Lokmat Sakhi >Food > Maharashtrian Food : भाजलेल्या लसणाची चटणी खाऊन तर पाहा, अशी झणझणीत की खातच राहाल- करा फक्त १० मिनिटांत!

Maharashtrian Food : भाजलेल्या लसणाची चटणी खाऊन तर पाहा, अशी झणझणीत की खातच राहाल- करा फक्त १० मिनिटांत!

Zanzanit garlic chutney recipe: How to make spicy lasun chutney: भाजलेल्या लसणाची करा झणझणीत चटणी होईल १० मिनिटांत बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2025 10:29 IST2025-07-22T10:28:42+5:302025-07-22T10:29:58+5:30

Zanzanit garlic chutney recipe: How to make spicy lasun chutney: भाजलेल्या लसणाची करा झणझणीत चटणी होईल १० मिनिटांत बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया.

Roasted garlic chutney recipe in 10 minutes Lahsun chi chutney quick Maharashtrian recipe | Maharashtrian Food : भाजलेल्या लसणाची चटणी खाऊन तर पाहा, अशी झणझणीत की खातच राहाल- करा फक्त १० मिनिटांत!

Maharashtrian Food : भाजलेल्या लसणाची चटणी खाऊन तर पाहा, अशी झणझणीत की खातच राहाल- करा फक्त १० मिनिटांत!

ताटाच्या डाव्या बाजूला हमखास आवडीचे पदार्थ वाढले जातात.(Chutney Recipe) पण या बाजूला असणारे पदार्थ हे चवीपुरता खायला हवे असं आपल्याला कायमच सांगितलं जातं. ताटाच्या डाव्या बाजूत चटण्या, लोणचं, रायता किंवा गोडाचा पदार्थ असतो. यामुळे जेवणाची रंगत अधिक वाढते.(Roasted garlic chutney) जेवणात रोज तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो. बाहेरुन काही तरी मागवण्यापेक्षा आपण घरीत काही तरी लज्जतदार पदार्थ करण्याचे ट्राय करतो. (Lahsun chi chutney)
अगदी गरमागरम वरण-भात देखील अशावेळी आपल्याला आवडतो.(Maharashtrian Food) पण यासोबत चटणी किंवा लोणची देखील खायला अधिक चविष्ट असतात. लसणाची सुकी चटणी कशी बनवायची. ही चटणी आपण भात, पुलाव, चपाती, भाकरी अगदी कशासोबतही खाऊ शकतो.(10-minute chutney recipe) लसणामध्ये अनेक गुणधर्म आहेत. कच्चा लसूण खायला अनेकांना आवडत नाही. अशावेळी लसणाचा आहारात समावेश करण्याऐवजी आपण त्याची चटणी बनवून खाऊ शकतो. चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया. 

Maharashtra Traditional Food : कोकणातला पारंपरिक पदार्थ अळूचं फदफदं आणि मऊ भात, पावसाळ्यातलं वाफाळतं सुख!

साहित्य 

तीळ - ३ चमचे 
सुके खोबरे - २ चमचे 
तेल - आवश्यकतेनुसार 
लसूण पाकळ्या- २० ते २५
कढीपत्त्याची पाने - १५ ते २०
शेंगदाणे - अर्धी वाटी
जिरे - १ चमचा 
चिंच 
लाल मिरची पावडर - १ चमचा 
मीठ - चवीनुसार 


कृती

1. सगळ्यात आधी पॅनमध्ये पांढरे तीळ व्यवस्थित भाजून घ्या. त्यानंतर सुके खोबरे व्यवस्थित भाजून घ्या. लसणाच्या पाकळ्यांना चिरुन घ्या. आता कढईतमध्ये तेल गरम करुन त्यात लसणू पाकळ्या व्यवस्थित फ्राय करुन घ्या. लालसर झाल्यानंतर ताटात काढून घ्या. 

2. त्याच कढईत कढीपत्त्याची पाने चांगली भाजून घ्या. नंतर शेंगदाणे तळून घ्या. आता सर्व साहित्य एकत्र करा. यात वरुन जिरे, चिंच, लाल मिरची पावडर आणि मीठ घालून मिक्सरमध्ये वाटून घ्या. 

3. तयार होईल कुरकुरीत झणझणीत लसणाची चटणी. भात-भाकरीसोबत खा, जेवणाची रंगत आणखी वाढेल. 

 

Web Title: Roasted garlic chutney recipe in 10 minutes Lahsun chi chutney quick Maharashtrian recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.