Lokmat Sakhi >Food > School Tiffin box Recipe: मुलांचा लंच बॉक्स होईल हेल्दी! झटपट करा आचारी पनीर टिक्का पराठा, डब्यासाठी खास खाऊ

School Tiffin box Recipe: मुलांचा लंच बॉक्स होईल हेल्दी! झटपट करा आचारी पनीर टिक्का पराठा, डब्यासाठी खास खाऊ

Achaari Paneer Tikka Paratha recipe: School tiffin paratha recipe: Tiffin box paneer paratha: पंधरा मिनिटांत होणारी सोपी रेसिपी आचारी पनीर टिक्का पराठा कसा बनवायचा पाहूया.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2025 13:58 IST2025-06-04T13:57:14+5:302025-06-04T13:58:03+5:30

Achaari Paneer Tikka Paratha recipe: School tiffin paratha recipe: Tiffin box paneer paratha: पंधरा मिनिटांत होणारी सोपी रेसिपी आचारी पनीर टिक्का पराठा कसा बनवायचा पाहूया.

school tiffin box recipe how to make Aachari panner tikka paratha at home tasty and yummy recipe | School Tiffin box Recipe: मुलांचा लंच बॉक्स होईल हेल्दी! झटपट करा आचारी पनीर टिक्का पराठा, डब्यासाठी खास खाऊ

School Tiffin box Recipe: मुलांचा लंच बॉक्स होईल हेल्दी! झटपट करा आचारी पनीर टिक्का पराठा, डब्यासाठी खास खाऊ

जून महिना सुरु झाला की मुलांच्या शाळेची तयारी सुरु होते. अगदी वह्या-पुस्तकांपासून शाळेच्या टिफिन बॉक्सपर्यंत. (Easy lunchbox paneer paratha)यंदाच्या वर्षी नवीन टिफिन बॉक्स हवा असा हट्ट देखील मुलं करतात. पण शाळेचा डबा हे टेन्शन आईच्या डोक्यावर असते.(Homemade stuffed paratha recipe) पुन्हा तोच प्रश्न आज डब्यात काय बरं द्यायचे. मुलांना पोषण मिळावे यासाठी आई स्वयंपाकघरात रोज नवनवीन प्रयोग करत असते.(Achaari Paneer Tikka Paratha recipe)
शाळेच्या डब्यात खरेतर मुलांच्या आवडीचे पदार्थ द्या, पण तेच तेच पदार्थ खाऊन त्यांना देखील कंटाळा आला असेल तर आचारी स्टाइल पनीर टिक्का पराठा बनवू शकता.(Tasty and healthy paneer paratha for kids) सतत ब्रेड-पिझ्झा आणि मैद्याचे पदार्थ खाऊन मुलांच्या वाढीवर परिणाम होतो. अशावेळी चपातीचा पराठा हेल्दी पर्याय असेल. पदार्थाच्या चवीमुळे मुले अधिक आवडीने खातील.(Paneer paratha recipe for school lunch) अगदी पंधरा मिनिटांत होणारी सोपी रेसिपी आचारी पनीर टिक्का पराठा कसा बनवायचा पाहूया. 

टिफिन बॉक्ससाठी झटपट पर्याय, मऊ लुसलुशीत बटाटा-पालक पराठा, आवडीचा चटपटीत पदार्थ

साहित्य 
पनीरचे लहान तुकडे - १ कप 
लाल-पिवळी-हिरवी सिमला मिरची - १ कप 
चिरलेला कांदा - १ कप 
दही - १ मोठा चमचा 
सत्तू पावडर - १ चमचा 
आले-लसूण पेस्ट - १ चमचा 
बारीक चिरलेली हिरवी मिरची - २ ते ३
लाल मिरची पावडर - १ चमचा 
हळद - १ चमचा 
जिरे पावडर - १ चमचा
गरम मसाला - १ चमचा 
चिरलेला कोथिंबीर 
लोणचे मसाला 
बटर 


कृती 

1. सगळ्यात आधी एका बाऊलमध्ये पनीरचे तुकडे, बारीक चिरलेली सिमला मिरची, कांदा आणि वरील सर्व मसाले एकत्र करुन मॅरिनेट करायला ठेवा. 

2. आता पॅनमध्ये बटर घालून तयार केलेले मसाला पनीर घालून चांगले फ्राय करा. 

3. त्यानंतर मोहरीच्या पेस्टमध्ये थोडे दही आणि कोथिंबीर घालून सॉस तयार करा. 

4. चपाती घेऊन त्याला तयार सॉस एका बाजूने पसरवा. त्यावर पनीरचे मिश्रण घाला. वरुन चीज आणि कांदा पसरवा. 

5. चपाती दुसऱ्या बाजूने फोल्ड करुन सॅण्डविच मेकरमध्ये टोस्ट करुन घ्या. वरुन बटर किंवा तूप लावून टोस्ट करा. 

6. तयार होईल टेस्टी आणि यम्मी असा  आचारी पनीर टिक्का पराठा, मुले आवडीने खातील. 

 

Web Title: school tiffin box recipe how to make Aachari panner tikka paratha at home tasty and yummy recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.