गरमागरम पिठलं - भाकरी म्हणजे अस्सल मराठमोळ्या, महाराष्ट्रीयन जेवणाची शान! आपल्या सगळ्यांच्याच घरात काहीवेळा पिठलं - भाकरीचा बेत (Drumstick Besan) आखला जातो. घरातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांचाचं आवडता पदार्थ आहे. खरंतर, पिठलं ही रेसिपी अतिशय साधीसोपी आणि फारच कॉमन (Shengacha Pithle) असली तरी पिठलं तयार करण्याच्या पद्धती (Shevga Chya Shengacha Pithla) आणि प्रकार वेगवेगळे असतात. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने पिठलं तयार केल जात. असाच काहीसा पिठल्याचा अत्यंत लोकप्रिय आणि पौष्टिक प्रकार म्हणजे शेवग्याच्या शेंगांच पिठलं(How To Make Drumstick Pithla At Home).
साध्या पिठल्याला जेव्हा शेवग्याच्या शेंगांची साथ मिळते, तेव्हा त्याची चव आणखीनच खुलून येते. शेवग्याच्या शेंगांचं पिठलं हा पारंपरिक चवीचा, पौष्टिकतेनं भरपूर आणि पोटभरीचा असा उत्तम पदार्थ आहे. शेवग्याच्या शेंगांमध्ये प्रोटीन, आयरन, कॅल्शियमसारखे पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात, त्यामुळे या शेंगा फक्त चविष्टच नाही, तर आरोग्यासाठीही अत्यंत उपयुक्त ठरतात. गावरान पद्धतीनं तयार केलेलं गरमागरम शेवग्याच्या शेंगांच पिठलं भाकरीसोबत असो किंवा गरम भातासोबत - त्याची चव प्रत्येक घासात अनुभवायला मिळते. अगदी सोप्या पद्धतीनं शेवग्याच्या शेंगांच चविष्ट पिठलं कसं करायचं याची रेसिपी पाहूयात.
साहित्य :-
१. शेवग्याच्या शेंगा - १ कप २. पाणी - गरजेनुसार३. मीठ - चवीनुसार ४. बेसन - १ काप (कोरड भाजून घेतलेलं)५. तेल - ३ ते ४ टेबलस्पून ६. हिंग - चिमूटभर ७. मोहरी - १/२ टेबलस्पून ८. हळद - १/२ टेबलस्पून ९. लाल मिरची पावडर - १ टेबलस्पून १०. लसूण पाकळ्या - २ टेबलस्पून (बारीक चिरलेल्या)
कढी फुटते-पांचट लागते-बेसनाच्याही गुठळ्या होतात? टाळा ४ चुका, कढी होईल फक्कड...
कपभर मुरमुऱ्यांचा करा इन्स्टंट मेदू वडा! चविष्ट आणि पौष्टिक ब्रेकफास्ट फक्त १५ मिनिटांत...
कृती :-
१. सगळ्यांतआधी एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊन त्यात चवीनुसार मीठ घालावे. पाण्याला हलकी उकळी आली की यात सालं काढून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा उकडवण्यासाठी घालाव्यात. ४ ते ५ मिनिटे या शेंगा गरम पाण्यांत हलक्याशा उकळवून घ्याव्यात. २. कढईत बेसन घेऊन २ ते ३ मिनिटे कोरडं भाजून घ्याव. ३. आता एका भांड्यात तेल घेऊन त्यात फोडणीसाठी मोहरी, हिंग, लाल मिरची पावडर, हळद घालावी. खमंग अशी फोडणी तयार करून घ्यावी. फोडणी तयार झाल्यावर यात उकडवून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा घालाव्यात. फोडणीत या शेंगा खरपूस परतवून घ्याव्यात. ४. आता भाजून घेतलेल्या बेसन पिठात गरजेनुसार पाणी घालून त्याची पातळसर पेस्ट तयार करून घ्यावी. यात गुठळ्या राहिल्या असतील तर त्या मोडून घ्याव्यात. ५. त्यानंतर खमंग तयार केलेल्या फोडणीत हे पाण्यांत कालवलेले बेसन पीठ घालावे. व्यवस्थित चमच्याने हलवून सगळे जिन्नस मंद आचेवर व्यवस्थित शिजवून घ्यावे.
लालचुटूक टोमॅटोचे भरीत एकदा खाऊन पाहा, चव लय भारी! पाहा टोमॅटोच्या भरीताची मस्त रेसिपी...
५. या पिठल्यात आपण चवीनुसार मीठ आणि थोडे पाणी घालून हवे तसे पातळ किंवा घट्ट करु शकता. पिठले चमच्याने सतत हलवत राहून शिजवून घ्यावे. ६. एका भांड्यात तेल, बारीक चिरलेल्या लसूण पाकळ्या, लाल मिरची पावडर अशी खमंग फोडणी तयार करावी. ही तयार फोडणी सगळ्यांत शेवटी पिठलं व्यवस्थित शिजल्यावर वरून ओतावे आणि पुन्हा चमच्याने हलवून घ्यावे.
गरमागरम शेवग्याच्या शेंगांच चविष्ट आणि पौष्टिक पिठलं खाण्यासाठी तयार आहे. वाफाळता भात, टम्म फुगलेली भाकरी किंवा चपाती आणि तोंडी लावायला म्हणून कांदा, शेंगदाण्याची झणझणीत चटणी असा सुंदर बेत करता येऊ शकतो.