Join us

साबुदाणा - बटाटा चकलीची इन्स्टंट रेसिपी! एवढीशी चकली फुलते पापडासारखी मोठी, चवही मस्त कुरकुरीत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2025 16:40 IST

Sabudana Batata Chakli Recipe : How To Make Sabudana Batata Chakli At Home : Sago Potato Chakli : साबुदाणा - बटाटा चकलीशिवाय वाळवणाचे पदार्थ अधुरेच आहेत, मोठा घाट न घालता पटकन करा इन्स्टंट चकल्या..

उन्हाळ्यात घरोघरी हमखास वाळवणाचे पदार्थ तयार केले जातात. वाळवणाच्या पदार्थात कुरड्या, पापड, सांडगे तयार केले जातात. अनेक घरांमध्ये बनवला जाणारा कॉमन पदार्थ म्हणजे (Sabudana Batata Chakli Recipe) साबुदाणा आणि बटाट्याच्या चकल्या. उपवासाला खाल्ल्या जाणाऱ्या साबुदाणा बटाट्याच्या चकल्या या मधल्यावेळेत खाण्यासाठी किंवा जेवताना तोंडी लावण्यासाठीही उत्तम पर्याय आहे(How To Make Sabudana Batata Chakli At Home).

काहीजणांना जेवणासोबत काहीतरी कुरकुरीत, चटपटीत लागतच अशावेळी आपण या  साबुदाणा बटाट्याच्या चकल्या (Sago Potato Chakli) पटकन तळून खाऊ शकतो. या वर्षभर टिकणाऱ्या साबुदाणा बटाट्याच्या चकल्या घरच्याघरीच कशा तयार करायच्या याची सोपी रेसिपी पाहूयात. 

साहित्य :- 

१. साबुदाणा - १/२ किलो २. बटाटे - १ किलो (उकडवून घेतलेले)३. लाल मिरची पावडर - १ टेबलस्पून ४. मीठ - चवीनुसार ५. तेल - २ ते ३ टेबलस्पून ६. पाणी - गरजेनुसार

फक्त १० मिनिटांत करा कुकरमध्ये कैरीचे लोणचे, पाहा लोणच्याची फक्कड रेसिपी...

हॉटेलस्टाइल कुलचा घरीही करता येईल फक्त १५ मिनिटांत, मऊसूत-पांढराशुभ्र कुलचा करण्याची इन्स्टंट रेसिपी...

कृती :- 

१. सर्वातआधी एका भांड्यात साबुदाणे ओतून ते पाण्याने ३ ते ४ वेळा स्वच्छ धुवून घ्यावेत. २. आता या साबुदाण्यात पाणी घालून ५ ते ७ तासांसाठी पाण्यांत भिजत ठेवावेत. ३. साबुदाणे भिजल्यानंतर त्यातील जास्तीचे पाणी काढून टाकावे. ४. आता भिजलेले साबुदाणे मिक्सरच्या भांड्यात घालून व्यवस्थित वाटून घ्यावे. सोबतच उकडवून घेतलेले बटाटे देखील किसणीवर किसून घ्यावेत. 

आमरस काळा न पडण्यासाठी ८ टिप्स, महागामोलाच्या आंब्याचा रस राहील पिवळाधमक-चवही मस्त...

५. एका मोठ्या परातीमध्ये मिक्सरमधून वाटून घेतलेलं साबुदाण्याचे पीठ आणि उकडवून किसलेले बटाटे एकत्रित मळून एकजीव करून घ्यावेत. यात चवीनुसार मीठ व लाल मिरची पावडर घालावी. पीठ मळून तयार करून घ्यावे. ६. एका चाळणीला तेल लावून त्यात हे तयार पीठ ठेवून मग कढईत पाणी ठेवून त्यावर चाळणी ठेवून १५ मिनिटे वाफवून घ्यावे. ७. वाफवलेले पीठ पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घ्यावे. मग मळून घेतलेल्या पिठाचे मध्यम आकाराचे गोळे तयार करावेत. चकलीच्या साच्यांमध्ये हे गोळे भरून चकल्या पाडून घ्याव्यात. या चकल्या उन्हात ३ ते ४ दिवस संपूर्णपणे वाळवून घ्याव्यात. 

बटाटा साबुदाण्याची चकली तयार आहे. तयार चकल्या एका हवाबंद डब्यात भरून स्टोअर करून ठेवाव्यात.

टॅग्स :अन्नपाककृतीसमर स्पेशल