Join us
Daily Top 2Weekly Top 5

अस्सल गावरान पद्धतीची हिरव्या टोमॅटोची चटणी, भाजीची गरज नाही - पोळीभाकरीसोबत पोटभर जेवण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2026 13:55 IST

raw green tomato chutney recipe : green tomato chutney recipe : raw tomato chutney Indian style : फक्त २ टोमॅटो आणि ५ मिनिटांत आंबट - तिखट आणि चविष्ट हिरव्यागार कच्च्या टोमॅटोची चटणी तयार...

घरात काहीवेळा कच्चे हिरवे टोमॅटो उरतात किंवा बाजारांतून विकत आणलेले टोमॅटो पूर्णपणे पिकलेले नसतात. अशावेळी या कच्च्या टोमॅटोच नेमकं करायचं  काय किंवा त्यांचा कसा वापर करावा, असा प्रश्न अनेक गृहिणींना पडतो. शक्यतो, आपण असे कच्चे हिरवे टोमॅटो भाजी किंवा उसळ तयार करण्यासाठी वापरु शकत नाही, अशावेळी हे कच्चे हिरवे टोमॅटो फेकून न देता आपण त्याची चटपटीत, झणझणीत अशी गावरान चटणी तयार करू शकतो. आंबट - तिखट चवीची कच्च्या हिरव्या टोमॅटोची चटणी झटपट तयार होते, अगदी साध्या जेवणाची देखील चव वाढवते आणि भाकरी, पोळी किंवा वरण - भातासोबत अप्रतिम लागते. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात आणि घराघरात ही चटणी चवीने खाल्ली जाते. जेवणाची चव वाढवण्यासाठी आणि तोंडी लावण्यासाठी हा एक उत्तम पदार्थ आहे(raw tomato chutney Indian style).

कच्च्या टोमॅटोचा आंबटपणा आणि मिरचीचा तिखटपणा यामुळे या चटणीची एक वेगळीच चव जिभेवर रेंगाळत राहते. व्हिटॅमिन 'सी' युक्त असलेल्या कच्च्या हिरव्या टोमॅटोची चटणी(green tomato chutney recipe) केवळ चविष्टच नाही, तर आरोग्यासाठीही उत्तम असते. जर तुम्हाला नेहमीच्या भाज्या, उसळी, डाळी खाऊन कंटाळा आला असेल, तर ही चटपटीत चटणी जेवणाची रंगत वाढवेल. साधीसोपी पण चवीला एकदम भारी असणारी ही चटणी १० मिनिटांत तयार होते. भाजलेले शेंगदाणे आणि लसणाची फोडणी यामुळे या (raw green tomato chutney recipe) चटणीला जो स्वाद येतो, तो कशातच नाही. पाहा कशी करायची ही गावरान पद्धतीची हिरव्या टोमॅटोची चटणी.... 

साहित्य :- 

१. हिरवे कच्चे टोमॅटो - ४ ते ५ २. तेल - २ टेबलस्पून ३. शेंगदाणे - १/४ कप ४. लसूण पाकळ्या - १० ते १२ पाकळ्या ५. जिरे - १ टेबलस्पून ६. हिरव्या मिरच्या - ३ ते ४ मिरच्या७. कोथिंबीर - १ कप ८. गूळ - १ टेबलस्पून ९. मीठ - चवीनुसार१०. पांढरी उडीद डाळ - १/२ टेबलस्पून ११. मोहरी - १/२ टेबलस्पून १२. लाल सुक्या मिरच्या - २ ते ३ मिरच्या

चटणीचीही गरज नाही, इतका चविष्ट लागतो 'टोमॅटो डोसा'! होईल झटपट, वाटीभर टोमॅटोचा लालचुटुक - कुरकुरीत डोसा... 

अस्सल खान्देशी उडीद वडे, चव झणझणीत अशी की खाताच म्हणाल वाढा आणखी! पारंपरिक चवीचा बेत...

कृती :- 

१. कच्चे हिरवे टोमॅटो स्वच्छ धुवून, पुसून त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करुन घ्यावेत. २. एका पॅनमध्ये तेल घेऊन त्यात कच्च्या टोमॅटोचे तुकडे, शेंगदाणे, लसूण पाकळ्या, जिरे, हिरव्या मिरच्या असे सगळे जिन्नस एकत्रित तेलात २ ते ५ मिनिटे परतवून घ्यावेत. ३. पॅनमधील मिश्रण थोडे थंड करून घ्यावे. पॅनमधील मिश्रण थंड झाल्यावर ते मिक्सरच्या भांड्यात ओतून घ्यावे.

 ४. याच मिक्सरच्या भांड्यात बारीक चिरलेली कोथिंबीर, गूळ पावडर आणि चवीनुसार मीठ देखील घालावे. मिक्सर फिरवून चटणी व्यवस्थित वाटून घ्यावी.    ५. दुसऱ्या एका भांड्यात तेल घेऊन त्यात पांढरी उडीद डाळ, मोहरी, लाल सुक्या मिरच्या घालून खमंग अशी फोडणी तयार करून घ्यावी. ही तयार खमंग, कडकडीत फोडणी वाटून घेतलेल्या टोमॅटोच्या चटणीवर घालावी.

हिरव्यागार, कच्च्या, आंबट - गोड टोमॅटोची झणझणीत चटणी खाण्यासाठी तयार आहे. ही चटणी आपण चपाती, भाकरी, डोसा, इडली सारख्या सगळ्या पदार्थांसोबत खाल्ल्यास त्या पदार्थांची चव दुपटीने वाढते.

English
हिंदी सारांश
Web Title : Spicy Raw Green Tomato Chutney Recipe: A Flavorful Maharashtrian Delight

Web Summary : Transform leftover green tomatoes into a tangy, spicy chutney. This Maharashtrian recipe uses roasted peanuts, garlic, and chilies for a unique flavor. Enjoy it with roti, bhakri, or rice for a delicious and healthy meal.
टॅग्स :अन्नपाककृती