर आरोग्याला त्याचे नुकसान होते. साबुदाणाला पर्याय म्हणून अनेक पदार्थ आहे.(Vrat Special snack)उपवासाच्या दिवशी आपल्याला विविध पदार्थ खाण्याची इच्छा होते. उपवासाच्या दिवशी बटाटा, शिंगाड्याचे- राजगिऱ्याच्या पीठाचे थालीपीठ देखील खातात.(Fasting batata vada recipe) जर आपल्यालाही उपवासाच्या दिवशी साबुदाणा वडा नसेल खायचा तर कुरकुरीत बटाटावडा नक्की करुन पाहा. पदार्थ अचूक होण्यासाठी प्रमाण आणि साहित्य पाहूया. 

कोण म्हणतं घरी मऊ घट्ट पनीर करता येत नाही? पाहा ‘ही’ परफेक्ट पद्धत, पनीर बिघडणारच नाही

साहित्य 

बटाटे - ३ मीठ - चवीनुसार कोथिंबीर - आवश्यकतेनुसार जिरे - १ चमचा हिरवी मिरची पेस्ट - १ चमचा शिंगाडा पीठ - १ वाटी राजगिरा पीठ - १ वाटीलाल तिखट - १ चमचा (हवे असल्यास)पाणी तेल - तळण्यासाठी 

कृती 

1. सगळ्यात आधी कुकरमध्ये ३ बटाटे वाफवून घ्या. कुकर थंड झाल्यानंतर बटाट्याची सालं काढून घ्या. आता बटाट्याला चांगले मॅश करुन घ्या. त्यात चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. आता फोडणी पात्रात तेल गरम करुन त्यात जिरे आणि हिरव्या मिरचीची पेस्ट घालून तडतडू द्या. तयार फोडणी बटाट्याच्या मिश्रणात घाला. नंतर हाताने सगळे मिश्रण एकजीव करा. 

2. तयार बटाट्याच्या मिश्रणाचे गोळे तयार करा. गोळा घऊन चपट्या आकारात वडा बनवा. दुसऱ्या बाजूला वड्यासाठी मिश्रण करताना सगळ्यात आधी बाऊलमध्ये राजगिरा आणि शिंगाड्याचे पीठ घ्या. त्यात हवे असल्यास लाल तिखट घाला, मीठ आणि हळूहळू पाणी घालून पेस्ट तयार करा. ही पेस्ट खूप जाडसर ही नको आणि खूप पातळही नको. 

3. आता कढईत तेल तापवण्यासाठी ठेवा. त्यानंतर तयार पेस्टमध्ये वडा डीप करुन मंद आचेवर तळून घ्या. लालसर झाल्यानंतर तेलातून काढा. दही किंवा हिरव्या चटणीसोबत खा उपवासाचा गरमागरम बटाटावडा. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीश्रावण स्पेशल पदार्थ