श्रावणातील मुख्य आणि पहिला सण नागपंचमी.(Nagpachmi Special) या दिवशी नागाची पुजा केली जाते. नागदेवताला दूध-लाह्यांचा नैवेद्य अर्पण केला जातो.(Shravan 2025) नागपंचमीच्या दिवशी गव्हाची खीर बनवण्याची परंपरा अनेक ठिकाणी आहे.(wheat kheer recipe) या दिवशी नागदेवतेला दूध, लाह्या, गूळ आणि गव्हाची खीर अर्पण करतात. या दिवशी तळणे, कापणे, भाजणे आणि तांदूळ-दूध सारखे पदार्थ खाल्ले जात नाही.(Traditional Indian Maharashtrian sweets) गहू हे आरोग्यदायी अन्नधान्य मानले जाते आणि त्यापासून तयार केलेली खीर ही स्वादिष्ट आणि पौष्टिक असते. (Shravan 2025)
गव्हाची खीर महाराष्ट्रात प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये नागपंचमीच्या दिवशी बनवली जाते.(Easy Indian kheer recipe) तर बहुतेक गावाकडच्या भागांमध्ये अजूनही पारंपरिक सणांमध्ये ही खीर तयार करतात. गव्हाची खीर कशी बनवायची? यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया.(Healthy festival dessert)
प्रांत एक, खाद्य पदार्थ अनेक! नागपंचमीनिमित्त नैवेद्याचे ५ प्रकार, पारंपरिक पदार्थ
साहित्य
गहू - १ वाटी
पाणी
तूप - १ चमचा
गूळ - १ कप
वेलची पूड - १ चमचा
जायफळ - किसलेले
दूध - २ कप
बदामाचे काप
मनुके
सुक्या खोबऱ्याचे काप
कृती
1. सगळ्यात आधी कपभर गहू घेऊन ते नीट चाळून घ्या. म्हणजे यातील घाण निघून जाईल. आता गव्हाला मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर दळून घ्या. दळलेले गहू वाटीमध्ये घेऊन त्यात पाणी घाला. १० मिनिटे झाकून ठेवा, त्यानंतर पाण्यावर घाण तरंगेल. ते पाणी फेकून द्या.
2. आता कढईमध्ये धुतलेले गहू घेऊन त्यात २ ते ३ कप पाणी घाला. वरुन चमचाभर तूप घालून ४ ते ५ शिट्ट्या होऊ द्या. कुकर थंड झाल्यानंतर चमच्याने गहू शिजले आहे की नाही ते पाहा. कुकरमध्ये गूळ घालून वितळवून घ्या. वरुन जायफळ आणि वेलची पूड घाला. दूध घालून खीरीला उकळी येऊ द्या.
3. त्यानंतर तूप गरम करुन त्यात बदाम, मनुके आणि सुक्या खोबऱ्याचे काप तळून खीरीला वरुन फोडणी द्या. तयार होईल नागपंचमी विशेष गव्हाची खीर