Join us

पालकाच्या भाजीला मुलं नाक मुरडतात? क्रिमी चिज स्पिनॅच कॉर्न टोस्ट द्या, अवघड नावाची पौष्टिक रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2025 17:41 IST

school tiffin box : lunch box recipes for kids : Cheesy, Easy Spinach & Corn Toast Recipe : Cheesy Spinach and Corn Sandwich : Spinach Corn Cheese Sandwich : मुलं पालकच्या भाजीला नको म्हणतात, मग करा हा साधासोपा इन्स्टंट पदार्थ, पाहा खास रेसिपी...

सध्या मुलांची शाळा सुरु होऊन अगदी काहीच दिवस सुरु झाले आहेत. आता मुलांना डब्यांत रोज नवीन काय द्यावं हा प्रश्न प्रत्येक आईला पडतोच. मुलांना पोळी - भाजी डब्यांत दिली तर काहीवेळा डबा अगदी तसाच परत आणला जातो. मुलांच्या आवडीची भाजी नसली किंवा पोळी - भाजी खायला आवडत नाही म्हणून मुलं डबा खात (Cheesy, Easy Spinach & Corn Toast Recipe) नाहीत. यातही डब्यासाठी हिरव्या पालेभाज्या द्यायच्या म्हटलं तर मुलं नाकं (Cheesy Spinach and Corn Sandwich) मुरडून डबा नकोच म्हणतात. हिरव्या पालेभाज्या खायला  लहान मुलांना फारशा आवडत नाहीत. अशा परिस्थितीत, आपण मुलांना नेहमीच्याच पदार्थांना थोडा ट्विस्ट देत काहीतरी वेगळं पण पौष्टिक असे पदार्थ तयार करून देऊ शकतो(Spinach Corn Cheese Sandwich).

पालकाची हिरवी पालेभाजी म्हटलं की घरातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत कुणाला फारशी आवडत नाही. अशावेळी आपण क्रिमी स्पिनॅच कॉर्न टोस्ट झटपट तयार करू शकतो. सकाळचा नाश्ता किंवा मुलांच्या डब्यासाठी देखील आपण हा साधासोपा पण पौष्टिक असा पदार्थ झटपट तयार करु शकतो. यामुळे मुलांना काहीतरी वेगळं खाण्याचा आणि आपल्याला मुलांनी काहीतरी पौष्टिक व हेल्दी खाल्ल्याचा असा दुहेरी आनंद मिळेल. क्रिमी स्पिनॅच कॉर्न टोस्ट घरच्याघरीच तयार करण्याची सोपी रेसिपी पाहूयात.         

साहित्य :- 

१. बटर - २ ते ३ टेबलस्पून २. लसूण - २ टेबलस्पून (बारीक चिरलेला)३. कांदा - १ कप (बारीक चिरलेला)४. मक्याचे दाणे - १ कप ५. ओरेगॅनो - १ टेबलस्पून ६. चिली फ्लेक्स - १ टेबलस्पून ७. मीठ - चवीनुसार८. काळीमिरी पूड - १/२ टेबलस्पून९. मैदा - १/२ कप १०. दूध - १ कप ११. पालक - १ कप (पालकाची पाने बारीक चिरलेली)१२. चीज - १ क्यूब १३. ब्रेड स्लाइस - ६ ते ७ स्लाइस 

फणस कापा की बरका? ओळखण्यासाठी फक्त ६ टिप्स, अंदाज चुकणार नाही! गरे खा पोटभर...

चक्क ग्लासमध्ये करा विकतपेक्षा भारी खमण ढोकळा घरीच! पाहा ‘ग्लासातल्या ढोकळ्याची’ रेसिपी, शाळेचा डबा स्पेशल...

कृती :- 

१. सगळ्यात आधी एका मोठ्या पॅनमध्ये बटर घेऊन ते व्यवस्थित वितळवून घ्यावे. त्यानंतर त्यात बारीक चिरलेला लसूण, कांदा, मक्याचे दाणे, ओरेगॅनो, चिली फ्लेक्स, काळीमिरी पूड व चवीनुसार मीठ घालावे.२. आता सगळे जिन्नस चमच्याने हलवून एकजीव करून घ्यावे. हे मिश्रण हलकेच पॅनवर परतवून घ्यावे. ३. या मिश्रणात मैदा व दूध घालावे. आता हे मिश्रण चमच्याने सतत हलवत राहावे. या मिश्रणात चीज देखील किसून घालावे त्यानंतर मिश्रणाला हळूहळू घट्टपणा येऊ लागेल आणि ते मिश्रण क्रिमी दिसू लागेल. 

ज्वारीच्या भाकरीला द्या थोडा ट्विस्ट आणि करा झटपट मसाला फुलका रोटी - करायला सोपी चवीला अप्रतिम!

४. मिश्रण हलकेच शिजवून घ्यावे. सगळ्यात शेवटी या मिश्रणात पालकची पाने बारीक चिरून घालावीत. २ ते ३ मिनिटे हे मिश्रण मंद आचेवर ठेवून शिजवून घ्यावे. तयार मिश्रण एका बाऊलमध्ये काढून घ्यावे. ५. आता ब्रेड स्लाइस घेऊन त्यावर दोन्ही बाजूने थोडे बटर लावून ब्रेड स्लाइस खरपूस भाजून घ्यावा. या भाजलेल्या ब्रेड स्लाइसवर तयार क्रिमी मिश्रण व्यवस्थित पसरवून ओतावे. त्यानंतर त्यावर चीज किसून घालावे. 

क्रिमी स्पिनॅच कॉर्न टोस्ट खाण्यासाठी तयार आहे. हा पदार्थ गरमागरम खाण्याची मज्जा काही औरच असते. जर मुलं पालक खायला नाकं मुरडत असतील तर तुम्ही त्यांना हा क्रिमी आणि चिजी असा स्पिनॅच कॉर्न टोस्ट खायला देऊ शकता, मूल अगदी मिनिटभरात खाऊन फस्त करतील.

टॅग्स :अन्नपाककृती