आज काय बनवू हा प्रश्न अनेक गृहिणींना पडतो. गवाराची भाजी म्हटली की अनेकजण नाक मुरडतात. अनेक घरांमध्ये भाजी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते.(Gavar batata bhaji) कोणी तू सुकी भाजी करतं, तर कोणी रस्सा भाजी करतं. पण अनेकदा गवारीची भाजी बनवल्यानंतर तर हॉटेलसारखी किंवा लग्नाच्या पंगतीत वाढली जाते तशी चविष्ट का लागत नाही? (Cluster beans potato curry)
अनेकदा आपण ग्रेव्ही घट्ट करण्यासाठी शेंगदाण्याचा कूट किंवा खोबऱ्याचे वाटण घालतो. पण शेवेचे वाटण घातलं तर भाजीला वेगळी चव मिळते.(Sev masala recipe) शेवेमुळे भाजीला येणारी खमंग चव आणि मसाले भाजीची चव वाढवतात. जाणून घेऊया साध्या गवारीला 'शाही' स्वरूप देणारी ही सोपी आणि झणझणीत रेसिपी. पाहूया साहित्य आणि कृती. (Traditional Marathi recipe)
साहित्य
गवार-२५० ग्राम
बटाटे-२
तेल-४ चमचे
लसणाची चटणी
लसूण-७–८ पाकळ्या
मिरची पावडर-१ टीस्पून
मीठ-२ चिमूट
भाजलेले शेंगदाणे-२ चमचे
भाजलेले तीळ-१ टेबलस्पून
जाडी शेव / फरसाण-२–३ टेबलस्पून
बेडगी मिरची पावडर-१ टीस्पून
हळद-¼ टीस्पून
धने पूड-१ टीस्पून
गरम मसाला पावडर-½ टीस्पून
पाणी -
तेल - चमचे
जिरे - टीस्पून
हिंग-¼ टीस्पून
तयार मसाला पेस्ट
तयार लसणाची चटणी
किसलेला टोमॅटो - लहान
मीठ चवीनुसार
तयार सुके वाटण
परतलेली गवार
परतलेला बटाटा
गरम पाणी-१ कप
चिरलेली कोथिंबीर
कृती
1. सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यात भाजलेले तीळ, शेव आणि भाजलेले शेंगदाणे वाटून त्याची पावडर करा. नंतर याच मिक्सरच्या भांड्यात लसूण पाकळ्या, लाल तिखट आणि मीठ घालून पुन्हा पेस्ट तयार करा.
2. आता एका प्लेटमध्ये हळद, लाल तिखट, धने पूड, गरम मसाला आणि पाणी घालून पेस्ट तयार करा. कढईत तेल गरम करुन त्यात गवार आणि बटाटे वेगवेगळे परतवून घ्या.
3. या तेलामध्ये जिरे, हिंग, लाल मसाल्याची पेस्ट घालून चमच्याने ढवळून घ्या. मसाला घट्ट झाल्यानंतर त्यात वाटलेली लसणाची पेस्ट घाला. मिश्रण छान एकजीव करा. चिरलेला टोमॅटो घालून मिश्रण परतवून घ्या. वरुन त्यात परतलेली गवार, बटाटे आणि शेवेचे वाटण , मीठ व पाणी घालून पुन्हा एकदा मिश्रण एकजीव करा.
4. ५ ते १० मिनिटे झाकण झाकून ठेवा. भाजीला उकळी आल्यानंतर वरुन कोथिंबीर घाला. गरमागरम चपाती किंवा फुलक्यासोबत खा. चमचमीत गवार- बटाटा भाजी.
