Join us

खाऊन तर पाहा रसमलाई मोदक! फक्त वाटीभर पनीर हवं, १५ मिनिटांत मोदक तयार-पाहा इन्स्टंट रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2025 13:50 IST

Rasmalai Modak Recipe : How To Make Rasmalai Modak At home : Easy Rasmalai Modak Recipe : गणपती बाप्पांसाठी घरच्याघरीच हलवायासारखे रसमलाई मोदक, अगदी इन्स्टंट पद्धतीने करु शकतो.

गणपती बाप्पांच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत प्रसाद, नैवेद्यात मोदकाचा विशेष मान असतो. गणपती बाप्पांसाठी प्रत्येक घरोघरी मोठ्या आवडीने आणि हौसेने मोदक तयार केले जातात. उकडीचे मोदक, तळलेले मोदक, चॉकलेट मोदक अशा अनेक प्रकारच्या मोदकांनी बाप्पासाठी खास नैवेद्य(How To Make Rasmalai Modak At home) तयार केला जातो. पारंपरिक उकडीचे किंवा तळलेले मोदक आपण नेहमीच खातो, पण सणाला काहीतरी हटके आणि खास पदार्थ करुन आपण सणाचा आनंद द्विगुणित करु शकतो(Easy  Rasmalai Modak Recipe).

यंदा गणपती बाप्पांसाठी आपण घरच्याघरीच हलवायासारखे रसमलाई मोदक अगदी झटपट इन्स्टंट पद्धतीने करु शकतो. यावर्षी पारंपरिक पदार्थांना थोडा आधुनिक टच देत काहीतरी वेगळं करून पाहण्याची इच्छा असेल तर, 'रसमलाई मोदक' हा एक भन्नाट असा पदार्थ नक्की करून पाहा. जेव्हा बंगाली रसमलाईची मखमली गोड चव महाराष्ट्राच्या लाडक्या पारंपरिक मोदकात उतरते, तेव्हा एक मस्त भन्नाट चवीचा पदार्थ तयार होतो जो चवीला अप्रतिम तर लागतोच, पण दिसायलाही तितकाच (Rasmalai Modak Recipe) आकर्षक दिसतो. रसमलाई मोदक कसे बनवायचे, त्यासाठी लागणारे साहित्य व सोपी रेसिपी पाहूयात. 

साहित्य :- 

१. पनीर - २ कप २. मिल्क पावडर - १/२ कप ३. पिठीसाखर - १/२ कप ४. काजू पावडर - १/४ कप ५. दूध - २ ते ३ टेबलस्पून ६. केशर काड्या - ७ ते ८  ७. वेलची पावडर - १/२ टेबलस्पून ८. पिस्त्याचे काप - २ टेबलस्पून ९. साजूक तूप - ३ ते ४ टेबलस्पून 

हार- फुले फ्रिजशिवायही राहतील ताजी! ८ सोप्या ट्रिक्स - फुले न कोमेजता राहतील टवटवीत...

मोदकांसोबतच बाप्पाच्या नैवेद्याला करा अक्रोडचा हलवा ! जिभेवर रेंगाळणारी अप्रतिम चव, करताच होईल पटकन फस्त...  

कृती :- 

१. सगळ्यात आधी एका मोठ्या मिक्सरच्या भांडयात पनीरचे तुकडे घालूंन ते हलकेच मिक्सरमध्ये फिरवून घ्यावेत. २. पॅनमध्ये साजूक तूप घालूंन त्यात मिक्सरमध्ये मॅश करून घेतलेले पनीर घालावे. ३. मॅश करून घेतलेले पनीर साजूक तुपात हलकेच परतून घ्यावे. त्यानंतर या मिश्रणात मिल्क पावडर, काजू पावडर, पिठीसाखर असे सगळे जिन्नस घालूंन मिश्रण एकजीव करून घ्यावे. 

इडली पात्रात करा मऊसूत इन्स्टंट रवा मोदक! बाप्पाचा प्रसाद आणि नैवेद्य होईल खास - पाहा इन्स्टंट रेसिपी... 

४. सगळ्यात शेवटी या मिश्रणात दुधात भिजवलेल्या केशराच्या काड्या व चमचाभर दूध घालावे. पुन्हा गॅसच्या मंद आचेवर मिश्रण हलकेच शिजवून घ्यावे. जेव्हा मिश्रण व्यवस्थित शिजून थोडे घट्ट होऊन त्याचा एकत्रित गोळा होऊ लागेल तेव्हा मिश्रण एका डिशमध्ये काढून थोडे थंड होऊ द्यावे. ५. मिश्रण हलकेच थंड झाल्यावर मोदकाच्या साच्याला बोटाने किंचित तूप लावावे. मग या साच्यात पिस्त्याचे काप भुरभुरवून घालावेत. सगळ्यात शेवटी या साच्यात मिश्रण घालूंन मोदक तयार करून घ्यावेत. 

मस्त असे गोड चवीचे हलवायासारखे रसमलाई मोदक खाण्यासाठी तयार आहेत.

टॅग्स :गणेशोत्सव 2025अन्नपाककृतीगणपती 2025गणपती उत्सव २०२५गणेश चतुर्थीगणेश चतुर्थी रेसिपी