lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > कुछ मीठा हो जाए..जगातील टॉप ५० गोड पदार्थांच्या यादीत भारताच्या काजूकतली आणि रसमलाईने मारली बाजी

कुछ मीठा हो जाए..जगातील टॉप ५० गोड पदार्थांच्या यादीत भारताच्या काजूकतली आणि रसमलाईने मारली बाजी

Rasmalai and Kajukatli are best Indian desserts among 50 in the world according to taste Atlas : गोडाशिवाय भारतीयांचे जेवण पूर्ण होऊ शकत नाही हेही तितकेच खरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2023 03:20 PM2023-11-03T15:20:42+5:302023-11-03T15:22:37+5:30

Rasmalai and Kajukatli are best Indian desserts among 50 in the world according to taste Atlas : गोडाशिवाय भारतीयांचे जेवण पूर्ण होऊ शकत नाही हेही तितकेच खरे

Rasmalai and Kajukatli are best Indian desserts among 50 in the world according to taste Atlas : Kuch Meetha Ho Jaye..India's Kajukatli and rasmalai beat the world's top 50 sweets list | कुछ मीठा हो जाए..जगातील टॉप ५० गोड पदार्थांच्या यादीत भारताच्या काजूकतली आणि रसमलाईने मारली बाजी

कुछ मीठा हो जाए..जगातील टॉप ५० गोड पदार्थांच्या यादीत भारताच्या काजूकतली आणि रसमलाईने मारली बाजी

भारतीय पाककला आणि पदार्थ हे देशातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहेत हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. जगात पदार्थांबाबत चर्चा होत असताना त्यामध्ये भारताचे नाव आले नाही असे फार कमी वेळा होते. भारतीय आहार हा परीपूर्ण आणि वैविध्यपूर्ण आहार मानला जातो. भारतात मैलामैलावर खाद्यसंस्कृती बदलत असल्याने पदार्थांचे खूप जास्त प्रकार याठिकाणी उपलब्ध असतात. तसेच भारतीय लोक मसालेदार, तळलेले आणि गोड मोठ्या प्रमाणात खातात असेही जगभरातील लोकांचे म्हणण आहे. पण गोडाशिवाय भारतीयांचे जेवण पूर्ण होऊ शकत नाही हेही तितकेच खरे. भारतात प्रत्येक राज्यात, गावात गोड पदार्थांची वेगळी यादी आणि खासियत पाहायला मिळते. मात्र काही गोड पदार्थ हे सगळ्याच ठिकाणी अतिशय आवडीने खाल्ले जातात (Rasmalai and Kajukatli are best Indian desserts among 50 in the world according to taste Atlas). 


अशाच २ गोड पदार्थांचा समावेश जागतिक टॉप ५० पदार्थांच्या यादीत झाला असून काजूकतली आणि रसमलाई हे ते पदार्थ आहेत. Taste Atlas यांच्यावतीने २०२३ या वर्षीसाठी नुकतीच जगभरातील विविध देशातील गोड पदार्थांची एक यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये भारतातील २ गोड पदार्थांचा समावेश असल्याने भारतीयांसाठी ही नक्कीच आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. सरमलाई या बंगाली मिठाई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पदार्थाचा यामध्ये ३१ वा क्रमांक असून त्याला ४.५ इतके रेटींग देण्यात आले आहे. तर काजूकतली ही बहुतांश जणांची आवडती मिठाई असून तिला या यादीत ४.५ रेटींग देत  ४१ व्या क्रमांकावर स्थान देण्यात आले आहे. या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर फ्रान्सच्या 'क्रेप्स' या पदार्थाचा समावेश आहे. 

(Image : Google )
(Image : Google )

यासोबतच ब्राझीलच्या बॉम्बोकाडो (नारळाच्या फ्लेवरची पेस्ट्री) आणि पेरू देशातील क्वेसो हेलाडो (आईस्क्रीम सारखा एक पदार्थ) या दोन पदार्थांना देखील पहिला क्रमांक विभागून मिळाला आहे.त्यामुळे भारतात आणि परदेशातही अतिशय आवडीने खाल्ले जाणारे हे भारतीय पदार्थ जागतिकरित्या मान्यता मिळाल्याने पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. भारतातील योग, आयुर्वेद, संस्कृती यासोबतच आता खाद्यसंस्कृतीही विशेषत्त्वाने ओळखली जाणे ही भारतीय म्हणून आपल्यासाठी नक्कीच आनंदाची बाब आहे. 

Web Title: Rasmalai and Kajukatli are best Indian desserts among 50 in the world according to taste Atlas : Kuch Meetha Ho Jaye..India's Kajukatli and rasmalai beat the world's top 50 sweets list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.