Join us
Daily Top 2Weekly Top 5

घरीच करा ३० मिनिटांत चमचमीत काजू मसाला, ग्रेव्ही होईल हॉटेलपेक्षाही जास्त क्रीमी- टेस्टी, शाही पारंपरिक रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2026 18:00 IST

Shahi Kaju Masala gravy secret: Best Kaju Masala recipe in Marathi: रेस्टॉरंटस्टाईल काजू मसाला भाजी घरच्याघरीच कशी तयार करायची ते पाहूयात.

खास समारंभ, वाढदिवस किंवा विकेंडचा बेत, रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर अनेकांची पहिली पसंती असते काजू मसाला. काजूची शाही चव आणि भाजीच्या ग्रेव्हीतील मसल्यांचा खमंग सुगंध यामुळेच ही भाजी चवीला अप्रतिम लागते.(Shahi Kaju Masala gravy secret) अनेकदा घरी हॉटेलसारखी चव, तो दाटपणा आणि क्रीमी पोत मिळत नाही अशी अनेकांची तक्रार असते. पण फक्त ३० मिनिटांत अस्सल रेस्टॉरंट स्टाईल काजू मसाला तयार करू शकता.(Best Kaju Masala recipe in Marathi)ही शाही भाजी आपण अगदी घरीच उपलब्ध असणाऱ्या साहित्यातून बनवू शकतो. रेस्टॉरंटमध्ये मिळणाऱ्या काजू मसाला भाजीसारखीच चव आणि टेक्स्चर घरच्या बनवलेल्या भाजीला देण्यासाठी सोपी रेसिपी पाहूयात. रेस्टॉरंटस्टाईल काजू मसाला भाजी घरच्याघरीच कशी तयार करायची ते पाहूयात. यासाठी लागणारे साहित्य आणि कृती. 

दह्यावर पाण्याचा तरंग- चवीलाही आंबट? विरजण लावण्यासाठी ४ टिप्स- मिळेल घट्ट कवडीसारखे पांढरेशुभ्र दही

साहित्य 

कांदे - ३ मोठे टोमॅटो - १ कोथिंबीरीचे देठ - ४ ते ५काजू - २० ते २५आलं - १ इंचलसूण पाकळ्या - ६ ते ७बटर - ३ चमचेतेल - ४ ते ५ चमचेजिरे - अर्धा चमचाखडा मसाला मीठ - चवीनुसार हळद - अर्धा चमचातिखट - २ चमचेधणे पूड - अर्धा चमचागरम मसाला - अर्धा चमचागरम पाणी - १ कपकसुरी मेथी - १ चमचाफ्रेश क्रीम- ३ चमचे कोथिंबीर - आवश्यकतेनुसार 

कृती 

1. सगळ्यात कांद्याचे, टोमॅटोचे तुकडे करुन घ्या. आता एका बाऊलमध्ये पाणी घालून त्यात कांद्याचे, टोमॅटोचे तुकडे, कोथिंबीरीची देठ, मीठ, ५ ते ६ काजू घालून ५ मिनिटे उकळवून घ्या. पाणी थंड झाल्यावर त्यात आले आणि लसूण घाला. 

2. मिक्सरच्या भांड्यात उकळवलेले सर्व साहित्य वाटून त्याची पेस्ट तयार करा. कढईमध्ये तेल तापवून त्यात उरलेले काजू हलके लालसर होईपर्यंत परतून घ्या. त्यानंतर त्याच कढईत बटर घाला. 

3. आता यात जिरे, खडा मसाला, मीठ घालून परतवून घ्या. त्यात वाटलेली पेस्ट घालून तेल सुटेपर्यंत छान परता. मग त्यात हळद, तिखट, धणे पूड, गरम मसाला घालून 2-3 मिनिटे परता.

4. त्यात वरुन गरम पाणी घालून झाकण ठेवून १० मिनिटे शिजू द्या. त्यात तळलेले काजू, कुटलेली कसुरी मेथी,  फ्रेश क्रीम आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. आणखी 2-3 मिनिटे शिजवा. गरमागरम नान, रोटी, चपाती किंवा जिरा राईससोबत सर्व्ह करा.

English
हिंदी सारांश
Web Title : Make restaurant-style Kaju Masala at home in 30 minutes.

Web Summary : Prepare delicious Kaju Masala at home in just 30 minutes! This simple recipe uses readily available ingredients to create a creamy, restaurant-quality gravy. Enjoy this traditional, शाही dish with naan, roti, or rice.
टॅग्स :अन्नपाककृती