Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > वाळवण स्पेशल: घरीच करा झटपट उपवासाचे साबुदाणा - बटाटा पापड! वर्षभराची सोय- परफेक्ट रेसिपी, दुप्पट फुलतील

वाळवण स्पेशल: घरीच करा झटपट उपवासाचे साबुदाणा - बटाटा पापड! वर्षभराची सोय- परफेक्ट रेसिपी, दुप्पट फुलतील

Traditional Maharashtrian Valvan recipes: Easy breakfast papad for fasting: या उन्हाळ्यात उपवासाचे साबुदाणा - बटाटा पापड ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि वर्षभराची उपवासाची सोय करून ठेवा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2026 09:30 IST2026-04-04T09:30:00+5:302026-04-04T09:30:03+5:30

Traditional Maharashtrian Valvan recipes: Easy breakfast papad for fasting: या उन्हाळ्यात उपवासाचे साबुदाणा - बटाटा पापड ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि वर्षभराची उपवासाची सोय करून ठेवा.

Sabudana potato papad recipe step by step Fast special sabudana batata papad Homemade dried potato papad How to make crispy sabudana papad at home Summer drying recipes Indian snacks | वाळवण स्पेशल: घरीच करा झटपट उपवासाचे साबुदाणा - बटाटा पापड! वर्षभराची सोय- परफेक्ट रेसिपी, दुप्पट फुलतील

वाळवण स्पेशल: घरीच करा झटपट उपवासाचे साबुदाणा - बटाटा पापड! वर्षभराची सोय- परफेक्ट रेसिपी, दुप्पट फुलतील

उन्हाळा सुरु झाला की घरोघरी एकच लगबग पाहायला मिळते ती म्हणजे वाळवण स्पेशल पदार्थ. पापड, कुरड्या, चकल्या आणि चिप्स अशा पदार्थांनी डबे भरुन ठेवण्याचा हा काळ असतो.(How to make crispy sabudana papad at home) यातही सगळ्यांचा आवडता प्रकार उपवासाचे साबुदाणा बटाटा पापड. उपवासासाठी तर हे पापड म्हणजे वरदानच असतात.(Tips to make white and crispy papad) तळल्यानंतर दुप्पट फुलणारे, काचेसारखे पारदर्शक आणि तोंडात टाकताच विरघळणारे हे पापड लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतात.(Traditional Maharashtrian Valvan recipes) 
अनेकदा पापड बनवताना ते लाटताना फाटण्याची किंवा तळल्यानंतर वातड होण्याची भीती वाटते. साबुदाणा नीट शिजला नाही किंवा बटाट्याचे प्रमाण चुकले, तर पापड कडक होतात किंवा सुकवताना त्यांना तडे जातात. कमी कष्टात आणि कमी वेळात पांढरे शुभ्र, वर्षभर टिकणारे पापड कसे बनवायचे.(Upvasache papad recipe) याची खास ट्रिक पाहूयात. या उन्हाळ्यात ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि वर्षभराची उपवासाची सोय करून ठेवा.

बाहेरून कुरकुरीत आणि आतून चिजी! स्पेशल गरमागरम मिरची भजी, संध्याकाळच्या चहासोबत मस्त बेत- सोपी रेसिपी

साहित्य 

उकडलेले बटाटे - ३ किलो
साबुदाणा - २ कप
हिरव्या मिरच्या - ७ ते ८
कोथिंबीर - १ वाटी
जिरे - १ मोठा चमचा
चिली फ्लेक्स - १ चमचा
सैंधव मीठ - चवीनुसार
बारीक चिरलेली कोथिंबीर 
तेल - आवश्यकतेनुसार


कृती 

1. सगळ्यात आधी बटाटे स्वच्छ धुवून कुकरमध्ये उकडवून घ्या. थंड झाल्यानंतर त्याचे साल काढा. आता उकडलेले बटाटे किसणीने किसून घ्या. 

2. मिक्सरच्या भांड्यात २ कप साबुदाण्याचे पीठ तयार करा. यानंतर पुन्हा मिक्सरच्या भांड्यात हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि जिरे घालून त्याची पेस्ट तयार करा. 

3. आता एका मोठ्या परातीत किसलेले बटाट्याचे मिश्रण, साबुदाण्याचे पीठ घाला. वरुन मिरचीची पेस्ट, चिली फ्लेक्स, मीठ आणि बारीक चिरलेला कोथिंबीर घालून मिश्रण चांगले मळून घ्या. 

4. तयार पीठाला तेल लावून पुन्हा मळा. आता हाताला तेल लावून पीठाचे गोळे करा. प्लास्टिकचा पेपर ठेवून पापड लाटा. किंवा मशीनमध्ये गोळा ठेवून पापड तयार करा. कडक उन्हामध्ये २ ते ३ दिवस पापड मस्त सुकवून घ्या. 

5. हवे तेव्हा तेल गरम करुन तळा दुप्पट फुलणारे उपवासाचे साबुदाणा-बटाटा पापड. 
 


Web Title : घर पर साबूदाना और आलू के पापड़ बनाएं: एक उत्तम उपवास रेसिपी

Web Summary : उपवास के लिए घर पर कुरकुरे साबूदाना और आलू के पापड़ तैयार करें। यह आसान रेसिपी सुनिश्चित करती है कि वे पूरी तरह से फूल जाएं। आलू, साबूदाना और मसालों जैसी सरल सामग्री से बने ये पापड़, उपवास के दिनों में साल भर आनंद लेने के लिए आदर्श हैं।

Web Title : Make Sabudana and Potato Papad at Home: A Perfect Fasting Recipe

Web Summary : Prepare crispy Sabudana and potato papad at home for fasting. This easy recipe ensures they puff up perfectly. Made with simple ingredients like potatoes, sago, and spices, these papads are ideal for year-round enjoyment during fasting days.