Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > तासंतास तांदूळ निवडण्याची चाळण्याची झंझट विसरा - ही ट्रिक पाहा अळ्या आणि किडे आपोआप डब्याच्या बाहेर...

तासंतास तांदूळ निवडण्याची चाळण्याची झंझट विसरा - ही ट्रिक पाहा अळ्या आणि किडे आपोआप डब्याच्या बाहेर...

Remove weevils from rice naturally : how to remove worms from rice instantly : तांदूळ न निवडता पोरकिडे, अळ्या झटपट बाहेर काढण्यासाठी एक अत्यंत सोपा असा घरगुती उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2025 18:37 IST2025-10-25T18:23:28+5:302025-10-25T18:37:52+5:30

Remove weevils from rice naturally : how to remove worms from rice instantly : तांदूळ न निवडता पोरकिडे, अळ्या झटपट बाहेर काढण्यासाठी एक अत्यंत सोपा असा घरगुती उपाय...

Remove weevils from rice naturally how to remove worms from rice instantly | तासंतास तांदूळ निवडण्याची चाळण्याची झंझट विसरा - ही ट्रिक पाहा अळ्या आणि किडे आपोआप डब्याच्या बाहेर...

तासंतास तांदूळ निवडण्याची चाळण्याची झंझट विसरा - ही ट्रिक पाहा अळ्या आणि किडे आपोआप डब्याच्या बाहेर...

'तांदूळ' हा प्रत्येक घरात रोजच्या स्वयंपाकाचा महत्त्वाचा भाग असतो, भात करण्यासाठी तांदुळ लागतोच म्हणून आपण तांदूळ एकदमच विकत आणून साठवून ठेवतो. अनेकदा साठवलेल्या तांदुळात लहान किडे किंवा अळ्या झाल्याचा अनुभव तर आपल्या सगळ्यांनाचं आला असेल. हे छोटे उपद्रवी किडे आणि अळ्या  केवळ धान्याचे नुकसानच करत नाहीत, तर ते आपल्या आरोग्यासाठीही हानिकारक असतात. तांदळात होणारे किडे किंवा इतर सूक्ष्म अळ्यांच्या वाढत्या प्रमाणामुळे तांदूळ वापरण्यायोग्य राहत नाही. उष्ण आणि ओलसर हवामानामुळे हे किडे झपाट्याने वाढतात आणि थोड्याच दिवसांत संपूर्ण डब्बा खराब होतो(Remove weevils from rice naturally).

बाजारात यावर अनेक रासायनिक उपाय उपलब्ध असले तरी, ते केमिकल्सयुक्त हानिकारक उपाय करण्यास आपल्याला अनेकदा भीती वाटते.  मग अशावेळी, कोणतेही रसायन न वापरता, स्वयंपाकघरातील साधेसुदे पदार्थ वापरून तांदुळातील किडे आणि अळ्या नैसर्गिकरित्या घालवण्यासाठी घरगुती उपायच फायदेशीर ठरतात. याचबरोबर, तांदळातील पोरकिडे, अळ्या निवडून, वेचून काढण्यासाठी बराच वेळ खर्ची करावा लागतो. तासंतास एका जागी बसून तांदळातील पोरकिडे, अळ्या काढणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत, तांदूळ किडण्यापासून वाचवण्यासाठी आणि त्यात झालेले पोरकिडे, अळ्या झटपट बाहेर काढण्यासाठी एक अत्यंत सोपा असा घरगुती उपाय पाहूयात. या खास घरगुती उपायामुळे तांदुळातील पोरकिडे, अळ्या काढण्यासाठी तांदूळ निवडण्याची (how to remove worms from rice instantly) गरजच लागणार नाही... यासाठी नेमकं काय करायचं ते पाहूयात ... 

तांदुळातील अळ्या - पोरकिडे काढण्यासाठी घरगुती उपाय... 

avika_rawat_foods या इंस्टाग्राम अकाऊंटवरून तांदुळातील अळ्या - पोरकिडे काढण्यासाठीचा खास उपाय शेअर करण्यात आला आहे. यांच्या ट्रिकनुसार तांदळातील पोरकिडे, अळ्या काढण्यासाठी सर्वात आधी एक छोटा कंटेनर किंवा वाटी घ्यावी. त्यामध्ये ४ ते ५ चमचे व्हिनेगर (White Vinegar) ओतावे आणि त्यात थोडीशी हिंग पावडर (Asafoetida) मिसळावी. हिंगाचा तीव्र आणि तिखट वास तसेच व्हिनेगरचे आम्लयुक्त (Acidic) गुणधर्म किड्यांना बाहेर काढण्यास मदत करतात. 

दोडक्याची भाजी चिरताना सालं आणि शिरा फेकू नका, पारंपरिक सुकी चटणी करण्याची पाहा मस्त रेसिपी...

व्हिनेगर आणि हिंगाचे मिश्रण तयार झाल्यावर, हे तयार मिश्रण तांदळाच्या डब्यांत बरोबर मध्यभागी ठेवायचे आहे. यासाठी, ज्या तांदळामध्ये पोरकिडे, अळ्या  झालेले आहेत, ते तांदूळ एका मोठ्या भांड्यात किंवा कंटेनरमध्ये काढा. आता, हिंग आणि व्हिनेगर भरलेली वाटी तांदळाच्या अगदी मध्यभागी ठेवून द्या. कंटेनर उघडा असेल याची काळजी घ्या, जेणेकरून त्या मिश्रणाचा तीव्र वास तांदळाच्या कणांपर्यंत पोहोचू शकेल आणि किड्यांवर त्याचा परिणाम होईल आणि किडे, अळ्या पटकन बाहेर येतील. 

उडपी 'अण्णा' स्टाईल पांढरीशुभ्र चटणी! परफेक्ट चवीसाठी ७ टिप्स - डोसा, वडा, इडली खा मनसोक्त... 

यूट्यूबर अविका रावत यांचा दावा आहे की, ही युक्ती केवळ एका मिनिटात तांदळातील किड्यांना बाहेर काढेल. हिंग आणि व्हिनेगरच्या मिश्रणाच्या तीव्र, असह्य वासामुळे किडे आणि इतर जीव तातडीने तांदुळातून बाहेरच्या दिशेने पळू लागतात. यामुळे आपल्याला तासंतास तांदळातून पोरकिडे, अळ्या वेचण्याची मेहनत करावी लागणार नाही. 

तांदळातून पोरकिडे, अळ्या बाहेर निघून गेल्यानंतरही हा उपाय फायदेशीर ठरतो. अविका रावत सांगतात की, हे हिंग आणि व्हिनेगरचे मिश्रण तांदळाच्या डब्यांत भरून ठेवल्यास पुन्हा किडे लागणार नाहीत. हिंग आणि व्हिनेगरचा तीव्र आणि टिकणारा वास किड्यांना तांदळाजवळ येण्यापासून थांबवतो. त्यामुळे नैसर्गिकरित्या तांदूळ किड्यांपासून दूर राहतो.

हा उपाय अत्यंत सोपा आहे आणि यासाठी वापरले जाणारे साहित्य हिंग (Asafoetida) आणि व्हिनेगर (Vinegar) शक्यतो प्रत्येक घरातील स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असते. त्यामुळे तुम्हाला काहीही विकत घेण्याची गरज नाही आणि हा उपाय पूर्णपणे रसायनमुक्त देखील आहे. ज्यांना नैसर्गिक आणि सोप्या पद्धतीने आपले धान्य सुरक्षित ठेवायचे आहे, त्यांच्यासाठी हा एक अतिशय उत्तम उपाय आहे.


Web Title : चावल से कीड़े हटाने के लिए सिरका और हींग का आसान उपाय।

Web Summary : चावल में कीड़े लगने से परेशान हैं? सिरका और हींग का एक सरल घरेलू उपाय मदद कर सकता है। मिश्रण से भरा कटोरा अपने चावल के कंटेनर में रखें; तेज गंध से कीट दूर भागते हैं। यह प्राकृतिक तरीका आपके चावल को कीड़ा-मुक्त रखता है, जिससे समय और प्रयास की बचत होती है।

Web Title : Remove rice weevils easily with this simple vinegar-asafoetida trick.

Web Summary : Tired of picking rice weevils? A simple home remedy using vinegar and asafoetida can help. Place a bowl with the mixture in your rice container; the strong smell drives pests away. This natural method keeps your rice weevil-free, saving time and effort.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.