Join us  

रामनवमी स्पेशल : करा प्रसादाचा शिरा, १ वाटीचे प्रमाण - पाहा परफेक्ट रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2024 11:56 AM

Ram Navami Special Recipe | Prasad Sheera : कधी रव्याच्या गुठळ्या-तर कधी तूप कमी पडते? साजूक तुपातला गोड शिरा करण्याची पाहा सोपी कृती

चैत्र नवरात्रीच्या शेवटच्या किंवा नवव्या दिवशी, मर्यादा पुरुषोत्तम भगवान राम यांच्या जन्माचे स्मरण करण्यासाठी, दरवर्षी रामनवमी साजरी केली जाते (Ram navami 2024). उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत देशभरात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या शुभप्रसंगी काही भाविक मंदिरात जातात, उपवास करतात किंवा घरात विशेष पूजा करतात (Prasad Sheera). पूजा झाली की घरात, लहान मुलांना किंवा शेजारी पाजारी प्रसाद म्हणून शिरा वाटला जातो.  तर उत्तर भारतात बेसनाचे लाडू, नारळाची बर्फी, काळे चणे आणि पुरी हे पदार्थ प्रसाद म्हणून दिले जातात.

तर महाराष्ट्रातील काही घरांमध्ये साजूक तुपाचा शिरा केला जातो. पण घरात मनासारखा शिरा तयार होत नाही. कधी तुपाचे प्रमाण बिघडते, कधी रव्याच्या गुठळ्या होतात, तर कधी साखरेचे प्रमाण बिघडते. जर आपल्याला परफेक्ट शिरा तयार करायचा असेल तर, ही रेसिपी फॉलो करून पाहा. परफेक्ट साजूक तुपाचा शिरा काही मिनिटात तयार होईल(Ram Navami Special Recipe | Prasad Sheera).

साजूक तुपातला रव्याचा शिरा करण्यासाठी लागणारं साहित्य

रवा

ड्रायफ्रुट्स

तूप

साखर

ना उकड-ना पीठ मळण्याची गरज; पाहा अगदी ५ मिनिटात तांदुळाची भाकरी करण्याची सोपी कृती

दूध

केशर

वेलची पूड

पाणी

कृती

सर्वप्रथम, एका कढईत अर्धा कप तूप घाला. तूप गरम झाल्यानंतर त्यात एक मोठा कप रवा घालून भाजून घ्या. रवा भाजताना गॅस मध्यम आचेवर ठेवा. जोपर्यंत रव्याचा रंग सोनेरी होत नाही, तोपर्यंत भाजून घ्या. रवा भाजताना जर त्यात तूप कमी पडत असेल तर, त्यात आणखीन ३ ते ४ चमचे तूप घाला. रवा आणि तुपाचा सुगंध दरवळल्यानंतर त्यात एक छोटा कप बारीक चिरलेले ड्रायफ्रुट्स घालून मिक्स करा.

म्हशीचं की गायीचं? कोणत्या दुधाचं दही चांगलं लागतं? विकतसारखं घट्ट दही हवं तर..

ड्रायफ्रुट्स मिक्स केल्यानंतर त्यात एक कप पाणी घाला, आणि सतत चमच्याने ढवळत राहा. जेणेकरून कढईच्या तळाशी रवा चिकटणार नाही. रवा भाजून झाल्यानंतर त्यात एक कप साखर घाला. जर आपल्याला गोड कमी हवं असेल तर, आपण त्यात साखरेचं प्रमाण कमी करू शकता.

साखर रव्यात मिक्स झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा वेलची पूड आणि २ चमचे केशर दूध घालून चमच्याने मिक्स करा. त्यावर २ मिनिटांसाठी झाकण ठेवा. वाफेवर रवा छान शिजवून घ्या. अशा प्रकारे साजूक तुपातला रव्याचा शिरा खाण्यासाठी रेडी. 

टॅग्स :राम नवमीअन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स