नाश्त्याला रोज वेगळं आणि तरीही चविष्ट काय करायचं असा प्रश्न पडतो. पोहे, उपमा, इडली, शिरा खाऊन कंटाळा येतो. कधीतरी आपण थालीपीठ करतो.(Weight loss thalipeeth recipe) याची देखील चव अनेक प्रकारे चाखता येते. भाजणीचे, डाळीचे, रव्याचे, ज्वारी-बाजरी अशा विविध प्रकारे थालीपीठ खाता येते.(Oats dudhi thalipeeth recipe) महाराष्ट्रातील अनेक भागात थालीपीठ आवडीने खाल्ले जाते.(Healthy thalipeeth for breakfast) हा पदार्थ अनेकांचा विक पॉईंट असतो. गरमागरम थालीपीठावर लोण्याचा गोळा आणि दही याचे कॉम्बिनेशन जगभरात प्रसिद्ध आहे. (High fiber breakfast Indian)विविध डाळी आणि धान्ये वापरुन केले जाणारे थालीपीठ हे चवीला चांगले तर असतेच सोबत पोट देखील भरते.(Gluten free thalipeeth at home) पण अनेकदा भाजणी करायला वेळ मिळत नाही अशावेळी झटपट पण सोप्या पद्धतीचे थालीपीठ करायचे असेल तर ओट्सचे थालीपीठ करु शकतो.(Easy Maharashtrian thalipeeth recipe) जे चवीला उत्तम आणि आरोग्यासाठी पौष्टिक आहे, कसे बनवायचे पाहूया.
४ दिवस टिकणारी खमंग खुसखुशीत मुगडाळ पुरी, नाश्त्यासाठी करा झटपट पदार्थ
साहित्य
किसलेला दुधीभोपळा- १ वाटीलसूण - ५ ते ६ पाकळ्याहिरवी मिरची - २ ते ३बडीशेप - १ चमचाज्वारीचे पीठ- १ कप बाजरीचे पीठ - अर्धा कपबेसन - २ चमचेतांदळाचे पीठ - २ चमचे ओट्सचे पीठ - १/४ कप बारीक चिरलेला कांदा - १ कपकोथिंबीर धनेपूड - १ चमचा जिरेपूड - १ चमचा हळद - १ चमचा तीळ - १ चमचा मीठ - चवीनुसार तूप
कृती
1. सगळ्यात आधी दूधीभोपळा सोलून किसून घ्या. त्यानंतर लसूण, हिरवी मिरची आणि बडीशेप मिक्सरमध्ये वाटून घ्या.
2. आता एका बाऊलमध्ये ज्वारी-बाजरीचे पीठ, बेसन, तांदळाचे आणि ओट्सचे पीठ घ्या.
3. यामध्ये कांदा,वाटलेले वाटण, कोथिंबीर, धनेपूड, जिरेपूड, हळद, तीळ, मीठ घालून पीठ मळून घ्या.
4. पीठ मळून झाल्यानंतर ताट किंवा पोळपाटावर कापड ठेवून पीठाचा गोळा घ्या. हाताला पाणी लावून थालीपीठ थापा.
5. थालीपीठ थापल्यानंतर त्याला मध्ये मध्ये खड्डे करा. तवा गरम झाल्यानंतर त्यावर हे थालीपीठ चांगले भाजून घ्या.
6. वरुन तूप घालून दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजा. दही किंवा लोण्याच्या गोळ्यासोबत खा गरमागरम चविष्ट थालीपीठ.