मुलांच्या डब्यात काय द्यायचं असा प्रश्न प्रत्येक आईला पडतो.(Quick tiffin recipes for busy mornings) बाहेरचे चटकदार पदार्थ खाऊन मुलांना घरचे जेवण नकोसे वाटते.(Quick veg roll with poha tikki) त्यामुळे जेवताना ते अधिक नखरे करु लागतात. मुलांच्या शाळेचा डबा हा अगदी हेल्दी आणि पौष्टिक असावा यासाठी त्या नेहमीच प्रयत्न करत असतात.(No-fry wrap recipe for lunchbox) कामाच्या गडबडीत मुलांना ब्रेड-बटर, सॅण्डविच किंवा ब्रेड-जाम सारखे पदार्थ खाऊ घातले तर त्यांना पुरेसे पोषणही मिळत नाही ना त्यांची व्यवस्थित वाढ होते. (15-minute healthy tiffin wrap)
मुलांना टिफिनमध्ये रोज नवनवीन पदार्थ हवे असतात. जर आपली मुले सुद्धा खाताना नाटक करत असेल तर त्याच्यासाठी हेल्दी व्हेज रॅप पोहा टिक्की नक्की ट्राय करु बघा.(High energy tiffin food for kids) यामध्ये चपाती, विविध भाज्या आणि पोहे- ओट्ससारखे घटक असल्यामुळे त्यांना पोषण मिळेल. तसेच ते आवडीने खातील, पाहूया व्हेज रॅप पोहा टिक्कीची सोपी रेसिपी.(Fiber-rich wrap recipe for kids)
साहित्य
पोहे - १ कप
ओट्स - अर्धा कर
उकडलेले बटाटे - २
चिरलेला कांदा - १
कोथिंबीर
मॅश केलेला कॉर्न - १/४ कप
हळद - अर्धा चमचा
लाल मिरची पावडर - अर्धा चमचा
चाट मसाला - अर्धा चमचा
चवीनुसार मीठ
कॉर्नफ्लोर - १ चमचा
लिंबाचा रस
कृती
1. सगळ्यात आधी एका बाऊलमध्ये पोहे आणि ओट्स घेऊन पाण्यात ५ मिनिटे भिजत ठेवा.
2. त्यानंतर त्यातील सर्व पाणी काढून वरील सर्व साहित्य एकत्र करा.
3. मिश्रण चांगले मॅश करुन मळून घ्या. आता त्याची टिक्की तयार करुन घ्या.
4. कढईत तेल घालून दोन्ही बाजूंनी तळून घ्या.
5. आता चपाती घेऊन त्याच्या एका बाजूला सॅलड तर दुसऱ्या भागावर टिक्की ठेवा. त्यावर चिजी, सॉस आणि आवडीचे पदार्थ घालून टोस्ट करुन घ्या.
6. मुलांना आवडणारा हेल्दी व्हेज रॅप पोहा टिक्की होईल पटकन तयार