रक्षाबंधन म्हणजे भाऊ-बहिणीच्या नात्याचा गोड सण. या दिवशी बहिण भावाला राखी बांधते आणि भाऊ तिला भेटवस्तू देतो. या सणाला गोडधोड पदार्थ करण्याची (Rakshabandhan special milk paneer homemade laddu recipe) खास परंपरा आहे. या खास सणांला आपण वेगवेगळ्या प्रकारचे (Rakshabandhan special sweets) गोडाधोडाचे पदार्थ हमखास तयार करतोच. रक्षाबंधन (Malai laddu Recipe) सणाच्या निमित्ताने, आपल्या लाडक्या भावासाठी नेहमीपेक्षा काहीतरी वेगळा गोडधोडाचा पदार्थ करण्याची आपली इच्छा असते. बाजारांत हजारो प्रकारच्या मिठाया किंवा गोडाचे पदार्थ विकत (Homemade paneer laddu recipe) मिळत असले तरी आपण घरी काहीतरी खास बेत करतोच(Quick sweets for Raksha Bandhan).
या सणाला नारळाचे असंख्य पदार्थ केले जातात, नारळी भात, नारळाची वडी, बर्फी, ओल्या नारळाच्या करंज्या... पण या नेहमीच्या पारंपरिक पदार्थांसोबतच काहीतरी नवीन हटके आणि वेगळा पदार्थ करायचा असेल तर दूध आटवून केलेलं लाडू हा उत्तम पदार्थ ठरु शकतो. हे लाडू अगदी तासाभरात आणि घराचं उपलब्ध असणाऱ्या साहित्यात झटपट तयार करुन होतात. यंदाच्या राक्षबंधनानिमित्त विकतची मिठाई, गोडाधोडाचे पदार्थ आणण्यापेक्षा घरच्याघरीच दूध आटवून मलईदार लाडू कसे तयार करायचे ते पाहूयात. मऊसूत, तोंडात टाकताच विरघळणाऱ्या मलईदार लाडूंची इन्स्टंट रेसिपी पाहा...
साहित्य :-
१. दूध - १ + १/२ लिटर दूध
२. साखर - १ कप
३. व्हिनेगर / लिंबाचा रस - १ टेबलस्पून
४. पाणी - गरजेनुसार
५. केशर - १० ते १२ काड्या
सणावाराला पुऱ्या करता पण बेत फसतो? तेल न पिणाऱ्या, टम्म फुगलेल्या पुऱ्यांसाठी 'असं' पीठ मळा...
कृती :-
१. सगळ्यात याआधी १ लिटर दूध भांड्यात ओतून ते व्यवस्थित गरम करून घ्यावे. या गरम दुधात लिंबाचा रस किंवा व्हिनेगर घालून दूध फाटल्यावर हलकेच चमच्याने हलवून घ्यावे.
२. आता हे दूध एका स्वच्छ सुती कापडात ओतून त्याची पोटली बांधून ठेवावी. अर्धा तास त्यातील संपूर्ण पाणी निथळून जाईपर्यंत तसेच ठेवून द्यावे.
३. मग हे तयार पनीर एका भांड्यात काढून हाताने किंवा वाटीच्या मदतीने दाब देत व्यवस्थित कुस्करुन घ्यावे.
४. आता एका मोठ्या भांड्यात दूध ओतून ते दूध गॅसच्या मंद आचेवर ठेवून चमच्याने हलवत राहून व्यवस्थित आटवून घ्यावे. दूध आटवताना त्यात एक चिनीमातीच छोटं भांडं घालावं जेणेकरून दूध भांड्याला खाली लागत नाही.
५. दूध व्यवस्थित आटवून झाल्यावर त्यात तयार केलेलं कुस्करलेलं पनीर घालावं, चवीनुसार साखर घालावी आता चमच्याने सर्व जिन्नस एकत्रित करुन एकजीव करून घ्यावे. हे मिश्रण थोडे घट्ट आणि रसरशीत होईपर्यंत मंद आचेवर गरम करून घ्यावे. मिश्रण आटवून घेतल्यावर गॅस बंद करावा. मिश्रण एका मोठ्या भांड्यात काढून घ्यावे.
६. तयार मिश्रणाचे लाडू वळून घ्यावेत. लाडू वळून झाल्यावर त्यावर दुधात भिजवून घेतलेल्या केशर काड्या लावाव्यात.
रक्षाबंधनसाठी स्पेशल असे मलईदार लाडू खाण्यासाठी तयार आहेत.