Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > पांढराशुभ्र ढोकळा आणि मधोमध हिरवीगार चटणी! अप्रतिम चवीच्या सँडविच ढोकळ्याची रेसिपी - पेटपूजा होईल बेस्ट...

पांढराशुभ्र ढोकळा आणि मधोमध हिरवीगार चटणी! अप्रतिम चवीच्या सँडविच ढोकळ्याची रेसिपी - पेटपूजा होईल बेस्ट...

Sandwich Dhokla Recipe : Steamed Sandwich Dhokla : How To Make Sandwich Dhokla At Home : मऊ, लुसलुशीत आणि पांढराशुभ्र सँडविच ढोकळा म्हटलं की कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल, पाहा रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2026 14:05 IST2026-02-21T14:00:40+5:302026-02-21T14:05:02+5:30

Sandwich Dhokla Recipe : Steamed Sandwich Dhokla : How To Make Sandwich Dhokla At Home : मऊ, लुसलुशीत आणि पांढराशुभ्र सँडविच ढोकळा म्हटलं की कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल, पाहा रेसिपी...

Sandwich Dhokla Recipe How To Make Sandwich Dhokla Recipe Steamed Sandwich Dhokla | पांढराशुभ्र ढोकळा आणि मधोमध हिरवीगार चटणी! अप्रतिम चवीच्या सँडविच ढोकळ्याची रेसिपी - पेटपूजा होईल बेस्ट...

पांढराशुभ्र ढोकळा आणि मधोमध हिरवीगार चटणी! अप्रतिम चवीच्या सँडविच ढोकळ्याची रेसिपी - पेटपूजा होईल बेस्ट...

मऊ, लुसलुशीत आणि पांढराशुभ्र सँडविच ढोकळा म्हटलं की कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. पारंपारिक ढोकळ्यापेक्षा हा ढोकळा केवळ दिसायलाच आकर्षक नसतो, तर चवीलाही तितकाच टेस्टी लागतो. या ढोकळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे याचे दोन्ही बाजूंचे पांढरेशुभ्र लेअर आणि त्यांच्या मधोमध असलेली तिखट-गोड हिरवीगार चटणी. जेव्हा हा ढोकळा प्लेटमध्ये खाण्यासाठी दिला जातो, तेव्हा त्याचे रंग पाहूनच तो कधी एकदा फस्त करतो असे होते(Sandwich Dhokla Recipe).

नाश्त्याला काहीतरी हलकं, चविष्ट आणि दिसायलाही आकर्षक खायचं असेल तर सँडविच ढोकळा हा परफेक्ट पर्याय ठरतो. पारंपरिक ढोकळ्याला थोडासा ट्विस्ट देऊन तयार केलेला हा खास प्रकार सध्या प्रत्येक घरात आणि किटी पार्टी मेनूमध्ये लोकप्रिय होत आहे. मध्ये तिखट-चटपटीत हिरवीगार चटणी आणि दोन्ही बाजूंना मऊ, पांढरेशुभ्र ढोकळ्याचे लेअर असलेला हा मऊ - लुसलुशीत ढोकळा घरातील लहानांपासून - मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचा... घरच्या घरी मऊ, परफेक्ट लेअर असलेला आणि चटणीमुळे चव दुप्पट वाढणारा सँडविच ढोकळा (How To Make Sandwich Dhokla At Home) कसा तयार करायचा याची साधीसोपी रेसिपी पाहूयात...

साहित्य :- 

१. इडली बॅटर - १ मोठा बाऊल
२. इनो / बेकिंग सोडा - १/२ टेबलस्पून
३. कोथिंबीर - ४ ते ५ टेबलस्पून
४. हिरव्या मिरच्या - ३ ते ४ 
५. लसूण - ५ ते ६ पाकळ्या
६. आलं - १ छोटा तुकडा 
७. शेंगदाणे - १ टेबलस्पून 
८. मीठ - चवीनुसार
९. जिरे - १ टेबलस्पून 
१०. लिंबाचा रस - १ टेबलस्पून
११. पाणी - गरजेनुसार
१२. मोहरी - १/२ टेबलस्पून
१३. पांढरे तीळ - १/२ टेबलस्पून 
१४. कडीपत्ता - ६ ते ७ पाने 
१५. तेल - ३ ते ४ टेबलस्पून

कोकणातल्या पारंपरिक चवीच्या सांडगी मिरचीची पाहा रेसिपी, वर्षभर टिकेल-ना बुरशी येते ना खमंगपणा जातो...


मूग डाळीच्या भजीपेक्षाही भारी! खमंग - कुरकुरीत 'मसाला मूग वडा' - चव अप्रतिम, होईल मिनिटभरात फस्त... 

कृती :- 

१. सगळ्यात आधी एका मोठ्या खोलगट कढईत पाणी घेऊन ते व्यवस्थित उकळवून घ्याव. कढईवर झाकण ठेवून कढई आधी १० ते १५ मिनिटे प्री - हिट करून घ्यावी. 
२. आता एका कडा असेलल्या डिशला थोडेसे तेल लावून ते व्यवस्थित पसरवून घ्यावे. तयार इडली बॅटरमध्ये चिमूटभर इनो किंवा बेकिंग सोडा घालावा. मग तेल लावलेल्या डिशमध्ये तयार इडली बॅटर ओतून चमच्याने नीट पसरवून त्याचा एक मध्यम जाडीचा असा थर तयार करून घ्यावा. ती डिश प्री - हिट केलेल्या कढईत ठेवून ५ मिनिटे हलक्या वाफेवर शिजवून घ्यावे. 
३. तोपर्यंत एका मिक्सरच्या मोठ्या बाऊलमध्ये, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या, आलं, शेंगदाणे, चवीनुसार मीठ जिरे, लिंबाचा रस व थोडं पाणी घालून नेहमीप्रमाणे पातळ अशी हिरवी चटणी वाटून घ्यावी. ही वाटून घेतलेली चटणी एका बाऊलमध्ये काढून त्यात थोडं इडली बॅटर मिसळून मध्यम कंन्सिस्टंसीची पेस्ट तयार करून घ्यावी. 

४. मग ही तयार हिरव्या रंगाची पेस्ट वाफेवर शिजून तयार झालेल्या ढोकळ्याच्या पहिल्या लेअरवर ओतून घ्यावी. अशा प्रकारे दुसऱ्या हिरव्या रंगाचा लेअर तयार करून घ्यावा. मग चमच्याने नीट पसरवून घ्याव झाकण ठेवून पुन्हा एकदा वाफेवर शिजवून घ्यावे. 
५. मग सगळ्यात शेवटी पुन्हा एकदा पहिल्यांदा केलं तसच, अजून एकदा इडली बॅटर ओतून तिसरा पांढरा लेअर तयार करून घ्यावा. मग झाकण ठेवून १० ते १५ मिनिटे ढोकळा व्यवस्थित वाफवून घ्यावा. 
६. एका छोट्या भांड्यात तेल घेऊन त्यात जिरे, मोहरी, पांढरे तीळ, कडीपत्ता, हिरव्या मिरच्या घालून खमंग अशी फोडणी तयार करून घ्यावी. ही फोडणी तयार ढोकळ्यावर ओतावी. मग सुरीच्या मदतीने ढोकळ्याचे चौकोनी तुकडे कापून घ्यावेत. 

सँडविच ढोकळा खाण्यासाठी तयार आहे. हिरव्यागार चटणी सोबत हा ढोकळा खाल्ला तर चव अधिकच भारी लागते.

Web Title : सैंडविच ढोकला रेसिपी: मसालेदार चटनी के साथ नरम, परतदार आनंद

Web Summary : नरम, परतदार सैंडविच ढोकला का आनंद लें, जो पारंपरिक ढोकला का एक लोकप्रिय ट्विस्ट है। इस रेसिपी में नरम सफेद परतों के बीच स्वादिष्ट हरी चटनी है, जो एक हल्के, स्वादिष्ट और दिखने में आकर्षक नाश्ते के लिए एकदम सही है। आसान चरणों के साथ घर पर यह पसंदीदा बनाना सीखें।

Web Title : Sandwich Dhokla Recipe: Soft, layered delight with a spicy chutney.

Web Summary : Enjoy the soft, layered Sandwich Dhokla, a popular twist on traditional dhokla. This recipe features a delicious green chutney between fluffy white layers, perfect for a light, tasty, and visually appealing snack. Learn how to make this favorite at home with simple steps.