पाणीपुरीचं नाव घेतलं तरी तोंडाला पाणी सुटते. विविध प्रकारच्या पाणीपुरीच्या पाण्याची रेसिपी आपण करुन पाहत असतो. (Row Mango water, Make this special Panipuri recipe)उन्हाळ्यात कैरी घातलेले पाणी करुन पाहीले का? मस्त ताज्या कैरीचे आंबट गोड असे पाणी अगदीच चविष्ट लागते. करायला फारच सोपे आहे. पाहा कैरीच्या पाण्याची रेसिपी.
साहित्य
कैरी, पुदिना, हिरवी मिरची, मीठ, चाट मसाला, सैंधव मीठ, साखर, पाणी, जिरे पूड, लिंबू, कोथिंबीर, बुंदी
कृती
१. छान ताजा पुदिना घ्यायचा. व्यवस्थित निवडायचा मग त्याची ताजी पाने वेगळी करुन स्वच्छ धुवायची. (Row Mango water, Make this special Panipuri recipe)तसेच ताजी कोथिंबीर घ्या. कोथिंबीर निवडून घ्या. ताज्या कोथिंबीरीच्या दांड्याही चटणीसाठी चालतात. त्या वाया जाऊ देऊ नका. कोथिंबीर स्वच्छ धुवायची.
२. छान ताजी कच्ची कैरी घ्यायची. गोडसर नको मस्त आंबट अशी कैरी घ्या. मोठी असेल तर एक घ्या लहान असेल तर दोन घेतल्या तरी चालेल. कैरीची सालं सोलून घ्यायची. कैरीचे बारीक तुकडे करुन घ्यायचे. बाट काढून घ्यायची त्याला असलेला गरही सुरीने काढून घ्यायचा.
३. एका मिक्सरच्या भांड्यात कैरीच्या फोडी घ्या. मग त्यात भरपूर कोथिंबीर घालायची. त्यात पुदिन्याची पाने घाला आणि मग हिरव्या मिरचीचे तुकडे घाला. जिरे पूड घाला. चमचाभर साखर घाला. चमचाभर सैंधव मीठ घालायचे. चाट मसाला घालायचा. सगळे पदार्थ घातल्यावर त्यात थोडे पाणी घालायचे आणि व्यवस्थित चटणी वाटून घ्यायची. सगळे पदार्थ छान पातळ वाटले जातील याची काळजी घ्या.
४. एका खोलगट पातेल्यात तयार केलेली चटणी घ्यायची. त्यात भरपूरसे गार पाणी ओतायचे. गार नको असेल तर साधे पाणी घ्या. त्यात एका लिंबाचा रस पिळा. भरपूर बुंदी घाला गरजेनुसार मीठ घालायचे आणि ढवळून घ्या.
त्यासोबत चिंचेचे पाणी घ्यायचे. तुम्हाला जर फक्त कैरीचेच पाणी हवे असेल तरी चालेल. चिंच गुळाचे खजूर घातलेले पाणी घेऊ शकता. तसेच रगडा करायचा. रगडा नाही तर बटाट्यात विविध मसाले, दाणे घालून त्याचे सारण पुरीत भरायचे. तुम्हाला फक्त बुंदी आवडत असेल तर बुंदीचे सारण घ्या. आवडीनुसार स्टफींग घ्यायचे.