उन्हाळा सुरु झाला म्हणजे कच्च्या कैरी आणि आंब्यांचा सिझन आला. सध्या बाजारांत मस्त हिरवीगार कैरी विकायला ठेवलेली पाहायला मिळते. ही हिरवीगार कैरी हमखास घरी (Raw Mango Papad Cone Chaat) विकत आणली जाते. मग कैरीच्या चटपटीत लोणच्यापासून चटणीपर्यंत अनेक पदार्थ घरोघरी तयार केले जातात. चवीला आंबट - गोड असणाऱ्या या कैरीचे (How To Make Raw Mango Papad Cone Chaat) अनेक पदार्थ खायला कोणाला आवडणार नाही.
घरात जर कैरी असेल तर आपण त्याचे झटपट चटपटीत चाट देखील तयार करु शकतो. कैरी वापरून केले जाणारे कैरी पापड चाट आपण संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी किंवा जेवणाआधी स्टार्टर म्ह्णून देखील खाऊ शकतो. आंबट - गोड चवीची कैरी, त्यात कुरकुरीत पापड, चाट मसाला म्हणजे तोंडाला पाणी आणणारे चटपटीत कॉम्बिनेशन. त्यामुळे यंदाच्या उन्हाळयात कैरीचे पारंपरिक पदार्थ तर तयार कराच पण सोबतच हे कैरी - पापडाचे चटपटीत चाट देखील नक्की ट्राय करा. कैरी - पापडाचे इन्स्टंट चाट तयार करण्याची सोपी रेसिपी पाहूयात.
साहित्य :-
१. कैरी - १ (बारीक तुकडे केलेली)
२. पापड - ६ ते ७ (भाजलेले किंवा तळलेले)
३. लाल तिखट मसाला - १ टेबलस्पून
४. मीठ - १ टेबलस्पून
५. कांदा - १/२ कप (बारीक चिरलेला)
६. टोमॅटो - १/२ कप (बारीक चिरलेला)
७. भाजलेले शेंगदाणे - १ कप (भाजून सालं काढलेले)
८. चाट मसाला - १ टेबलस्पून
९. हिरव्या मिरच्या - २ मिरच्या (बारीक चिरलेल्या)
१०. बारीक पिवळी शेव - २ टेबलस्पून
फक्त १ वाटी साबुदाणा - बटाट्याचे करा चौपट फुलणारे, पळी पापड, उपवासाच्या कुरकुरीत पापडांची रेसिपी...
उन्हाळ्यात इडली-डोशाचे पीठ जास्तच आंबते-फसफसते? पीठ आठवडाभर टिकण्यासाठी ‘ही’ पाहा युक्ती...
कृती :-
१. सगळ्यांत आधी तुमच्या आवडीनुसार ३ ते ४ पापड भाजून किंवा तळून घ्या.
२. एका मोठ्या बाऊलमध्ये बारीक चिरलेली कैरी घेऊन त्यात चवीनुसार मीठ, लाल तिखट मसाला, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, भाजलेले शेंगदाणे, बारीक पिवळी शेव, आणि पापड हाताने थोडे मोडून त्याचे तुकडे घालावेत.
३. सगळ्यात शेवटी वरून चाट मसाला भुरभुरवून घालावा. चमच्याने कालवून सगळे जिन्नस एकजीव करून घ्यावेत. हे फिलिंग तयार करून बाजूला ठेवून द्यावे. जर आपल्याला हे चाट असेल खायचे असेल तरी देखील आपण खाऊ शकता. नाहीतर पापडाचा आईस्क्रीमप्रमाणे कोन करूनत्यात देखील आपण हे फिलिंग भरून खाऊ शकता.
४. पापडाचा कोन तयार करण्यासाठी पापड हलकासा भाजून घेऊन तो गरम असतानाच हाताने वळवून त्याला कोनाचा आकार द्यावा.
अशाप्रकारे आपले चटपटीत, मसालेदार कच्च्या कैरीचे पापड चाट खाण्यासाठी तयार आहे.