Lokmat Sakhi >Food > उन्हाळ्यांत प्या सातूच्या पीठाचे थंडगार ताक! पोटाला थंडावा आणि शरीराला तकवा देणारा सोपा पदार्थ...

उन्हाळ्यांत प्या सातूच्या पीठाचे थंडगार ताक! पोटाला थंडावा आणि शरीराला तकवा देणारा सोपा पदार्थ...

Sattu Buttermilk Recipe : How To Make Sattu Buttermilk At Home : Satuchya pithache taak recipe : Healthy Sattu Buttermilk Drink : उन्हाळ्यात नेहमीचे ताक तर पितोच, पण पौष्टिक सातूच्या पिठाचे ताक पिणे ठरेल अधिक फायदेशीर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2025 10:13 IST2025-04-26T08:23:56+5:302025-04-26T10:13:21+5:30

Sattu Buttermilk Recipe : How To Make Sattu Buttermilk At Home : Satuchya pithache taak recipe : Healthy Sattu Buttermilk Drink : उन्हाळ्यात नेहमीचे ताक तर पितोच, पण पौष्टिक सातूच्या पिठाचे ताक पिणे ठरेल अधिक फायदेशीर...

Sattu Buttermilk Recipe How To Make Sattu Buttermilk At Home Satuchya pithache taak recipe Healthy Sattu Buttermilk Drink | उन्हाळ्यांत प्या सातूच्या पीठाचे थंडगार ताक! पोटाला थंडावा आणि शरीराला तकवा देणारा सोपा पदार्थ...

उन्हाळ्यांत प्या सातूच्या पीठाचे थंडगार ताक! पोटाला थंडावा आणि शरीराला तकवा देणारा सोपा पदार्थ...

उन्हाळ्याच्या दिवसांत वाढती उष्णता आणि गरमी यामुळे आपला जीव कासावीस होतो. या दिवसांत कडाक्याच्या उन्हामुळे आपल्याला सतत घाम येतो, थकल्यासारखे वाटते. अशावेळी आपल्याला (Sattu Buttermilk Recipe) सतत काही ना काही थंडगार खाण्या - पिण्याची इच्छा सतत होत असते. या ऋतूंत वाढत्या तापमानामुळे (How To Make Sattu Buttermilk At Home) घशाला कोरड पडल्याने सतत पाणी पाणी होते. म्हणूनच या काळात आहारात ( Satuchya pithache taak recipe) जास्तीत जास्त द्रव पदार्थांचा, शरीराला थंडावा देणाऱ्या आणि एनर्जी मिळेल अशा पदार्थांचा समावेश ठेवावा असे आवर्जून सांगितले जाते. यासाठीच, आपण उन्हाळ्यात सरबते, कलिंगड, खरबूज यांसारखी पाणीदार फळे, आंब्यासारखे एनर्जी देणारे फळ, तसेच दही-ताक यांचा समावेश करतो. यासोबतच आहारात सातूच्या पीठाचाही अवश्य समावेश करायला हवा(Healthy Sattu Buttermilk Drink).

शरीराला थंडावा मिळावा आणि एनर्जी टिकून राहावी यासाठी सातूचे पीठ अतिशय फायदेशीर असते. सातूच्या पीठामध्ये प्रोटीन्सचे प्रमाण भरपूर असते. थकवा दूर करण्यासाठी, रक्तदाब आणि मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी, पचनक्रिया सुधारण्यासाठी सातूचे पीठ खाणे गरजेचे असते. एरवी उन्हाळ्यात आपण ताक पितो खरे, परंतु नेहमीच्या ताकापेक्षा उन्हाळ्यात सातूच्या पिठाचे ताक पिणे आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असते. उन्हाळ्यासाठी स्पेशल सातूच्या पिठाचे ताक कसे करायचे याची रेसिपी पाहूयात.   

साहित्य :-

१. सातूचे पीठ - २ टेबलस्पून (भाजून घेतलेले पीठ)
२. थंडगार ताक - १ ग्लासभर 
३. बारीक चिरलेली कोथिंबीर - १ टेबलस्पून 
४. काळे मीठ - चवीनुसार 
५. जिरेपूड - १/२ टेबलस्पून (भाजलेली) 
६. पाणी - १/२ कप 
७. लिंबाचा रस - १ टेबलस्पून 

इवल्याशा गुळाच्या खड्याचे करा थंडगार सरबत! थकवा जाईल पळून, प्या गूळ सरबत...

विकतची महागडी आमचूर पावडर नको, फक्त १०० रुपयांत करा वर्षभर टिकणारी आमचूर पावडर, घ्या रेसिपी...

कृती :- 

१. सगळ्यांतआधी कपभर पाण्यांत भाजून घेतलेलं सातूचे पीठ घालून त्याच्या गुठळ्या मोडून घ्याव्यात. पाणी आणि पिठाची पेस्ट तयार करून घ्यावी. 
२. आता ही सातूच्या पिठाची पेस्ट थंडगार ताकात मिक्स करून घ्यावी. 
३. तयार ताकाची चव वाढवण्यासाठी त्यात चवीनुसार काळे मीठ, जिरेपूड, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडासा लिंबाचा रस घालावा.  

सातूच्या पिठाचे थंडगार ताक पिण्यासाठी तयार आहे. सातूच्या पीठामध्ये प्रोटीन्सचे प्रमाण भरपूर असते. 

आंबा चिरण्याच्या ७ पद्धती, प्रत्येक फोडीप्रमाणे वेगळी लागेल आंब्याची चव! पाहा कशासाठी - कसा चिराल आंबा...

सातूच्या पिठाचे ताक पिण्याचे फायदे... 

१. सातुच्या पीठातून प्रोटिन्स भरपूर प्रमाणात मिळतात. त्यामुळे ते थाेडंसं खाल्लं तरी त्यातून भरपूर उर्जा मिळते. प्रोटीन्स आरोग्यासाठी आवश्यक घटक असल्याने ते आवर्जून खायला हवं.

२. सौंदर्याच्या दृष्टीनेही सातुचे पीठ खाणे महत्त्वाचे मानले जाते. कारण त्यामुळे डार्क सर्कल्स कमी होण्यासाठी तसेच केस गळती थांबविण्यासाठी मदत होते. 

३. सातुच्या पिठामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे लहान मुलांना, गर्भवती स्त्रियांना आणि वयस्कर व्यक्तींना हे पीठ आवर्जून दिले जाते.

Web Title: Sattu Buttermilk Recipe How To Make Sattu Buttermilk At Home Satuchya pithache taak recipe Healthy Sattu Buttermilk Drink

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.