ताकाला आपल्याकडे अमृत म्हटले जाते. जेवण झाल्यावर किंवा मधल्या वेळेतही ताक पिणे आरोग्यासाठी अतिशय लाभदायक असते हे आपण अनेकदा वाचतो. थंडीच्या दिवसांत ताक (Buttermilk) प्यायले जात नसले तरी उन्हाळ्यात मात्र बाजारातील शीतपेय पिण्यापेक्षा आपल्याकडील पारंपरिक पेय असलेले ताक तब्येतीसाठी केव्हाही उत्तम. ताकाचे नियमित सेवन केल्याने शरीर बलवान होते. महत्वाचे म्हणजे तीन दिवस इतर काहीही न खाता ताक पीत राहल्यास आपल्या शरीराचे पंचकर्म आपोआप होते आणि शरीरातील चरबी निघून जाते, इतकेच नव्हे तर चेहऱ्यावरील काळे डाग जावुन चेहरा तरतरीत व तेजस्वी होतो. ताकाचे पुदीना ताक, मसाला ताक, मठ्ठा असे विविध प्रकार करता येतात. आज देशातील बहुतांश भागात महाशिवरात्रीचा (Mahashivratri) उत्सव साजरा केला जातो. या दिवशी शिवभक्ती करतानाच उपवास करण्याची प्रथा आहे. उपवासाच्या दिवशी तर ताक आवर्जून प्यायला हवे. पाहूयात ताक पिण्याचे भन्नाट फायदे
१. उपवासाला आपण साधारणपणे साबुदाणा, बटाटा यांसारखे वातूळ किंवा कधी तेलकट, तूपकट पदार्थ खातो. त्यामुळे पोट शांत राहावे यासाठी उपवासाच्या दिवशी ताक आवर्जून प्यायला हवे. यामुळे पोट शांत राहण्यासाठी ताक नक्की प्या.
२. ताकात विटामिन B 12, कैल्शियम, पोटेशियम आणि फास्फोरस सारखे तत्व असतात जे शरीरासाठी फारच फायद्याचे असतात. ज्याचे पोट साफ होत नाही आणि पोटातून आवाज येतात त्यांनी ताक पिल्याने असे आजार नाहीसे होतात.
३. ताक घुसळल्यामुळे त्यावर एकप्रकारची प्रक्रिया होते, त्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहण्यासाठी ताक अतिशय फायदेशीर असते. ज्यांना अॅसिडीटी, करपट ढेकर येणे, गॅसेस असे त्रास आहेत त्यांनी आहारात ताकाचा आवर्जून समावेश करावा.
४. ताक प्यायल्यानंतर शरीराची झीज ९० % भरून निघून शरीरातील उष्णता त्वरित कमी होऊन अतिशय शांत झोप लागते. पचनक्रिया सुरळीत ठेवण्याबरोबरच उन्हाळ्यात होणाऱ्या डिहायड्रेशनपासून बचाव होण्यासाठी ताक उपयुक्त ठरते.
५. लघवीशी संबंधित तक्रारी असतील तर ताक प्यायल्याने या तक्रारी कमी होण्यास मदत होते. लघवीला जळजळ होणे, पिवळ्या रंगाची लघवी होणे, लघवीच्या जागी खाज येणे यांसारख्या समस्या कमी होण्यासाठी ताक पिणे उपयुक्त ठरते.