चैत्रामध्ये मान हा चैत्र गौरीचा. गावोगावी घरोघरी गौरीची स्थापना केली जाते. छान नैवेद्य दाखवला जातो. देऊळांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. (see the authentic Marathi traditional recipe for Panhe)चैत्र महिना म्हणजे मराठी महिन्यापैकी पहिलाच. त्यामुळे वर्षाची सुरवात उत्साहात तसेच आनंदात व्हावी यासाठी चैत्रातील सणांना फार महत्व आहे. चैत्रमासी ही गौराई थाटामध्ये एका पितळी पाळण्यामध्ये स्थानापन्न होते. सगळीच पाळण्यात बसवतात असे नाही. गळ्यामध्ये मंगळसूत्र तसेच छान वस्त्राने गौर सजवली जाते. पंचामृताचा प्रसाद दाखवला जातो. तसेच विविध फळांची आरास रचली जाते. महिनाभर या देवीची पुजा केली जाते. (see the authentic Marathi traditional recipe for Panhe)त्यामुळे प्रत्येक घरी देवी बसत नाही. ज्यांना महिनाभर नियम पाळून पूजा करता येईल तेच ही गौर बसवतात. इतरांना हळदी कुंकवासाठी बोलवतात.
चैत्र आला की आंबा मोहरायला सुरवात होते. त्यामुळे चैत्र गौरीच्या प्रसादाला आंब्याचे पदार्थ केले जातात. आंबे डाळ तर असतेच. चैत्राचे दिवस जरी प्रसन्न असले तरी उन प्रचंड असते. अशा उन्हामध्ये गारेगार छान पन्हे प्यायला मिळाले तर मग आनंदच आहे. त्यामुळे चैत्र गौरीच्या हळदी कुंकवाला पन्ह्याचे वाटप केले जाते. पाहा त्यासाठीची परफेक्ट रेसिपी काय आहे.
साहित्य
कैरी, पाणी, साखर, वेलची पूड
एक वाटी आंब्याचा गर असेल तर त्याला ३ वाटी साखर लागते. साखरेऐवजी गूळही वापरू शकता, छान लागतो. तसेच काही जण यामध्ये पुदिनाही वापरतात. मात्र पारंपारिक पाककृतींमध्ये पुदिन्याचा उल्लेख नाही. चवीला तो चांगलाच लागतो.
कृती
१. कैरी उकडून घ्या. चांगल्या ४ ते ५ शिट्या काढून घ्या. कुकरमध्येच शिजवा म्हणजे छान मऊ होईल.
२ .कुकर उघडलात की एका पातेल्यामध्ये पाणी घ्या. त्यामध्ये शिजवलेल्या कैऱ्या टाका. त्या जरा गार होऊ द्या. काही जण सालं काढूनही कैरी शिजवतात.
३. कैरी गार झाल्यावर तिचा गर पूर्णपणे काढून घ्या. साल आणि कोय काढून टाका. सगळा अर्क त्या पाण्यामध्ये काढून घ्या.
४. मिक्सरमधून ते छान वाटून घ्या. सगळं एकजीव झाल्यावर त्यामध्ये साखर घाला. गरजेचे असेल तेवढे पाणी घाला. पुन्हा छान वाटून घ्या. छान घट्ट अर्क तयार करा. वरतून वेलची पूड घाला.
५. एका हवा बंद बाटलीमध्ये साठवा. पन्हे तयार करताना हा अर्क तसेच मीठ, पाणी घालून ढवळून घ्या मग आस्वाद घेत प्या.