चमचमीत खानदेशी जेवण सगळ्यांनाच फार आवडते. सगळ्यांनाच ते झेपत नाही, कारण ते फारच तिखट असते. मात्र चवीला फारच सुंदर असते. (Shevechi Bhaji - sparkling sauce! Check out the recipe)अनेक खानदेशी पदार्थ महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय आहेत मात्र एक असा पदार्थ आहे जो सगळीकडेच तयार केला जातो. तो म्हणजे शेवेची भाजी. हा पदार्थ आवडत नाही असे अगदी मोजके लोक असतील. अत्यंत चमचमीत आणि फ्लेवरफुल अशीही भाजी असते. तयार करायलाही तशी सोपीच आहे. (Shevechi Bhaji - sparkling sauce! Check out the recipe)आपण शेवभाजीसाठी शेव विकत आणतो मात्र भाजीसाठी लागणारी शेव घरी तयार करणे अगदीच सोपे आहे. पाहा रेसिपी.
शेव तयार करण्यासाठी साहित्य
बेसन, गरम मसाला, लाल तिखट, हळद, मीठ, तेल, पाणी
कृती
१. एका परातीमध्ये बेसन घ्या. चांगले चाळून घ्या. त्यामध्ये थोडासा गरम मसाला घाला. लाल तिखट जरा जास्त घाला कारण ही भाजी तिखट असते. तसेच चवीनुसार मीठ घाला. थोडी रंगासाठी हळद घाला.
२. सगळं एकजीव करा मग त्यामध्ये तेल गरम करून घाला. मोहन घालून झाल्यावर त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्या. पातळ करू नका. घट्ट पीठ मळा.
३. शेव पाडायला शेव यंत्राचा वापर करा. त्यामध्ये पीठ भरा आणि मग गरम तेलामध्ये हळूहळू शेव पाडून घ्या. छान रंग येईपर्यंत तळून घ्या.
भाजीसाठी साहित्य
कांदा, मिरची, कोथिंबीर, जिरं, कडीपत्ता, आलं, लसूण, हळद, लाल तिखट, पाणी, तेल, खोबरं, टोमॅटो, लिंबू
कृती
१. खोबरं छान परतून घ्या. जरा रंग बदलला की ताटलीत काढून घ्या. त्याच कढईमध्ये थोडेसे तेल घाला. त्यावर जिरं घाला. ते तडतडलं की मग चिरलेला कांदा घाला. कांदा थोडा परतला की चिरलेला टोमॅटो घाला. लसणाच्या पाकळ्या घाला. आल्याचे तुकडे घाला. सगळं छान परतून घ्या. नंतर गार करत ठेवा.
२. गार झाल्यावर परतलेलं खोबरं तसेच कांदा टोमॅटोचे मिश्रण एकत्र करून त्याचे वाटण तयार करून घ्यायचे. अगदी नावाला पाणी वापरा म्हणजे सगळं एकजीव वाटलं जातं.
३. एका कढईमध्ये थोडे तेल घ्या. त्यामध्ये जिरं, कडीपत्ता घाला आणि छान परतून घ्या. नंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदाही घाला. तो गुलाबी होईपर्यंत परतून घ्या. सगळं छान परतून झाल्यावर त्यामध्ये लाल तिखट घाला. हळद घाला. मीठ घाला. सगळं दोन मिनिटे शिजवा. मग त्यामध्ये तयार वाटण घाला. आणि पाणी घालून भाजी उकळून घ्या.
४. जरा घट्टपणा आल्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर वरतून घाला. लिंबाचा रस पिळा आणि मग तयार केलेली शेव वरतून घाला. किंवा ताटात शेव घेऊन त्यावर रस्सा टाका.