Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > नागपुरी संत्रा बर्फी घरीच करा आता सहज, पाहा मस्त रेसिपी आणि करा १० दिवस टिकणारी रसाळ ताज्या संत्र्यांची बर्फी...

नागपुरी संत्रा बर्फी घरीच करा आता सहज, पाहा मस्त रेसिपी आणि करा १० दिवस टिकणारी रसाळ ताज्या संत्र्यांची बर्फी...

Santra Barfi Recipe : Nagpur special sweet orange barfi recipe : how to make Santra Barfi at home : नागपूरची फेमस संत्रा बर्फी घरच्याघरी अतिशय सोप्या पद्धतीने कशी तयार करायची याची भन्नाट रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2025 14:50 IST2025-11-06T14:38:18+5:302025-11-06T14:50:53+5:30

Santra Barfi Recipe : Nagpur special sweet orange barfi recipe : how to make Santra Barfi at home : नागपूरची फेमस संत्रा बर्फी घरच्याघरी अतिशय सोप्या पद्धतीने कशी तयार करायची याची भन्नाट रेसिपी...

Santra Barfi Recipe Nagpur special sweet orange barfi recipe how to make Santra Barfi at home | नागपुरी संत्रा बर्फी घरीच करा आता सहज, पाहा मस्त रेसिपी आणि करा १० दिवस टिकणारी रसाळ ताज्या संत्र्यांची बर्फी...

नागपुरी संत्रा बर्फी घरीच करा आता सहज, पाहा मस्त रेसिपी आणि करा १० दिवस टिकणारी रसाळ ताज्या संत्र्यांची बर्फी...

थंडीच्या सिझनला सध्या सुरुवात झाली आहे. दिवसेंदिवस बऱ्यापैकी थंडी पडत आहे. हिवाळ्याच्या या सिझनमध्ये बाजारांत फळं आणि भाज्या अगदी ताज्या आणि फ्रेश विकायला असतात. फळांमध्ये देखील गडद नारंगी रंगाची, ताजी, टवटवीत फ्रेश संत्री मोठ्या प्रमाणावर विकायला असतात. ही ताजी, रसाळ संत्री पाहून ती विकत घेण्याचा मोह कुणालाच आवरता येत नाही. आपण संत्री विकत घेऊन खातोच सोबतच त्याचे वेगवेगळे पदार्थ देखील घरोघरी केले जातात, त्यापैकीच एक लोकप्रिय पदार्थ म्हणजे संत्र्याची बर्फी... ऑरेंज सिटी म्हणून ओळख असलेल्या नागपूरची खासियत म्हणजे इथली रसाळ संत्री. या संत्र्यांपासून बनवलेली संत्रा बर्फी तर संपूर्ण देशभरात प्रसिद्ध आहे. या खास मिठाईचा सुगंध आणि स्वाद दोन्ही मन मोहून टाकतात(how to make Santra Barfi at home).

बाजारात मिळणारी संत्रा बर्फी चविष्ट असतेच, पण ती घरच्याघरीच तयार करणं तितकंच सोप आहे. विकतसारख्याच संत्रा बर्फीची परफेक्ट चव, रंग आणि टेक्सचर असलेली बर्फी घरी कशी तयार करायची याची सोपी रेसिपी पाहूयात. नागपूरची फेमस संत्रा बर्फी (Nagpur special sweet orange barfi recipe) घरच्याघरी अतिशय सोप्या पद्धतीने कशी तयार करायची याची भन्नाट रेसिपी... 

साहित्य :- 

१. संत्र्याचा गर - ५०० ग्रॅम 
२. साखर - २०० ग्रॅम 
३. केशर काड्या - १० ते १२ काड्या 
४. खवा - १ कप 
५. डेसिकेटेड कोकोनट - १ कप 
६. संत्र्याची सालं - १ टेबलस्पून (संत्र्याची सालं किसून घालावी)
७. चांदीचा वर्ख - गरजेनुसार (पर्यायी)

मिक्सरमध्ये वाटल्यासारखं ‘असं’ फिरवा ढोकळ्याचं पीठ, कापसाहून हलका जाळीदार ढोकळा करण्याची सोपी ट्रिक...


सकाळच्या गार चपात्या कुकरमध्ये एका मिनिटांत करा गरम, पाहा इस्टंट ट्रिक-रोज खा गरमागरम चपात्या...

कृती :- 

१. सगळ्यांत आधी ताजी रसाळ संत्री व्यवस्थित सोलून, बिया काढून संत्र्याचा गर एका बाऊलमध्ये काढून घ्यावा. 
२. एका मोठ्या कढईमध्ये ताज्या, रसाळ संत्र्याचा गर घालावा त्यात चवीनुसार साखर आणि केशराच्या काड्या घालाव्यात. मग मंद आचेवर हे मिश्रण चमच्याने हलवत व्यवस्थित शिजवून घ्यावे. मिश्रण शिजत असतानाच चमच्याने हलकेच दाब देत मिश्रणातील गुठळ्या मोडून घ्याव्यात. 
३. मिश्रण मंद आचेवर शिजत असतानाच त्यात खवा देखील घालावा. मंद आचेवर मिश्रण हलकेसे घट्ट व दाटसरपणा येईपर्यंत थोडे आटवून घ्यावे. 

पोटभर भात खाऊनही वजन, शुगर किंचितही वाढणार नाही! न्यूट्रिशनिस्ट सांगतात भात खाण्याच्या ५ ट्रिक्स...

४. नंतर या मिश्रणात संत्र्याच्या साली बारीक किसून घालाव्यात तसेच डेसिकेटेड कोकोनट देखील घालावे, मग मंद आचेवर मिश्रणाला दाटसरपणा येईपर्यंत व्यवस्थित शिजवून घ्यावे. 
५. एका डिशला किंवा ट्रे ला किंचितसे तेल किंवा तूप लावून व्यवस्थित पसरवून घ्यावे. त्यानंतर तयार मिश्रण यात ओतावे. गरम असतानाच मिश्रण ट्रेमध्ये व्यवस्थित सेट करून घ्यावे. आवडीनुसार वार चांदीचा वर्ख लावून घ्यावा. मग सुरीने चौकोनी बर्फीच्या आकारात वड्या कापून घ्याव्यात. 

घरच्याघरीच झटपट रसाळ संत्र्याची नागपूर स्टाईल संत्रा बर्फी खाण्यासाठी तयार आहे.

Web Title: Santra Barfi Recipe Nagpur special sweet orange barfi recipe how to make Santra Barfi at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.