Lokmat Sakhi >Food > बेसन नको, फक्त १५ मिनिटांत करा डाळ तांदुळाचा लुसलुशीत ढोकळा - चवीला उत्तम आरोग्यासाठी पौष्टिक...

बेसन नको, फक्त १५ मिनिटांत करा डाळ तांदुळाचा लुसलुशीत ढोकळा - चवीला उत्तम आरोग्यासाठी पौष्टिक...

Rice chana dal dhokla : How To Make Rice chana dal dhokla At Home : डाळ - तांदुळाचा तयार केलेला ढोकळा केवळ चवीलाच नव्हे तर पौष्टिकही असतो, पाहा त्याची सोपी रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2025 18:05 IST2025-05-15T17:55:33+5:302025-05-15T18:05:34+5:30

Rice chana dal dhokla : How To Make Rice chana dal dhokla At Home : डाळ - तांदुळाचा तयार केलेला ढोकळा केवळ चवीलाच नव्हे तर पौष्टिकही असतो, पाहा त्याची सोपी रेसिपी...

Rice chana dal dhokla How To Make Rice chana dal dhokla At Home | बेसन नको, फक्त १५ मिनिटांत करा डाळ तांदुळाचा लुसलुशीत ढोकळा - चवीला उत्तम आरोग्यासाठी पौष्टिक...

बेसन नको, फक्त १५ मिनिटांत करा डाळ तांदुळाचा लुसलुशीत ढोकळा - चवीला उत्तम आरोग्यासाठी पौष्टिक...

गुजराथी पदार्थांच्या यादीतील सर्वात लोकप्रिय असणारा ढोकळा खायला सगळ्यांनाचं आवडत. हलका, मऊ, लुसलुशीत पिवळाधम्मक ढोकळा खाण्याची मज्जा काही औरच असते. शक्यतो, ढोकळा तयार करताना आपण बेसनाचा वापर करतो. परंतु आजकाल बरेचजण आपल्या आरोग्याची काळजी (Rice chana dal dhokla) घेण्यासाठी हेल्थ कॉन्शियस असतात. यासाठीच, आरोग्याच्या दृष्टीने बेसनाचा वापर करणे काहीजण टाळतात. अशा परिस्थितीत, आपण बेसन न वापरता डाळ व तांदुळाचा ढोकळा (How To Make Rice chana dal dhokla At Home) देखील तयार करू शकतो. डाळ, तांदूळचा ढोकळा आरोग्यदायी व चविष्ट होतोच. 

या डाळ - तांदुळाच्या ढोकळ्यामध्ये प्रथिने (protein) आणि कार्बोहायड्रेट्सचे (carbohydrates) प्रमाण जास्त असते, जे शरीरासाठी पोषक असते. याशिवाय, हा ढोकळा बेसन न वापरता तयार केला असल्यामुळे ज्या व्यक्तींना बेसन न खाण्याचा सल्ला दिला आहे किंवा ज्यांना त्याची अ‍ॅलर्जी आहे, त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय ठरतो. या पद्धतीने तयार केलेला डाळ-तांदुळाचा ढोकळा केवळ चवीलाच नव्हे तर पौष्टिकही असतो. यामध्ये वापरण्यात येणाऱ्या डाळ आणि तांदळामुळे झटपट उर्जा मिळते तसेच पचनक्रियाही सुधारते. त्यामुळे हा डाळ तांदुळाचा ढोकळा एक उत्तम नाश्त्याचा पर्याय ठरतो.   

साहित्य :- 

१. तांदूळ - २ कप 
२. चणा डाळ - १ कप 
३. पोहे - १/२ कप 
४. मीठ - चवीनुसार
५. तेल - ३ टेबलस्पून 
६. खायचा सोडा / इनो - १ टेबलस्पून 
७. लिंबाचा रस - १ टेबलस्पून  
८. मोहरी - १ टेबलस्पून  
९. हिंग - चिमूटभर 
१०. कडीपत्ता - ६ ते ८ पानं 
११. हिरव्या मिरच्या - ३ ते ४ मिरच्या 
१२. कोथिंबीर - २ टेबलस्पून (बारीक चिरलेली)

पचनाला उत्तम- पोटाला थंडावा देणारं काकडीचं थालीपीठ! उन्हाळ्यात खायलाच हवा असा पौष्टिक पदार्थ...


लोणच्यासाठी परफेक्ट कैरी कशी निवडाल? ‘या’ ३ प्रकारच्याच कैऱ्या लोणच्यासाठी उत्तम-वर्षभर टिकेल सहज...

कृती :- 

१. एका मोठ्या बाऊलमध्ये चणा डाळ, तांदूळ घेऊन ते एकत्रित ३ ते ४ वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावेत. त्यानंतर त्यात पोहे व पाणी घालून सगळे मिश्रण ४ ते ५ तासांसाठी भिजवून घ्यावेत. 
२. भिजवलेले डाळ व तांदुळाचे मिश्रण मिक्सरमध्ये एकत्रित वाटून त्याचे थोडे जाडसर पीठ तयार करून घ्यावे. हे डाळ व तांदुळाचे तयार पीठ ६ ते ७ तासांसाठी झाकून ठेवून फर्मेंटेशन करून घ्यावे. 
३. ६ ते ७ तासांत पीठ फर्मेंटेशन होऊन छान फुलून आल्यावर ते तयार पीठ २ ते ३ मिनिटे चांगले फेटून घ्यावे. फेटून घेतलेल्या पिठात मीठ, खायचा सोडा किंवा इनो घालावे, सोबतच तेल आणि अर्ध्या लिंबाचा रस घालावा. 
४. आता एका डिशच्या तळाशी बटर पेपर लावून घ्यावा. त्यात ढोकळ्याचे तयार मिश्रण ओतून घ्यावे. 
५. एका कढईत पाणी भरून ते व्यवस्थित उकळवून घ्यावे. आता या कढईत छोटे स्टॅन्ड ठेवून त्यावर ढोकळ्याची डिश ठेवावी आणि वरून झाकण ठेवून १० ते १५ मिनिटे ढोकळा वाफेवर व्यवस्थित शिजवून घ्यावा. 

साबुदाणा - बटाटा चकलीची इन्स्टंट रेसिपी! एवढीशी चकली फुलते पापडासारखी मोठी, चवही मस्त कुरकुरीत...

६. ढोकळा व्यवस्थित वाफवून घेतल्यावर तो थोडा थंड होऊ द्यावा. थंड झाल्यावर ढोकळ्याचे चौकोनी काप तुकडे करून घ्यावेत. 
७. फोडणीसाठी एका भांड्यात तेल घेऊन त्यात मोहरी, हिंग, कडीपत्ता, हिरव्या मिरच्या घालून खमंग फोडणी तयार करून घ्यावी. तयार फोडणी ढोकळ्यावर ओतून घ्यावी. ढोकळ्यावर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरवून घ्यावी. 

खमंग असा बेसन न वापरता केलेला डाळ तांदुळाचा ढोकळा खाण्यासाठी तयार आहे. मस्त हिरव्यागार चटणीसोबत हा ढोकळा खाल्ला तर त्याची चव अधिकच वाढते.

Web Title: Rice chana dal dhokla How To Make Rice chana dal dhokla At Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.